जर आपण विविध कृषी विद्यापीठे आणि कृषी क्षेत्राशी संबंधित संस्थांचा विचार केला तर त्यांचे खूप मोठे अतुलनीय योगदान हे कृषी क्षेत्राच्या विकासात आहे. यामध्ये कृषी विद्यापीठे आणि कृषी संस्था या निरंतर शेतकऱ्यांच्या फायद्याचे संशोधन म्हणजे शेती करण्याला सोपे जाईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या संशोधनाच्या माध्यमातून भरघोस उत्पादनाची आशा पल्लवीत होतील अशा पद्धतीचे काम करीत असतात. जर आपण यामध्ये विचार केला तर विविध प्रकारच्या पिकांच्या सुधारित आणि चांगल्या उत्पादनक्षम जाती विकसित करण्याचे महत्वपूर्ण काम विविध कृषी विद्यापीठे करतात.
कारण कुठल्याही पिकाच्या सुधारित जाती वरच हातात येणारे उत्पादन अवलंबून असते. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून कृषी विद्यापीठाचे कार्य हे खरंच वाखानण्याजोगे आहे.
असेच कौतुकास्पद कार्य आयसीएआर-सोयाबीन संशोधन केंद्र,इंदोर यांनी केले असून या संशोधन संस्थेने सोयाबीनच्या भरघोस उत्पादन देणाऱ्या आणि विविध प्रकारचे कीटक प्रतिरोधक जाती विकसित केल्या आहेत. ज्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरणार आहेत. या लेखात आपण या नवीन विकसित सोयाबीन जातींची थोडक्यात माहिती घेऊ.
सोयाबीनच्या तीन नवीन विकसित जाती
1- एनआरसी 136- या संशोधन संस्थांनी विकसित केलेली ही जात लागवडीनंतर एकशे पाच दिवसात काढणीस येते. या जातीपासून येणाऱ्या उत्पादनाचा विचार केला तर सरासरी एका हेक्टरमध्ये सतरा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
या जातीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही जात दुष्काळासारख्या परिस्थितीत देखील तग धरू शकते. या जातीला मध्यवर्ती क्षेत्रासाठी मान्यता देण्यात आली असून ही जात मुंगबीन येलो मोजॅक या रोगास प्रतिरोधक आहे.
नक्की वाचा:वापरा बीव्हीजी कृषी तंत्रज्ञान, होईल मोठा फायदा : भेंडी लागवड (१ एकर क्षेत्रासाठी)
2- एनआसी 157- सोयाबीनची ही जात लागवडीनंतर 94 दिवसांत काढणीस तयार होते.या जातीपासून सरासरी प्रतिहेक्टर साडे सोळा ते सतरा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. सोयाबीनची ही जात अल्टरनेरिया लिफ स्पॉट, टारगेट लिफ स्पॉट यासारख्या रोगांना माफक प्रमाणात प्रतिरोधक असून या जातीची उशिरा पेरणी करता येते. जर या जातीबद्दल शास्त्रज्ञांच्या मताचा विचार केला तर 20 जुलैपर्यंत ह्या जातीची पेरणी करणे शक्य आहे.
3-एनआरसी 131- ही जात लागवडीनंतर 93 दिवसांमध्ये काढणीस तयार होते. सोयाबीनच्या नवीन जाती पासून मिळणाऱ्या उत्पादनाचा विचार केला तर प्रतिहेक्टर सरासरी 15 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. ही जात टारगेट लिफ स्पॉट आणि चार्कॉल रूट यासारख्या रोगांसाठी माफक प्रमाणात प्रतिरोधक असून पूर्वेकडील भागासाठी विकसित करण्यात आली आहे.
Published on: 20 October 2022, 07:11 IST