Agripedia

पिकाची उगवण झाल्यानंतर १० दिवसांनी नांगे भरावेत आणि आवश्यकतेनुसार पिकाची बारून विरळणी करून घ्यावी. साधारणपणे १५ ते १८ दिवसांनी करून कोळपणी करावी. तसेच ४० दिवसांनी बेणणी करावी.

Updated on 04 April, 2024 12:24 PM IST

मूग या पिकाला मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन मानवते. जमिनीची उभी-आडवी नांगरट करून ढेकळे फोडून माती बारीक करावी. फळी मारून जमीन सपाट करावी. योग्य आकाराचे सपाट वाफे करून दोन वाफ्यामध्ये पाण्याचे पाट ठेवावेत. मुगाची लागवड उन्हाळी हंगामात करावी. कमी कालावधीचे पीक असल्याने जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान मुगाची पेरणी करावी.

पेरणी अंतर व हेक्टरी बियाणे : लागवडीसाठी ३० सें.मी. x १० सें.मी. अंतर ठेवावे. हेक्टरी १५ ते २० जणांच्या किलो बियाणे वापरावे. बियाण्याला प्रती किलोस २.५ ग्रॅम प्रमाणे प्रथम बुरशीनाशकाची आणि शेवटी पेरणीपूर्वी २५ ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

खते : हेक्टरी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद पेरणीपूर्वी सरीमध्ये बियाण्याखाली देऊन मातीमध्ये करावी. मिसळून घ्यावे व त्यानंतर पेरणी करावी.

पाणी व्यवस्थापन: या पिकाला १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाच पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. काची फांद्या फुटण्याची वेळ, पीक फुलोऱ्यात असताना आणि शेंगामध्ये दाणे भरण्याच्या काळात पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.

आंतरमशागत : पिकाची उगवण झाल्यानंतर १० दिवसांनी नांगे भरावेत आणि आवश्यकतेनुसार पिकाची बारून विरळणी करून घ्यावी. साधारणपणे १५ ते १८ दिवसांनी करून कोळपणी करावी. तसेच ४० दिवसांनी बेणणी करावी.

पीक संरक्षण : पाने खाणारी अळी, तुडतुडे व मावा या किडींपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी गरजेनुसार ६०० मि.ली. प्रवाही मोनोक्रोटोफॉस ५०० लि. पाण्यात सरी मिसळून एक हेक्टर क्षेत्रावर फवारा द्यावा. करपा रोगांचा १५ प्रादुर्भाव आढळल्यास एक लीटर पाण्यात २.५ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड या प्रमाणात मिसळून फवारणी करावी

कापणी : शेंगा पक्व झाल्यानंतर म्हणजेच पेरणीनंतर साधारणतः ६० ते ७० दिवसांनी या पिकाच्या शेंगांची तोडणी करावी. शेंगांचा हिरवा रंग बदलून तो पिवळसर तपकिरी होऊ लागतो. त्यावेळी शेंगा तोडणीस तयार होतात. उशिरा वा कडक उन्हात तोडणी करू नये अन्यथा शेंगा तडकून उत्पन्नात घट होते. शेंगांची तोडणी शक्यतो सकाळी करावी म्हणजे शेंगा तडकत नाहीत. पक्व शेंगाची मोडणी दोन ते तीन वेळा करावी. त्यानंतर शेंगा उन्हामध्ये २ ते ३ दिवस सुकविल्यानंतर काठीच्या साहाय्याने दाणे वेगळे करावेत व स्वच्छ करावेत.

English Summary: How to plant summer moong Learn the technology
Published on: 04 April 2024, 12:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)