Agripedia

आपण खरेदी केलेले कलिंगड हे आतून लाल नसते यामुळे आपला मूडच खराब होतो. मात्र हे तपासण्यासाठी देखील अनेक टिप्स आहेत. यामुळे तुमची फसवणूक होणार नाही. काही अशा खुना आहेत ज्या कलिंगडची क्वालिटी लक्षात आणून देणाऱ्या आहेत. उन्हाळ्यात कलिंगडच्या मागणीत वाढ होत आहे.

Updated on 01 April, 2022 5:07 PM IST

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून अनेक अनेक ठिकाणी पारा चांगलाच वाढला आहे. असे असताना उन्हाळ्यातील फळे देखील बाजारात आली आहेत. रोडच्या कडेला आता कलिंगडाची दुकाने सजली आहेत. यामुळे आपली पावले आपोआप तिकडे जातात. असे असताना अनेकदा आपण कलिंगड खरेदी करताना फसतो. आपण खरेदी केलेले कलिंगड हे आतून लाल नसते यामुळे आपला मूडच खराब होतो. मात्र हे तपासण्यासाठी देखील अनेक टिप्स आहेत. यामुळे तुमची फसवणूक होणार नाही.

काही अशा खुना आहेत ज्या कलिंगडची क्वालिटी लक्षात आणून देणाऱ्या आहेत. उन्हाळ्यात कलिंगडच्या मागणीत वाढ होत आहे. मात्र, वाढत्या दराप्रमाणेच (Watermelon Quality) कलिंगडही दर्जेदार असणे गरजेचे आहे. नाहीतर आपले पैसे वाया जाणार आहेत. गडद आणि हिरव्या रंगाचे साल असलेले कलिंगड हे गोड असण्याची शक्यता असते. तर एकसारखे पट्टे असणारे कलिंगडही गोड असते. यामुळे ते पाहूनच खरेदी करावे.

फिक्कट रंगाचे किंवा त्य़ापेक्षा वेगळे हे कलिंगड गोड असेलच असे नाही. त्यामुळे सालावरुन कलिंगड कोणत्या दर्जाचे आहे हे लक्षात येते. यामुळे याबाबत काळजी घ्यावी. आतून कलिंगड गुलाबी, पांढरे किंवा काळे असेल तर ते गोड नसते. त्यामुळे आतल्या रंगावरुनही तुम्ही कलिंगड चांगले आहे की नाही हे ओळखू शकता.

तसेच कलिंगडाचा वास घेऊन घेऊन देखील याबाबत तुम्ही माहिती घेऊ शकता. कलिंगड हे आतून गोड आणि रवाळ असेल तर त्याचा गोड वास येतो. जर कलिंगड खूप जुने किंवा आतून खराब आणि कडवट असेल तर त्याचा वास हा आंबट येतो. असा वास आल्यास ते खाण्यायोग्य किंवा चवीला चांगले नाही, असे लक्षात येते. यामुळे अनेकांना त्यांची किंमत देखील ठरवता येते.

महत्वाच्या बातम्या:
बातमी कामाची! सरकारचा एक निर्णय आणि लाखो शेतकऱ्यांचा फायदा, जाणून घ्या 'या' योजनेबद्दल
काळजावर दगड ठेवून शेतकऱ्याने केले 'ते' कृत्य, कारखान्याने काही वेळातच टाकली उसाला तोड..
काय सांगता! या आंब्याची किंमत आहे तब्बल 2.7 लाख रुपये, सुरक्षेसाठी आहेत 9 श्वान आणि 3 सुरक्षा रक्षक

English Summary: How to distinguish watermelon red and sweet to taste? Read the easy method ..
Published on: 01 April 2022, 05:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)