Agripedia

विदर्भामध्ये सध्या सोयाबीन पिकावर काही प्रमाणात प्रौढ खोडमाशी आढळून येते आहे. त्यामुळे सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सोयाबीन पिकाचे वेळीच सर्वेक्षण करून, या किडींचे त्वरीत नियंत्रण करणे गरजेचे आहे.

Updated on 14 July, 2021 6:43 AM IST

विदर्भामध्ये सध्या सोयाबीन पिकावर काही प्रमाणात प्रौढ खोडमाशी आढळून येते आहे. त्यामुळे सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सोयाबीन पिकाचे वेळीच सर्वेक्षण करून, या किडींचे त्वरीत नियंत्रण करणे गरजेचे आहे.

किडीची ओळख व नुकसान

या किडीचा प्रादुर्भाव पिकाचे रोप अवस्थेत झाल्यास झाडांची संख्या कमी होते. त्यामुळे पिकाची पुनर्पेरणी करावी लागते. अन्यथा उत्पादनात घट येण्याची शक्‍यता असते.
प्रौढ माशी :- लहान, चमकदार काळ्या रंगाची. लांबी 3 मिमी.
अळी ः अंड्यातून निघालेली अळी पाय नसलेली, फिक्कट पिवळ्या रंगाची, 2-4 मिमी लांब असते. ही अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करते. नंतर अळी पानाच्या देठातून झाडाच्या मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरून खाते.
प्रादुर्भावग्रस्त खोड चिरून पाहिल्यास पांढुरक्‍या रंगाची अळी किंवा लालसर कोष नागमोडी भागात दिसते. खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास कीडग्रस्त झाड वाळते व मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

 

नियंत्रण

खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत दिसत असल्या मुळे पाहिल्या 10 ते 15 दिवसात उपाय योजना करावी लागते. सुरुवातीला फोरेट (10 टक्के दाणेदार) 15 किलो प्रतिहेक्‍टर जमिनीत मिसळून द्यावे. सोयाबीन पेरणीनंतर प्रथम आंतर प्रवाही कीटकनाशक अर्थात थायमिथोक्झान 12.6 टक्के अधिक लाम्ब्डा सायहलोथ्रीन 9.5 टक्के यांची फवारणी घ्यावी. तसेच दूसरी फवारणी क्लोरानद्रनिप्रोल 18.5 टक्के मिली 10 लिटर पाण्यात किंवा इंडोक्साकार्य 15.8 टक्के ईसी हे 6.7 मिलि याप्रमाणे करावी.

 

मोठ्या झाडावर असा परिणाम दिसत नाही

मात्र, मोठ्या झाडावर प्रौढ माशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते. खोडमाशीची अळी तसेच कोष फांद्यात, खोडात असतो.अशा कीडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याचे वजन कमी होऊन उत्पादनात 16-30 टक्के घट येते.

English Summary: How is Khodmashi? How to control
Published on: 14 July 2021, 06:38 IST