शेतजमिनीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घ्यायचे असेल तर जमिनी जिवंत असल्या पाहिजे, म्हणजे जमिनीत जास्त प्रमाणात जिवाणू असले पाहिजे.1 मूठ भर मातीत करोडो जिवाणू असतात, आणि या जिवाणू मुळेच आपल्याला उत्पन्न मिळते, पण गेल्या 50 वर्षांपासून रासायनिक खतांचा आपण इतका वापर केला की ह्या जिवाणूंची संख्या आपण 10 टक्क्यांवर आणून ठेवली आहे ,असाच रासायनिक खतांचा सातत्याने वापर केला तर शेत जमिनी बंजर
,क्षारपड, खारट, नापीक,होतील.पुढे काही दिवसांनी अशा जमिनीत तणही उगवणार नाही.आपण कितीही रासायनिक खतांचा वापर केला तर ती खते जशीच्या तशी पिके ग्रहण करीत नाहीत तर त्या खतांवर प्रक्रिया करून पिकाना उपलब्ध करून देण्यासाठी जमिनीत मोठ्या प्रमाणावर जिवाणू असले पाहिजे,तरच जमिनीची उत्पादकता वाढेल.
रासायनिक खते हे जिवाणूंचे खाद्य नाही,जिवाणूंचे खाद्य आहे जमिनीतील सेंद्रिय कर्ब.जमिनीत असलेल्या सर्व प्रकारच्या कास्ट पदार्थांपासून हुमस तयार होतो, हुमस पासून सेंद्रिय कर्ब तयार होतो व हा सेंद्रिय कर्ब म्हणजे जिवाणूंचे खाद्य असतो, आपण जमिनीत टाकलेल्या खतांवर हे जिवाणू जैविक ,भौतिक रासायनिक क्रिया घडवून आणतात व ते पिकाला ग्रहण करण्या योग्य करण्याचे काम करतात, आपल्या जमिनीत असे काम हे जिवाणू अहोरात्र करीत असतात ज्या जमिनीत जीवसृष्टी जास्त असते अशा जमिनीचा सेंद्रिय कर्ब ही जास्त असतो, रासायनिक खतांचा भडिमार करून आपण आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब खूप कमी करून टाकलेला आहे.आणि म्हणून उत्तरोत्तर आपले उत्पन्न कमी कमी होत आहे.
म्हणून आपण जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे ,जमिनीचे आरोग्य सुधारल्या शिवाय, जमीन आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न देऊ शकणार नाही.जमिनीची उत्पादकता वाढविण्या साठी रासायनिक खतांचा वापर 50 वर आणून ,सेंद्रिय, व जैविक खतांचा वापर वाढवला पाहिजे.त्यासाठी शेणखत, गांडूळ खत, व्हर्मीवॉश, कंपोस्ट खत, ह्युमेंट, बाजारात मिळणारे चांगल्या प्रतीचे सेंद्रिय खत, पाझर तलावांचा गाळ, हरळीची खते, प्राण्यांचे मलमूत्र इत्यादी चा वापर केला पाहिजे .
जैविक खतात नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू, स्फुरद विरघडवणारे जिवाणू, पालाश उपलब्ध करून देणारे जिवाणू, इफ्फेक्टिव्ह मायक्रो ऑर्गग्नीझम (मेपल इ.एम जिवाणू), गांडूळ इत्यादी, यांचा वापर आपण केला पाहिजे तरच जमिनीची उत्पादकता वाढेल.
थोडक्यात म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवा, जिवाणूंची संख्या वाढवा उत्पन्नात आपोआप वाढ होईल.पीक हे सजीव आहे त्यालाही सर्व प्रकारच्या अन्न घटकांची आवश्यकता असते.
कार्बन, हायड्रोजन,ऑक्सिजन, क्लोरीन
याबरोबरच मुख्य अन्न द्रव्य दुययम व सूक्ष्म अन्न द्रव्ये
आपण संतुलित प्रमाणात जमिनीला पुरवली पाहिजे ,योग्य वेळी योग्य त्या त्या खतांचा वापर करून पिकाची प्रतिकार क्षमता वाढवली पाहिजे, पिकाची प्रतिकार क्षमता वाढली तर त्यावर रोगही कमी पडतात कीड नाशकेही कमी लागतात व उत्पन्नातही वाढ होते.
या व्यतिरिक्त वरील सर्व खतांचा पिकांना उपयोग होण्यासाठी ती खते पिकांना ग्रहण योग्य बनवण्यासाठी वर सांगितलेल्या सर्व जैविक खतांचा वापर अनिवार्य आहे, तरच शेतजमिनी पासून आपण मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेऊ शकू.
श्री शिंदे सर
9822308252
Published on: 04 March 2022, 12:26 IST