Agripedia

पुर्वी धान देवुन आम्ही लागेल ते आवश्यक सामान विकत घेत असु. एवढेच नव्हे तर शेतात काम करणारे मजुर. सुतार,तेली,न्हावी,धोबी सर्व धानाच्या बदलात काम करीत.शेती वर शेतकरी व इतर भुमीहीन समाज सुध्दा मजेत उदरनिर्वाह करीत असायचा.

Updated on 02 December, 2021 8:14 PM IST

नंतर युग आला तो रोख पैसे चा.शेतकरी वर्षातुन एकदा पिक घेणारा व मिळालेला पैसा मधे आपले सर्व घरगुती व‌ बाहेरील व्यवहार सांभाळायचा.आता विचार करा वर्षातुन एकदा मीळालेले पैसे किती दिवस पुरणार

मग उधारी व्यवहार सुरू केला.किराणा दुकान, खते किटकनाशक.कापड. सुतार.न्हावी. भाजीपाला..सर्वांनाची उधारी.एवढे पन नाही पुरले तर सावकरा कडे दागिने गहाण ठेवून कर्ज घेतले पन शेती सोडली नाही.

शेतात अतोनात मेहनत करून शेवटी निसर्गाचा कोप झाला व शेतातील अर्धा धान माती मोल झाला.कशे ही करुन काही धान्य घरापर्यंत आले.पन धान खरेदी केंद्र च सुरू नाही.

सावकारांचे करा.व‌ दुकानदार व इतर लोंकाची उधारी जगु देत नाही.उधारी मागणारे घरी येतात.फोन वर वाटेल ते बोलतात.

भर चौकात कालर पकडतात व उधारी चे व कर्जा चे पैसे मागतात. नाइलाजाने मान खाली घालून डोळ्यात पाणी आनुन सर्व ऐकत आहे.

नेते मंडळी व राजकीय लोकांनो तुम्ही स्वतःला शेतकरी चे कैवारी म्हुन मिरवता. शेतकरी बांधवांना ची अस्वस्थता तुम्हाला जानवत नाही का?

शेतकरी बांधवांनी जगाव कसं?

सरकार धान खरेदी करायला तयार नाही?

सावकार. बॅंक. उधारी वाले शेतकरी बांधवांना च्या मागे लागलेले आहेत.

शेतकरी बांधवांच्या घरची ही परिस्थिती फारच भयानक आहे.मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत. मुलीच्या लग्नाला पैसे नाहीत.आजारपण आले तर दवाखान्यात दाखल करायला पैसे नाही.

समुद्राच्या मधे जसे तहानेने मरावे तसी परिस्थिती निर्माण झाली आहे.

धान खरेदी केंद्र सुरू करा मायबाप हो.

आमच्या शेतकरी बांधवांचा फक्त मतदार म्हनुन उपयोग करु नका. आमची अवस्था तुम्हाला जानवत नसेल तर या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक मधे मत मागायला येवु नका.

येत्या ५ तारीख पर्यंत गोंदिया व भंडारा जिल्हा मध्यें धान खरेदी केंद्र सुरू न केल्यास आम्ही निवडणूक चा निशेध करु व समोर सर्व शेतकरी मिळुन आंदोलन सुरू करु.

 

कैलास रहांगडाले भजेपार.

शेतकरी गृप महाराष्ट्र राज्य

English Summary: I am talking about paddy growers of Gondia and Bhandara districts.
Published on: 02 December 2021, 08:14 IST