भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करून अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चात चांगला नफा मिळतो. थोडेसे व्यवस्थापन आणि काटेकोर काळजी घेतली तर भाजीपाल्याचे भरघोस उत्पादन हातात येते. भाजीपाला पिकांमध्ये शेतकरी विविध प्रकारच्या पिकांची लागवड करतात.
परंतु यामध्ये संकरित अर्थात हायब्रीड कारल्याची लागवड शेतकऱ्यांसाठी चांगला पैसा देऊ शकते. लेखात आपण संकरित कारली यांच्या लागवडीत होणारे फायदेखाली लागवड पद्धत या विषयी माहिती घेऊ.
नक्की वाचा:हिवाळ्यात या भाज्यांची लागवड करा आणि मिळवा बक्कळ पैसा; बाजारातही असते मागणी
अगोदर पाहू संकरित कारल्याच्या लागवडीतून मिळणारे फायदे
1- संकरित जातीच्या कारल्याला मोठ्या आकाराची कारले येतात व त्यांची संख्या देखील जास्त प्रमाणात असते.
2-संकरित कारल्याच्या आकाराचा विचार केला तर तो मोठा आणि रंगदेखील हिरवा गार असतो.
4- संकरित कारल्या पासून लवकर फळ धारणा होऊन उत्पादन लवकर हातात येते.
5- तुम्ही संकरित कारल्याची लागवड संपूर्ण वर्षभरात केव्हाही करू शकतात.
6- संकरित कारल्याच्या बाजारपेठेचा विचार केला नेहमी संकरित कारल्याला चांगला भाव मिळतो.
आता पाहू संकरित कारल्याची लागवड पद्धत
1- लागणारे हवामान आणि माती- या कारल्याची लागवड तुम्ही उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतुत करू शकतात. चांगली वाढ आणि फूल व फळ धारणेसाठी 25 ते 35 अंश सेंटिग्रेड तापमान मानवते. जमिनीचा विचार केला तर वालुकामय चिकण माती किंवा पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन यासाठी योग्य असते.
2- लागवड केव्हा करावी?- एका वर्षात दोनदा लागवड करता येते त्यामध्ये हिवाळ्यात लागवड करायचे असेल तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये करावी आणि उन्हाळी वाणांची लागवड ही पावसाळ्यामध्ये जून ते जुलैमध्ये करावी याचे उत्पादन हातात डिसेंबर पर्यंत येते.
3- खत व्यवस्थापन- लागवड करण्याआधी एका हेक्टर क्षेत्रात 25 टन शेणखत तसेच सऱ्यांमध्ये लागवडआधी 50 किलो डीएपी+ 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी मिक्स करावे. पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी 40 किलो युरिया आणि 50 दिवसांनंतर पुन्हा 30 किलो युरिया फुल व फळ धारणेच्या वेळी द्यावा.
4- बीजप्रक्रिया- लागवड करण्याअगोदर 500ग्राम( एका एकर साठी) कारल्याचे बियाणे बाविस्टीनच्या द्रावणात म्हणजेच दोन ग्रॅम एक किलो बियाणे या मापाने अठरा ते वीस तास भिजवावे. तसेच लागवडीपूर्वी या बिया सावलीत वाळवून घ्यावेत.
5- लागवड पद्धत- संकरित कारल्याची लागवड करताना दोन ते तीन इंच खोलीवर बिया लावाव्यात. दोन रोपांमधील अंतर 50 सेंटिमीटर व सऱ्यांची उंची 50 सेंटिमीटर पर्यंत असावी. पिकांसाठी मजबूत मंडप तयार करून घ्यावे जेणेकरून उत्पादन निरोगी हातात येईल व कारले खराब होणार नाही.
6- पाणी व्यवस्थापन- पावसाळ्यामध्ये संकरित कारल्याला कमी पाणी लागते परंतु उन्हाळ्यामध्ये गरज पाहून पाणी व्यवस्थापन करावे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेतामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
7- कारल्याचे काढणी केव्हा करावी?कारल्याचा किमान दोन तृतीयांश भाग नारंगी रंगाचा असेल तेव्हाच फळे तोडली पाहिजेत. कारण कमी पक्व असलेल्या भागांमध्ये बियांचे प्रमाण कमी विकसित झालेले असते व याउलट फळे जास्त पक्व झाली तर फळांना तडे आणि बिया नष्ट होतात.
Published on: 18 August 2022, 01:02 IST