Agripedia

पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्याबाबत महत्वाची गोष्ट म्हणजे बियाण्याची उगवण क्षमता.

Updated on 14 February, 2022 4:26 PM IST

आत्ता खरिपाच्या पेरण्याची लगबग सर्वत्र सुरू आहे.पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्याबाबत महत्वाची गोष्ट म्हणजे बियाण्याची उगवण क्षमता.

गेल्या वर्षीपासून सर्वत्र सोयाबीन आणि अन्य बियाण्याचा तुटवडा पडत आहे.त्यामुळे कृषी विभागाच्या आव्हानानुसार शेतकरी घरगुती बियाण्याचा वापर करताना दिसतात.परंतु योग्य उगवण क्षमतेअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवते परिणामी वेळ व पैशांचाही अपव्यय होतो यासाठी घरगुती बियाणे वापरण्याआधी उगवण क्षमता तपासणे खूप गरजेचे असते.

उगवण क्षमता म्हणजे काय? What is germination percentage in marathi?

पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाणापैकी कियी टक्के बियाणे निर्दोशरीत्या उगवू शकते. याला उगवण क्षमता म्हणले जाते.उगवण क्षमता नेहमी टक्केवारी मध्ये दर्शवली जाते.

बियाण्याची उगवण क्षमता तपासण्याच्या पद्धती Methods of calculating germination percentage

बियाण्याची उगवण क्षमता प्रयोगशाळेत उगवण कक्ष अर्थात जर्मिनेटर टॉवेल पेपर या सारख्या साधनांच्या मदतीने तपासली जाते.मात्र या साधनांव्यतिरिक्त घरगुती पद्धतीने देखील बियाण्याची उगवण क्षमता तपासली जाऊ शकते.

शोषकागदाच्या मदतीने उगवण क्षमता तपासणे

प्रामुख्याने लहान आकाराच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केला जातो.या पद्धतीमध्ये काचेच्या छोट्या प्लेटमध्ये कापूस अंथरून त्यावर शोषकागद ठेवला जातो.शोषकागद पाणी टाकून ओला केला जातो.त्यांनतर त्यावर बियाणे मोजून (शक्यतो 100) ठेवले जाते.प्लेट झाकून उगवण कक्ष अर्थात जर्मिनेटर मध्ये ठेवली जाते.प्लेट मध्ये पुरेसा ओलावा राहील याची काळजी घ्यावी .जर्मिनेटर उपलब्ध नसेल तर ७० टक्के किंवा अधिक आर्द्रता असणाऱ्या बंद खोलीत ठेवले तरीही चालू शकते.

टॉवेल पेपर मध्ये बियाणे उगवण क्षमता तपासणी

दोन टॉवेल पेपर ओले करून त्यामध्ये बियाणे मोजून (शक्यतो 100) ठेवावेत .त्या पेपर ची गुंडाळी करून त्याच्या खालील 3/4 भागाला मेणकागद (wax paper) गुंडाळावा.जर्मिनेटर मध्ये योग्य तापमान आणि आर्द्रता सेट करून त्यात ही बियाण्याची गुंडाळी ठेवावी.

वाळूमध्ये बियाणे उगवण क्षमता तपासणी

एका कुंडीमध्ये वाळू घेऊन ओली करावी व दीड ते दोन सेमी खोलीवर सारखे अंतर ठेवून बियाणे पेरावे. व सदर बियाणे ठेवलेल्या कुंड्या जर्मिनेटर मध्ये ठेवाव्या .आठ ते दहा दिवसांनंतर निरिक्षणे नोंदवावे.

घरगुती बियाणे उगवण क्षमता तपासणी

वर्तमानपत्राचे कागद चार पदरी घडी पाडून भिजवून घ्यावेत. त्यांनतर त्यात दहा बियाणे एका रांगेत ठेऊन गुंडाळी करावी अश्या 100 बियांच्या 10 गुंडाळ्या तयार कराव्यात व या गुंडाळ्या पॉलिथिन पिशवीमध्ये ठेवाव्यात चार दिवसांननंतर अंकुरित झालेल्या बिया मोजव्यात.

उगवण क्षमता तपासणीनंतर रोपांचे वर्गीकरण

विकृत रोपे-

ज्या रोपांची निरोगी वाढ न होता त्यांना इजा झालेली असते व ते अनुकूल परिस्थितीमध्ये उगवण्यास देखील समर्थ नसतात.त्यांना बुरशीचा संसर्ग झालेला असू शकतो.

कठीण बीज-

कठीण बीजाच्या कवचामुळे पाणी अथवा आर्द्रता बीजमध्ये जात नाही किंवा मूळ आणि खोड बाहेर येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.

बियाणांची उगवण क्षमता कशी ठरवावी /तपासावी. How to calculate germination percentage

वरील प्रमाणे उगवलेले बीज विकृत बीज आणि कठीण बीज अश्या वर्गवारीमध्ये उगवण क्षमता तपासणीसाठी ठेवलेले बियाणे वर्गीकृत करावे व प्रत्येक वर्गवारीमध्ये बियाण्यांची संख्या मोजावी.

उगवण क्षमता तपासणीचे सूत्र: formula of calculating germination percentage

वरील सूत्रामध्ये मोजेलल्या बियाण्याची संख्या टाकून उगवण क्षमता तपासली जाते.ही उगवण क्षमता टक्केवारी मध्ये मोजतात.उगवण क्षमतेच्या अचूक मोजमापासाठी कमीत कमी 800 बियाणे वापरावे मात्र 100 बियान्यांमध्ये देखील उगवण क्षमता तपासली जाऊ शकते.

 

उगवण क्षमतेवरून बियाण्याच्या मात्रेमध्ये बदल

उगवण क्षमता बियाण्याची मात्रा

७५-८०% १०-१५% अधिक

७०-७५% १५-२०% अधिक

६५-७०% २०-२५% अधिक

६०-६५% २५-३०% अधिक

उगवण क्षमतेवरून बियाण्याच्या मात्रेमध्ये बदल

English Summary: How to test the the seed germination
Published on: 14 February 2022, 04:26 IST