म्हणजेच 'शेतकरी दाता होता आणि शहरात राहणारे याचक होते.' हरित क्रांती झाली परिणामी 'मागणीपेक्षा पुरवठा वाढला' शेतकऱ्यांचा खर्च वाढला परिणामी मग शेतकरी त्यांचा माल स्वत: बैलबंडीमध्ये भरून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्रीकरिता न्यायला लागला, म्हणजेच पूर्वीचा 'दाता असलेला शेतकरी हा याचक (भिकार) झाला' आणि 'शहरी ग्राहक दाता झाला'. त्यामध्ये बदल होऊन आता ऑनलाईनचा जमाना आला आहे. मग त्या बाबी शेतकऱ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. 'ई ट्रेडिंग'सारख्या व्यवसायामुळे तुमचा शेतमाल तुमच्याच घरी ठेवून त्याद्वारे तुम्ही मालाची विक्री करू शकता.
शेतकरी का मागे पडत गेला हे जर आता आपण समजून घेतले नाही, तर अजून कसा मागे जाईल यावर थोडी माहिती.
उदाहरण १: स्वातंत्र्य मिळाले तेव्हा थोड्याच लोकांना माहीत असेल, की एक डॉलरची किंमत ही एक रुपया एवढी होती; जी काही परिस्थितीमुळे वाढत-वाढत आज ७३ च्यावर गेली म्हणजे याचाच अर्थ आम्ही ७३टक्के गरीब झालो आहोत किंवा लुटल्या गेले आहोत हा सरळ अर्थ आहे.
उदाहरण २: अगदी अलीकडे १९६५ ला १ क्विंटल कापूस विकला, की दीड तोळा सोने मिळायचे, त्या काळी तोळा १२ ग्रॅमचा होता म्हणजेच १८ ग्रॅम सोने मिळायचे, आज १ क्विंटल कापूस विकला तर साधारणपणे ४,५०० रु. मिळतात,
म्हणजे आजच्या सोन्याच्या बाजारभावाप्रमाणे केवळ दीड ग्रॅम सोने मिळते, म्हणजे शेतकरी साडे सोळा (१६.५) ग्रॅमने लुटल्या जातोय. १९६५ ला कापसाचा उत्पादन खर्च फारच कमी होता आणि आज तो भरमसाठ वाढलाय, ते वेगळेच. हीच परिस्थिती ऊस वगळता इतर सर्वच पिकांची आहे.
स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताचा जगातील जीडीपीत २७ टक्के एवढा वाटा होता. (आज ३ टक्के आहे.) व भारताच्या जीडीपीत शेतीचा वाटा ५० टक्के होता, (आज १७ टक्के आहे.)
शेतीवर आधारित उद्योगसुद्धा साधारण २५-३० टक्के देशाच्या जीडीपीत सहयोग देत असत(कपडा, सिल्क, मसाले व इतर).
याचा अर्थ असा, की आपला मूळ शेती व्यवसाय हाच उत्तम व्यवसाय होता व साधारण फक्त पावसाच्या पाण्यावर आणि निसर्गाच्या भरवशावर तो होत होता. आज परिस्थिती बदलली आहे. ज्यात कालवे, धरणे, बोअर वेल असे स्रोतसुद्धा आहेत. तरी शेती परवडत नाही याचे कारण समजून घेऊ यात.
जगात जीवसृष्टीकरिता पाणी व ऑक्सिजन या सारखे सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे 'अन्न'.
अन्न पिकवितो कोण? तर 'शेतकरी'. शेतकऱ्यास अन्न पिकविण्यासाठी व अधिक उत्पन्न घेण्यासाठी काय हवे असते ते म्हणजे.
१. सुपीक जमीन
२. मुबलक पाणी
३. मार्केट व योग्य भाव
वरील तिन्ही गोष्टींचे वर्षानूवर्षे योग्य व्यवस्थापन जे अगोदर राजे-राजवाडे करीत असत व नंतर देशांतर्गत सरकार करीत असत किंवा आहे.
आता गंमत समजून घेऊ.
जर भारतात शेती व शेती निगडित व्यवसायाचा वाटा जीडीपीत साधारण ७० टक्के होता व जगाच्या जीडीपीत २७ टक्के होता, तर तो देश पुढे जाऊन (म्हणजे येत्या ५० वर्षांत) नक्कीच जगात वर्चस्व प्रस्थापित करेन व अन्न-धान्याच्या जोरावर जगाची अर्थव्यवस्था कंट्रोल करेन. मग यास कसे थांबवावे व जगाची अर्थव्यवस्था कशी ऑइल किंवा डॉलरवर आणावी यांसाठी सुरू झाले ते षड्यंत्र, कारस्थाने ज्यात आपल्याच संधीसाधू व भ्रष्ट लोकांनी साथ दिली.
हे करण्यामागे खरे कारण होते ते म्हणजे जागतिक लोकसंख्या व त्यांच्या अन्न-धान्य, कपडे व इतर गरजा पुरविणे व तेही स्वस्तात स्वस्त. मग भारत जर शेतीप्रधान होता व भारत अधिक बळकट झाला, तर भारतीय शेती व अन्न-धान्य हे त्यांच्या चलना एवढ्या भावात त्यांना विकत घ्यावे लागेल, म्हणजे जर भारतात गहू १५ रु. किलो असेल तर अमेरिकेस तो $१५ एवढा घ्यावा लागेल व भारताची मोनोपॉली होईल (जशी आज अमेरिकेची आहे) व भारत जागतिक महासत्ता बनेल.
हे ओळखून मागील ७० वर्षांचा अभ्यास केला, तर कळेल की का भारतात प्रत्यक्ष राज्य न करतासुद्धा परकीय सत्तेच्या प्रभावामुळे शेती, वीज, पाणी, धरणे, कालवे व निगडित व्यवस्था हवी तशी विकसित होऊ दिली नाही किंवा केली नाही. इतर पुढारलेल्या देशांची परिस्थिती प्रथम व द्वितीय महायुद्धात एवढी ढासळली होती की जेवढी आपली स्वातंत्र्य मिळाले तेव्हा होती तेवढीच.
परंतु आपल्याकडे होते ते म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेली उत्तम शेती व भरपूर नैसर्गिक संसाधने .
आपल्याला प्रगती करण्यासाठी त्यावेळी इतर देशांइतकीच संधी होती; परंतु परिस्थिती म्हणा, परकीय शक्तीचा दबाव म्हणा किंवा चुकीची लीडरशिप म्हणा, आपण मागील ७० वर्षांत आपली जी ५० टक्के शेती आधारित जीडीपी होती ती नक्कीच ७५-८० टक्क्यांवर नेऊन अख्ख्या जगात ५०-६० टक्के वाटा घेऊन अधिराज्य केले असते.
प्रत्येक गावात तलाव, कालवे, धरणं, रस्ते व ऑनलाईन मार्केट, गोडाऊन, शीतगृहे व्हायलाच पाहिजे होते.
हे करणे तर शक्य होते; परंतु आपण एक नव्हतोच व अजूनही नाही म्हणून आज शेतकऱ्यांवर ही परिस्थिती आली व याच परिस्थितीचा फायदा घेऊन परत नवनवीन पक्ष, नेते पुढे येताहेत जे परत तेच करतील जे मागील ७० वर्षांत केले किंवा झाले.
असो परंतु यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग कोणता व कसा? हे जाणून घेऊ या.
सर्वप्रथम, आजची नैसर्गिक परिस्थिती बघता व देशावरील आर्थिक कर्ज, गुंतागुंतीची अर्थव्यवस्था व जगातील रस्सीखेच, कपटी स्पर्धा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे गावापासून तर दिल्ली पर्यंतची घाणेरडी पॉलिटिक्स आणि झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान बघता, आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना, गावातील लोकांना एकनिष्ठ पध्दतीने कार्य करावे लागेल. ते म्हणजे
१. आपल्या शेतातील, गावालगत नदी, नाले, तलाव खोलीकरण करणे.
२. शक्य तिथे पाणी अडविणे व जिरवणे.
३. शेतावरील प्रत्येक बांधावर झाडं लावणे.
४. फक्त आणि फक्त कमी खर्चाची सेंद्रिय शेतीच करणे,
५. 'अधिक उत्पादनाच्या' मागे न लागता 'अधिक
आज पाहण्यात येते की दैनंदिन जीवनात एवढी स्पर्धा असूनही आणि तंत्रज्ञान दररोज बदलत असताना शेतकरी ते समजून घेण्याऐवजी देव देव, हरी हरी करीत बसतात, भाकडकथा आणि कुणीतरी आयोजित केलेली प्रवचने वा भागवत ऐकत बसतात, पायदळवारी यामध्ये रममाण होतात. अशांना सांगावेसे वाटते, की 'प्रपंच करावा नेटका' या उक्तीप्रमाणे प्रथम प्रापंचिक जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे सांभाळून आणि कुटुंबातील लोकांच्या गरजेनुसार पैसाअडका गाठीला बांधल्यानंतर मग परमार्थ करण्याऐवजी अनेक लोक जे स्वत: पायावर धड उभे नाहीत, किंवा घरची म्हणते देवादेवा आणि बाहेरचीला साडी चोळी शिवा किंवा स्वत:ची खरकटी ठेवून, असे लोक नको ते उद्योग करताना जेव्हा मी पाहतो तेव्हा मन खिन्न होते.
जैविक शेतकरी
शरद केशवराव बोंडे.
९४०४०७५६२८
Published on: 28 December 2021, 03:11 IST