Agripedia

हुमनी ही एक अतिशय नुकसान कारक बहुभक्षी कीड आहे. हुमनी अळी जमिनीमध्ये राहून विविध पिकांच्या मुळा कुरतडते. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. खरीप हंगामामध्ये मराठवाड्यामध्ये सोयाबीन, ज्वारी, कापूस, बाजरी,मका, तुर,हळद इत्यादी पिकावर हुमनी चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्याचे नुकसान होते.

Updated on 29 August, 2021 3:10 PM IST

हुमनी ही एक अतिशय नुकसान कारक बहुभक्षी कीड आहे. हुमनी अळी जमिनीमध्ये राहून विविध पिकांच्या मुळा कुरतडते. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. खरीप हंगामामध्ये मराठवाड्यामध्ये सोयाबीन, ज्वारी, कापूस, बाजरी,मका, तुर,हळद इत्यादी पिकावर हुमनी चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्याचे नुकसान होते.

 रब्बी हंगामामध्ये पेरणी झाल्यानंतर या पिकाच्या उगवणीनंतर हुमणीच्या अळ्या हरभरा, करडई, ज्वारी इत्यादी पिकाच्या मुळा खाण्याची शक्यता असते. रूप अवस्थेत मुळा कुरतडलेल्या मुळे  संपूर्ण रोपेजळून जाते.तसेच सध्या खरीप हंगामातील तुर, कापूस इत्यादी याकूब या पिकात देखील हुमणीच्या प्रादुर्भावामुळे अतोनात नुकसान होते.

 हुमनी आळी ची अवस्था जुलै ते नोव्हेंबर तसेच डिसेंबर पर्यंत असतेव नंतरही कोषावस्थेत जाते. म्हणून हुमणीच्या आळी पासून होणारे सध्या परिस्थितीतील  नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी सद्यस्थितीत रब्बी हंगामात देखील शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे हुमणीचे  व्यवस्थापन करावे.

रब्बी हंगामातील हुमणीचे एकात्मिक व्यवस्थापन

  • ज्या शेतकऱ्यांना रब्बी हंगाम घ्यावयाचा नाही त्यांनी पीक काढणीनंतर शेतामध्ये खोल नांगरट करावी व पाळी मारावी. त्यामुळे जमिनीतील ओलावा पृष्ठभागावर आल्यानंतर सूर्यप्रकाशामुळे किंवा पक्षी वेचुन खाल्ल्यामुळे त्याचे व्यवस्थापन होण्यास मदत होईल.
  • पिकांमध्ये शक्य असेल तर आंतरमशागत करावी व उघड्या पडलेल्या गोळ्या हाताने वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात बुडवून मारून टाकावे
  • पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापर करावा.
  • रब्बी पिकांची पेरणी करतेवेळी फोरेट दहा टक्के दाणेदार 25 किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात जमिनीत मिसळावे व जमिनीमध्ये खोल असणे आवश्यक आहे.
  • हुमणीच्या व्यवस्थापनासाठी मेटारायझियम ऍनिसोप्लिया उपयुक्त बुरशीचा दहा किलो प्रति हेक्‍टर या प्रमाणात जमिनीतून वापर करावा. ही बुरशी हुमणीच्याअळ्यांना  रोगग्रस्त करते. त्यामुळे अळ्यांचा बंदोबस्त होतो.

 

  • आळीला रोगग्रस्त करणाऱ्या सुत्रकृमी चा वापर करावा.
  • फिप्रोनील 40% + इमिडाक्लोप्रिड 40% हे मिश्र कीटकनाशक चार ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून ऊस या पिकाच्या झाडाभोवती आळवणी करावी.

सदर उपाययोजनाही केवळ सद्य परिस्थितीतील पिकांच्या हुमणीच्या अळ्या पासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी आहे. हुमनी च्या संपूर्णपणे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी सामुदायिकरीत्या दोन ते तीन वर्षे प्रौढ व अळ्यांचे  एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. विशेषता खरीप हंगामात मृगाचा पाऊस झाल्यानंतरहुमणीचे भुंगे कडूनिंब, बाभूळ,बोर इत्यादी झाडाच्या पानांवर रात्रीच्या वेळी भुंगे खात असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मिळून सामूहिक रीत्या बंदोबस्त करावा व त्यासाठी प्रकाश सापळ्यांचा उपयोग करावा.

English Summary: humani worm management in rubby season
Published on: 29 August 2021, 03:10 IST