Agripedia

भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे प्रामुख्याने तिनं हंगाम आहेत खरिपामध्ये भुईमूगा खालील क्षेत्र उन्हाळी भुईमुगाच्या पेक्षा अधिक असते. महाराष्ट्रात खरीप हंगामातील भुईमूग खालील लागवड क्षेत्र साधारणतः 2.36 लाख हेक्टर तर उन्हाळ्यात0.425 टाक हेक्टेर एवढे असते

Updated on 18 October, 2021 10:36 AM IST

भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे प्रामुख्याने तिनं हंगाम आहेत खरिपामध्येभुईमूगाखालील क्षेत्र उन्हाळी भुईमुगाच्या पेक्षा अधिक असते. महाराष्ट्रात खरीप हंगामातील भुईमूग खालील लागवड क्षेत्र साधारणतः 2.36 लाख हेक्टर तर उन्हाळ्यात0.425 टाक हेक्‍टर एवढे असते

खरिपात भुईमूग पिकाची उत्पादकता साधारणतः 1000 ते अकराशे किलो प्रति हेक्‍टर असते तर उन्हाळ्यात 1400 ते 1450 किलो प्रति हेक्‍टर एवढे असते. या लेखात आपण भुईमूग लागवडीच्या इक्रिसॅट पद्धत व तिचे फायदे याबद्दल माहिती घेणार आहोत.

नेमकी काय आहे भुईमुगाची इक्रिसॅट लागवड पद्धत?

 भुईमूग लागवडीच्या या पद्धतीस गादीवाफा सरी पद्धत असे म्हणतात. या पद्धतीत प्रत्येक मीटरवर 30 सेंटीमीटर रुंदीची सरी सोडावी म्हणजे 70 सेंटीमीटर चा रुंद वरंबा तयार होईल. त्यावर वीस सेंटीमीटर अंतरावर चार ओळी पाडून भुईमुगाचे बी टोकण लागवड करतात.

 इक्रिसॅट पद्धतीच्या रुंद गादी वाफ्यावर पेरणी केल्याने मऊ व भुसभुशीत वरब्यामध्ये मुळांची वाढ व शेंगांचे पोषण उत्तम होते. जास्तीचे पाणी निचरा होऊन बाजूच्या सार्‍यातून शेता बाहेर जाते. रुंद वरंबा यावर बी टोकन यापूर्वी शिफारशीत खत मात्रा पेरून द्यावी. नंतर पाणी देऊन वाफे ओलसर करून शिफारशीत तणनाशकाची फवारणी करावी नंतर वाफ्यावर पॉलिथिन शीट अंथरून बसवले जाते.पॉलिथिन ला  वीस सेंटीमीटर ओळीतील अंतर ठेवून दोन रोपांना देखील 20 सेंटिमीटर अंतरावरचार सेंटीमीटर व्यासाची छिद्रे तयार केले जातात. सत्य छिद्राच्या ठिकाणी दोन बिया टाकल्या जातात.पॉलिथिन शेट्ट ची रुंदी 90 ते 95 सेंटिमीटर असते आणि रुंद वरंबा यावर 70 सेंटिमीटर ठेवून उर्वरित पॉलिथिनच्या दोन्ही बाजू सरीच्या खोबणीत मातीत दाबावेत.त्यामुळे फिल्म सरकत नाही.गादीवाफा उताराला आडवे असावेत.

भुईमूग लागवडीच्या इक्रिसॅट पद्धतीचे फायदे

  • जास्त झालेले सरीतील पाणी काढून देता येते किंवा पाणी द्यायचे झाल्यास सरी तून देता येते.
  • पाण्याचा निचरा चांगला होतो.
  • मुळांच्या जवळ हवा खेळती राहते.
  • ओळीतील रोपांना चांगला सूर्यप्रकाश मिळतो.
  • भुसभुशीत मातीत शेंगा चांगल्या पोसतात.
  • उत्पन्नात दोन ते तीन पट वाढ होते.
English Summary: icrisat technology is important in groundnut cultivation
Published on: 18 October 2021, 10:36 IST