Agripedia

शेतकरी मित्रांनो आपण उत्पादन वाढीसाठी पिकाला अनेक प्रकारच्या रासायनिक खतांचा (Of chemical fertilizers) वापर करत असतो. खतांसाठी शेतकरी बांधव प्रत्येक हंगामाला हजार रुपये खर्च करत असतो, मात्र अनेकदा पिकाला खत लावून देखील पिकाची वाढ जोमाने होत नाही, याचे कारण खत डुप्लिकेट असणे देखील होऊ शकते. त्यामुळे आम्ही आज खास आमच्या शेतकरी वाचक मित्रांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत शेतकरी मित्रांनो आज आपण आपण वापरत असलेली खते नेमकी असली आहेत कि नकली हे कसे ओळखायचे (How to identify fake fertilizers) याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. जर आपल्याला वेळेत खत असली आहेत कि नकली हे जर समजले तर आपले हजारो रुपयांचे होणारे नुकसान यामुळे टळू शकते. अलीकडे खतांची काळाबजारी खुप वाढली आहे तसेच अनेक नकली खते देखील बाजारात उपलब्ध झाले आहेत.

Updated on 04 January, 2022 4:35 PM IST

अनेकदा यामुळे शेतकरी बांधवांना मोठ्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकरी बांधवांना आपणास खते ओरिजनल आहेत की डुप्लिकेट हे ओळखता आले पाहिजे. आज आम्ही सर्वात जास्त वापरले जाणारे खते डी. ए. पी., झिंक सल्फेट, युरिया अथवा एमओपी असली आहेत कि नकली हे कसे चेक करायचे याविषयी माहिती देणार आहोत. आणि प्रामुख्याने याच खतांची नकली प्रत बाजारात विक्रीसाठी बघायला मिळते. आज आम्ही पहिल्याच नजरेत अर्थात प्राथमिकदृष्ट्या (Primarily) खते नकली आहेत की असली हे कसे ओळखायचे हेच सांगणार आहोत. जेणेकरून खरेदी करतानाच आपल्या लक्षात येईल.चला तर शेतकरी बांधवांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या महत्वपूर्ण बाबीविषयी सविस्तर.

युरिया असली आहे का नकली याप्रकारे ओळखा

शेतकरी बांधवांनो जसे की आपणास ठाऊकच आहे युरियाचे दाणे सफेद चमकदार असतात, युरियाचे दाणे हे सारख्या आकाराचे आणि गोल असतात. युरिया चे दाणे पाण्यात पूर्णपणे विरघळून जातात (Urea are completely dissolved in water) तसेच युरिया पाण्यात विरघळल्यानंतर थंड लागतो. शेतकरी बांधवांनो आपण युरियाला गरम तव्यावर टाकले असता युरिया लगेच विरघळतो तसेच गॅस वाढवल्यावर युरिया पूर्णपणे गायब होऊन जातो. आपण या पद्धतीने युरिया असली है कि नकली हे चेक करू शकता.

डीएपी खत असली आहे का नकली कस ओळखणार

शेतकरी मित्रांनो डीएपीचे दाणे कडक, दाणेदार, भुरे, काळे, बदामी रंगाचे असतात. डीएपीचे दाणे कडक असतात त्यामुळे ते नख लावून दाबले असता फुटत नाहीत. शेतकरी बांधवांनो डीएपीचे काही दाणे हातात घ्या त्याला चुना लावून तंबाखूसारखे मळा, यातून जर तीक्ष्ण वास येत असेल तर डीएपी असली आहे असे समजावे. चुना लावून मळलेल्या डीएपी चा वास नाकाला सहन होत नाही. डीएपीला जर गरम तव्यावर टाकले तर त्याचे दाणे मक्या सारखे फुलू लागतात. आपण या पद्धतीने डीएपी असली आहे का नकली ओळखू शकता.

सुपर फास्फेट असली आहे का नकली कसे ओळखाल

सुपर फास्फेट दाणेदार भुरे काळे बादामी कलरचे असते. हे खत देखील नख दाबल्याने तुटत नाहीत. हे खत पावडर स्वरूपात देखील उपलब्ध होते. सुपर फास्फेट मध्ये अनेकदा डीएपी व एनपीके खतांची भेसळ केली जाते. याला ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे गरम तव्यावर याचे दाणे टाकले असता हे फुलत नाहीत.

English Summary: how to identify fake fertilizer own
Published on: 04 January 2022, 04:35 IST