पिकांना स्लरी कशी बनवाल ; जाणून घ्या तिचे महत्त्व

29 April 2021 01:19 AM By: KJ Maharashtra
स्लरीचे महत्त्व

स्लरीचे महत्त्व

स्लरी हे कोणत्याही पिकाला फार फायदेशीर आहे.  परंतु अजूनही शेतकरी त्याकडे पूर्ण लक्ष देताना दिसत नाहीत. स्लरीचे जर बहु अंगी उपयोग पाहिले तर स्लरीशिवाय पर्याय नाही असे दिसून येते. या लेखामध्ये आपण स्लरी कशी बनवता व तिचे फायदे जाणून घेणार आहोत.

स्लरीचे वापराचे फायदे

 जर स्लरीचा उपयोग शेतात केला तर जमिनीमधील सूक्ष्म जिवाणू कार्यप्रवण होतात. कारण त्यांना ऊर्जा मिळते व त्या जिवाणूमुळे जमिनीतील महत्त्वाचे अन्नद्रव्य पिकांना सहजरीत्या उपलब्ध होतात. तसे स्लरी जमिनीचे भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म वाढविते. स्लरी च्या वापराने जमिनीची पोकळी वाढवून हवा खेळती राहते.  स्लरी मुळे मिनेरालिझेशन ची क्रिया लवकर होते. कारण हेच तयार झालेले इन ऑरगॅनिक स्वरूपातील अन्नद्रव्य विकत घेत असतात.  तसेच लहरीमुळे जमिनीचा कर्ब आणि नत्र यांचे गुणोत्तर टिकून असते.  जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट जास्त प्रमाणात असेल तर पिकाच्या मुळ्या ब्लॉक होतात. जर स्लरीचा वापर केला तर संबंधित प्रॉब्लेम येत नाही.

स्लरी कशी बनवावी?

 सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये मलमूत्र साठवण्याची योग्य अशी सोय असावी तसेच जनावरांची ताजी क्षण उन्हात न ठेवता सावलीत ठेवावे. स्लरी बनवण्यासाठी मुख्यतः तीनशे ते चारशे लिटर ची सिमेंटची टाकी असावी. स्लरी बनविताना वीस किलो शेण, दहा लिटर गोमूत्र, 200 ते अडीचशे लिटर पाणी सिमेंटच्या टाकीत टाकून चांगले हलवुन घ्यायचे. तसेच साधारणतः 300 ते 350 फळझाडांसाठी ताजे शेण 20 किलो, जनावरांचे मूत्र दहा लिटर,  निंबोळी पेंड 15 किलो,युरिया पाच किलो, सिंगल सुपर फास्फेट दहा किलो, पोटात पाच किलो आणि दोनशे ते अडीचशे लिटर पाणी या पद्धतीने मुख्य अन्नद्रव्यांची स्लरी बनवावी व साधारणपणे महिन्यातून एकदा तरी प्रति झाड एक लिटर याप्रमाणे वापरावी.

 स्लरीचे प्रकार

  • जिवाणू स्लरी व तिचे फायदे- नत्रयुक्त जिवानु सलरी मुळे हवेतील नत्र शोषले जाऊन ते पिकांना उपलब्ध करून दिले जाते. अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध करून दिले जाते. सेंद्रिय पदार्थांचे जलद विघटन होते.  बियाण्यांची उगवण क्षमता वाढवते.  पिकांची जोमदार वाढ व रोगप्रतिकारशक्ती वाढते. जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते तसेच रासायनिक खतांवरील खर्च कमी होतो.

 

जिवाणू स्लरी कशी बनवावी?

 ताजे शन वीस किलो, जनावरांचे मूत्र दहा लिटर, काळा गूळ दोन किलो, अॅसेतोबॅक्टर 500 ग्राम, फोस्फेट सोलुब्लिसिंग मायक्रो ऑरगॅनिझम 500ग्राम, पोटॅश मोबिलीझर 500 ग्राम, ई एम द्रावण एक लिटरव इतर जैविक बुरशीनाशके एक किलोग्राम, दोनशे लिटर पाणी.

  • सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य स्लरी

सूक्ष्म अन्नद्रव्य मुख्यतः झिंक फेरस हे जमिनीमध्ये असेच दिल्यास ते पिकाला पूर्णतः न लागता जमिनीत दुसऱ्या रूपात स्थिर होतात. म्हणून शक्यतो सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून देत असताना स्लरीचा स्वरूपात द्यावे.  ही स्लरी बनवतानावीस किलो ताजे शन,  जनावरांचे मूत्र दहा लिटर,निंबोळी पेंड 15 किलो, झिंक सल्फेट पाच किलो, फेरस सल्फेट तीन किलो, मॅग्नीज दोन किलो, कॉपर सल्फेट 100 ग्रॅम वजन 30 ग्रॅम

 दुय्यम अन्नद्रव्य स्लरी बनवतांना ताजे शेण  20 किलो, जनावरांचे मूत्र दहा लिटर,  निंबोळी पेंड 15 किलो,, कॅल्शियम 15 किलो, मॅग्नेशियम 15 किलो, गंधक दहा किलो,  दोनशे ते अडीचशे लिटर पाणी द्यावे.  या तयार मिश्रण आला दोन वेळेस चांगले हलवावे.सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य स्लरी मध्ये दहा ते बारा वर्षांचे अंतर ठेवावे.

 

3-कडधान्ये स्लरी- ताजेशेण   20 किलो,  गोमूत्र दहा लिटर, ह्युमिक ऍसिड व व्हर्मिवॉश दोन लिटर,  भरडा कडधान्य प्रत्येकी एक किलो ग्रॅम मुग,  मठ,चवळी,  हरभरा, मसूर, वाटाणा उडीद, ई एम द्रावण दोन लिटर व दोनशे ते अडीचशे लिटर पाणी

 स्लरी बनवल्यानंतर हे द्रावण पाच ते सहा दिवस ठेवायचे. तसेच दररोज सकाळी दोन मिनिट ठरवायचे व सातव्या दिवशी वापश्यावर जमिनीतून पिकाला आळवणी करावी. हे माप एक एकर क्षेत्रासाठी आहे.

स्लरी स्लरीचे फायदे
English Summary: How to make slari and know the importance

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.