यावर्षी परतीचा पाऊस चांगला झाला त्यामुळे तुर पिकाची वाढ उत्तम आहे व पीक सुद्धा चांगले येणार आहे. आपल्याकडे तुर या पिकामधील सोयाबीन कापणी झाली आहे .या तुर पिकांमध्ये खोल मशागत करू नये, शक्यतोवर रोटावेटर करूच नये कारण वरचा भाग भुसभुशीत दिसत असला तरी जमीन ओलसर असल्यामुळे खालील भाग टणक येतो व त्यामुळे मुळी अडचणीत येते . तरी शक्यतोवर तन किंवा काडीकचरा नसेल तर आंतर मशागत नाही
केली तरी चालेल किंवा करावयाची झाल्यास अगदी वरचे हाताने हलकी आंतरमशागत करावी Even if it is done, it will work or if it has to be done, lightly inter-cultivate with the upper hand जेणेकरून सक्रिय मुळ्या/ जारवट तुटणार नाही ही काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
४ ऑक्टोबरला शेगाव तहसिलवर शेतकरी शेतमजुरांचा आसुड मोर्चा प्रशांत डिक्कर यांची घोषणा.
तूर या पिकांमध्ये दुसरे कमी उत्पादन येण्याचे कारण म्हणजे वेळेवर पीकसंरक्षण . बहुतेक शेतकरी फुले येण्याची वाट बघतात नंतर फवारणी करतात असे न करता कळी दिसावयास लागली म्हणजेच पिकावर फवारणी करावी कारण कळी वरती फुले उमलण्याच्या आधी फुलपाखरं अंडी घालतात व
अळी बाहेर पडून फुले उमलल्या पूर्वी कळी खाऊन टाकतात तरी कळी अवस्थेत पहिली कीटकनाशकाची फवारणी करावी त्यामध्ये (डायथेन एम-45 + कार्बनडॅझिम ) 30 ग्रॅम + इमामेक्टीन बेंजोएट 10 ग्रम + क्लोरोपायरीफॉस 35 मिली +सूक्ष्म मूलद्रव्य 25 ग्राम प्रति पंपास (15 लिटर) घेऊन फवारणी करणे व नंतर 12 ते 15 दिवसांनी दुसरी फवारणी बाराझाइड, इविसेन्ट, आॅम्लीगो,फेनास क्कि या पैकी एक
फवारणी करावी किंवा क्लोरोअल्ट्रानीलीप्रोल 7 मिली प्रति पंपास (15 लिटर) घेऊन फवारणी करणे यानंतर शक्यतोवर फवारणीचे काम पडणार नाही तरी पण गरज भासल्यास तिसरी फवारणी करणे .बहुतेक वेळा तूर या पिकाला पाणी देताना अति पाणी दिल्या जाते त्यामुळे ही उत्पादनात घट येणे किंवा अपरिपक्व दाणे( मुकंन) जास्त प्रमाणात तयार होऊन प्रत खालावते. म्हणून तूर या पिकाला पाणी देताना कळी येण्याची व्यवस्था व दुसरे पाणी फुलं गळून शेंगा पकडल्यानंतर पाणी देणे.
Published on: 28 September 2022, 07:26 IST