Agripedia

महाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म अर्थात लष्करी आळी ही मक्का, ऊस इत्यादी पिकांवर गंभीर रूप धारण करीत असून प्रचंड असे नुकसान करीत आहे. लष्करी आळी अर्थात स्पोडोप्टरा फ्रुगिपरडा ही अमेरिकेतील मका पिकावर उपजीविका करणारी कीड आहे. भारतामध्ये चा प्रादुर्भाव सर्वप्रथम जून दोन हजार अठरा मध्ये आढळला.

Updated on 17 April, 2021 4:47 PM IST

 महाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म अर्थात लष्करी आळी ही मक्का, ऊस इत्यादी पिकांवर गंभीर रूप धारण करीत असून प्रचंड असे नुकसान करीत आहे. लष्करी आळी अर्थात स्पोडोप्टरा फ्रुगिपरडा ही अमेरिकेतील मका पिकावर उपजीविका करणारी कीड आहे. भारतामध्ये चा प्रादुर्भाव सर्वप्रथम जून दोन हजार अठरा मध्ये आढळला.

खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात मका, ऊस तसेच ज्वारी सारखे पिकांचे या अ ळीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. म्हणून या किडीची वेळेस माहिती घेऊन येत्या खरीप हंगामात याच्याबद्दल जागृत करणे महत्त्वाचे आहे. या अळी  बद्दल या लेखात माहिती घेऊ. ही कीड अंडी- अळी- कोष आणि पतंग या चार अवस्थांमध्ये आपला जीवनक्रम पूर्ण करते. यातील अळी ही अवस्थापिकांसाठी अतिशय हानिकारक असून दरम्यान अळी  सहा वाढीच्या अवस्थांतून नंतर कोषावस्थेत जाते.या किडीच्या वाढीसाठी आद्रता युक्त हवामान व तापमान 20 ते 35 अंश सेल्सिअस पोषक असून पावसाळ्यात भारतातील हवामान या किडीची वाढ व प्रसार होण्यासाठी अनुकूल आहे. अगोदर या किडीच्या अवस्था समजून घेऊया.

  अंडी अवस्था

 अंडी अर्थात गोलाकार असून पानावर समूहात शंभर ते दोनशे अंडी आढळतात.  एक मादी सरासरी 1500 ते 2000 अंडी देते. अंडीपुंज क्या वर पांढर्‍या रंगाचे केसाळ आवरण असते. नंतर पिवळसर काळ्या  रंगाचे होऊन अळ्या बाहेर येतात. ही अवस्था साधारणतः दोन ते तीन दिवसांची असते.

   अळी अवस्था

 ही अवस्था शेतकऱ्यांच्या दृष्टीने अति महत्त्वाची असून ती सर्वसाधारणपणे 20 ते 30 दिवसांचे असते.  दरम्यानच्या मधल्या काळामध्ये अळी वाढीच्या सहा अवस्थांमधून जाते.

  • प्रथम अवस्था- प्रथम अवस्थेतील आळी अंड्यातून बाहेर आल्यानंतर कोवळ्या पानांवर उपजीविका करते. ही हिरव्या रंगाची असून डोकं काळ्या  रंगाचे असते या अवस्थेत अळी  साधारणतः तीन ते चार दिवस असते. त्यानंतर डोक्याचा रंग गडद केशरी रंगाचा होतो.

  • द्वितीय अवस्था- या अवस्थेतील अळी रंगाने साधारणतः तपकिरी रंगाचे असते. ही अवस्था दीड ते दोन दिवसाचे असते. या अवस्थेतील अळी खोडास छिद्र पाडून आत प्रवेश करते. तसेच पाने बाहेरून आत या बाजूस कुरतडून खाते.

  • तिसरी अवस्था- या अवस्थेतील अळी रंगाने साधारणतः तपकिरी रंगाचा असतो. ही अवस्था एक ते दोन दिवसांची असते. अळी खोडास छिद्र पाडून आत प्रवेश करते तसेच पाणी बाहेरून आतल्या बाजूस कुरतडून खाते.

  • चौथी अवस्था- या अवस्थेत अळीचे डोके लालसर तपकिरी रंगाचे असते तसेच पाठीवर दोन्ही बाजूस सरळ रेषेत गडत ठिपके असतात.  ही अवस्था देखील एक ते दोन दिवसांची असून यामध्ये आळीचे खाण्याचे प्रमाण वाढते.

  • पाचवी अवस्था- या अवस्थेत अळीचे डोके लालसर तपकिरी रंगाचे दिसते. तसेच पाठीवर दोन्ही बाजूस सरळ रेषेत गडद ठिपके दिसतात. ही अवस्था साधारणतः दोन ते अडीच दिवसांचे असून यामध्ये अ ळी पिकांचा फडशा पाडत असून खादाड म्हणून ओळखली जाते.

  • सहावी अवस्था- या अवस्थेत अळीच्या  अंगावरील गडद टीपके स्पष्ट दिसून येतात. तसेच डोक्यावर पांढऱ्या रंगाचा उल्टा वाय आकार स्पष्ट दिसतो.  या अवस्थेत सुरुवातीला अळी  मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान करते. ही अवस्था साधारण दहा साडेतीन ते चार दिवसांचा असते. त्यानंतर अळी कोषावस्थेत जाण्यासाठी मातीत शिरते व कोषावस्थेत जाते.

 

 कोषावस्था

 या अळीचा कोष जमिनीत 2 ते 8 सेंटिमीटर खोलीवर मातीच्या आत गुंडाळलेला आढळतो.जर जमीन कठीण असेल तर  कोषा  भोवती पानांचे तुकडे व मातेचे आवरण तयार केले जाते. कोश लालसर तपकिरी रंगाचे असून 14 ते 18 मी लांब असतात. ही अवस्था नऊ ते 30 दिवसांपर्यंत असू शकते.

 

 पतंग

 या किडीचा पतंग हा करड्या रंगाचा असून नर पत अंगामध्ये समोरच्या पंखावर राखाडी व तपकिरी रंगाच्या छटा असतात.  तसेच टोकाला व मध्य भागावर त्रिकोणी पांढरे ठिपके असतात. पतंगा चे मागील दोन्ही पंख चंदेरी पांढरे असून त्यावर आखूड,  गडद रंगाची किनार असते. पतंग हा निशाचर असून रात्रीच्या वेळी दमट व उष्ण हवामानात जास्त सक्रिय बनतात. यातील मादी पतंग मक्‍याच्या पोंग्यात कोवळ्या पानांवर वरच्या बाजूने पुंजक्याने अंडी घालतो. मातीचा जीवन काळ सर्वसाधारणपणे दहा ते बारा दिवसांचा असतो. एक मादी सरासरी हजार ते दोन हजार अंडी घालते.

 

या आळीमुळे होणारे नुकसानीचा प्रकार

 या किडीची अळी आपली उपजीविका पानांवर करते. सुरुवातीची अवस्था कोवळ्या पानांवर उपजीविका करतात नंतर पोंग्यात हॉल पाडून आत शिरतातव आतील भागावर आपली उपजीविका करतात. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेत अळी  काही वेळा पानाच्या कडा पासून आतल्या भागापर्यंत पाने खातात. नंतरच्या अवस्था या प्रामुख्याने मका पिकाचा वाढीचा भाग खातात, त्यामुळे तुरा बाहेर येत नाही. काहीवेळा ही कीड कणसांचे केसर खाते व नंतर कणसातील कोवळा भाग खाऊन टाकते.

एकात्मिक कीडनियंत्रण

 या किडीचा प्रादुर्भाव ओळखून वेळीच अळीच्या वाढीच्या  पहिल्या दोन ते तीन अवस्थांमध्ये योग्य उपाययोजना केल्यास नियंत्रण करणे सोपे जातेव नुकसान पातळी देखील कमीत कमी प्रमाणात ठेवता येते. हे नियंत्रण दोन प्रकारे करता येते.

जैविक नियंत्रण

  • अंड्यावर उपजीविका करणाऱ्या ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकाची हेक्‍टरी 50 हजार अंडी दहा दिवसांच्या अंतराने तीन वेळा शेतात सोडावीत.

  • नोमुरिया रिलाय या बुरशीजन्य कीटकनाशकांची दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

  • किंवा ई पी एन किंवा मेटारायझियम ची पाच ते सात ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे कीडग्रस्त शेतात फवारणी करावी.

भौतिक नियंत्रण

  • शक्य असल्यास अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत.
  • कीडीचा प्रादुर्भाव दिसून येताच अपंग यामध्ये वाळू टाकावी. असं केल्याने आईला मका पिकाच्या खोडातील भाग खाण्यापासून परावृत्त करता येईल व खोडाचे नुकसान होणार नाही.

रासायनिक नियंत्रण

 अळीच्या  वाढीच्या सुरुवातीच्या काळात निमार्क पंधराशे पीपीएम किंवा निंबोळी अर्क पाच टक्के याची पाच मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. अथवा थायमेथॉक्झाम 12.7 टक्के सोबत लॅमडा सिक्लॉथरीन 9.5% झेड सि या मिश्र कीटकनाशकांची 0.5 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास इमामेक्टीन बेंजोएट पाच एमजी या कीटकनाशकाची 0.4 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. मधु मका असल्यास स्पिनोसॅड 45 एम सी किटकनाशकाची 0.3 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. अथवा भाताचा भुसा दहा किलो व गूळ दोन किलो पाण्यात एकत्र भिजत ठेवावे व दुसऱ्या दिवशी त्याच 100 ग्रॅम थायोडीकार्ब 75 डब्ल्यू पी मिसळून लहान गोळ्या तयार कराव्यात अशा प्रकारे तयार गोळ्या मक्याच्या पोंग्यात  टाकाव्यात.

 

शेतात निरीक्षण कसे करावे?

शेतात दररोज निरीक्षण करावे. बाहेरील बाजूच्या तीन ते चार ओळी सोडून शेतातून इंग्रजी डब्ल्यू आकारात चालावे. या आकारातील प्रत्येक ओळीतील 5 अशी 20 झाडे निवडावीत. पैकी किती झाडांवर प्रादुर्भाव आहे याची नोंद घ्यावी. वीस झाडांपैकी दोन झाडे प्रादुर्भाव होत असतील तर नुकसान पातळी दहा टक्के आहे असे समजावे. जर पीक रोपावस्थेत अथवा मध्ये वाढीच्या अवस्थेत असेल तर नियंत्रणाचे उपाय योजणे गरजेचे आहे.

English Summary: How to control military larvae on maize, sugarcane
Published on: 17 April 2021, 04:47 IST