जर आपण विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांचा विचार केला तर यामध्ये मिरची, टोमॅटो आणि वांगी यासारख्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी बंधू करतात. त्याचप्रमाणे वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये काकडी, कारली आणि दोडक्यासारखे पिकांचे देखील लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु पीक कोणतेही असो त्यापासून जर भरगोस उत्पादन हवे असेल तर प्रत्येक अंगाने व्यवस्थापन खूप बारकाईने होणे गरजेचे असते.
तेव्हाच कुठे शेतकऱ्यांच्या हातामध्ये भरघोस उत्पादन येते. परंतु बऱ्याचदा सगळे व्यवस्थापनाच्या बाबी पूर्ण केल्यानंतर देखील बियाणे जर निकृष्ट दर्जाचे असेल तरीसुद्धा उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर फटका बसतो.
या दृष्टिकोनातून विविध पिकांच्या सुधारित आणि चांगल्या उत्पादनक्षम जातींवर संशोधन आणि विकसित करण्याचे काम देशातील विविध कृषी संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठे करत असतात. जेणेकरून शेतकरी बंधूंना पीक लागवड करत असताना सुधारित आणि दर्जेदार जातींची उपलब्धता यामुळे होते व शेतकरी बंधूंना चांगला नफा मिळतो.
या अनुषंगाने कृषी क्षेत्राशी संबंधित महत्वपूर्ण आयसीएआर च्या शास्त्रज्ञांनी अनेक वर्षाच्या अफाट मेहनतीने काकडीचे एक बिया नसलेले म्हणजेच सिडलेस वाण विकसित केले असून शेतकऱ्यांसाठी ही जात खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
आयसीआरच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेले काकडीचे डीपी-6 हे वाण आहे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
जर या वाणाच्या बाबतीत आयसीआरच्या शास्त्रज्ञांच्या मताचा विचार केला तर डीपी सहा नावाची ही काकडी पेरणीनंतर 45 दिवसांनी उत्पादन देण्यास सुरुवात करते.
लागवडीनंतर एकदा उत्पादन सुरू झाले तर कमीत कमी तीन ते चार महिन्यांपर्यंत या काकडीच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना उत्पादन मिळत राहते. पातळ साल असलेली ही काकडी खायला देखील चविष्ट असून कोणताही कडवटपणा यामध्ये नाही.
नक्की वाचा:काळ्या तांदळाची लागवड बदलवणार शेतकऱ्यांचे नशीब! बाजारात मिळतोय 200 ते 300 रुपये किलो भाव
डीपी 6 या वाणाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वातावरणातील बदल किंवा काकडीवर येणारी किडींचा व रोगांचा कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव किंवा विपरीत परिणाम यावर होत नाही.
दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जितक्या मादी फुलांची संख्या या जातीच्या काकडीच्या वेलीवर असते तितकेच फळे देखील यापासून शेतकरी बंधूंना उत्पादनाच्या स्वरूपात मिळतात. जर शेतकरी बंधूंनी या काकडीची लागवड केली तर अतिशय कमी खर्चात चांगला नफा मिळवून देण्याची क्षमता या वाणात आहे.
Published on: 03 November 2022, 08:07 IST