Agripedia

चक्रीवादळे नेमकी कशी तयार होतात त्यांना नावे कशी मिळतात, भारताच्या पूर्व किनाऱ्यावरच सर्वाधिक चक्रीवादळे का निर्माण होतात, याचा वेध

Updated on 04 October, 2021 8:36 AM IST

चक्रीवादळाची निर्मिती कशी होते?

समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती चोहोबाजूंनी येणाऱ्या वाऱ्यांमुळे वादळ तयार होते वातावरणातील उष्ण व आर्द्र हवेचा सततचा पुरवठा हे चक्रीवादळाच्या निर्मितीचे प्रमुख कारण आहे. समुद्राचे तापमान हा चक्रीवादळाच्या निर्मितीचा मोठा घटक ठरतो. समुद्रात २६ डिग्री अंश सेल्सि अंश तापमान ६० मीटर खोलीपर्यंत असणे, हे त्यासाठी पोषक ठरते.

चक्रीवादळ विध्वसंक का ठरते?_चक्रीवादळात वाऱ्यांचा वेग त्याने केलेल्या विध्वंसाचे मुख्य कारण ठरते. या वाऱ्यांमध्ये असलेल्या बाष्पाच्या प्रमाणामुळे चक्रीवादळ जेथून प्रवास करते तेथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे पूरही येऊ शकतो.

सायक्लोन, टायफून, की हरिकेन,

चक्रीवादळांना जगभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखण्यात येते

हिंदी महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळांना इंग्रजीत सायक्लोन, वेस्ट इंडिज बेटे आणि अटलांटिक महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळांना हरिकेन तर चीनचा समुद्र आणित पॅसिफिक महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळाला टायफून असे संबोधण्यात येते. ऑस्ट्रेलियात चक्रीवादळांना विली-वि‌लीस असे म्हटले जाते. जेव्हा वादळ जमिनीवर तयार होते तेव्हा त्याला टोरनॅडो असे म्हणतात.

परादीपचे चक्रीवादळ

१९९९ मध्ये भारतातील ओदिशा हे राज्य सर्वात विध्वंसक चक्रीवादळाला सामोरे गेले. या वादळाला १९९९ चे चक्रीवादळ किंवा सायक्लोन 05-बी किंवा परादीपचे चक्रीवादळ असेही संबोधण्यात येते भारतीय हवामानखात्याच्या परिभाषेत हे सुपर सायक्लोनिक स्टॉर्म होते. २५ ऑक्टोबर १९९९ ला मलय द्वीपकल्पाच्या आसपास तयार झालेले हे चक्रीवादळ २९ ऑक्टोबरला भारता ओदिशाच्या भुवनेश्वरजवळ थडकले. सरकारी नोंदींनुसार या चक्रीवादळात आणि नंतर झालेल्या मुसळधार पावसात सुमारे १० हजार व्यक्तींनी प्राण गमावला होता.

चक्रीवादळाचे मापन कसे होते?

चक्रीवादळाच्या तीव्रतेचे मापन श्रेणींमध्ये (कॅटेगरी) करण्यात येते. चक्रीवादळातील वाऱ्यांच्या वेगावरुन त्याला श्रेणी देण्यात येतात. हे वारे ताशी ९० कि.मी. ते कमाल ताशी २८० कि.मी. या वेगाने वाहतात. वाऱ्यांच्या वेगावरच त्याची विध्वंसक शक्ती अवलंबून असते.

 

वातावरणीय स्थितीवाऱ्यांचा वेग (प्रतितास किमीमध्ये)

कमी दाबाचा पट्टा (लो प्रेशर) -३२ पेक्षा ‌कमी

कमी दाब (डिप्रेशन) - ३२ ते ५०

खोल कमी दाबाचे क्षेत्र (डीप डिप्रेशन) - ५१ ते ५९

चक्रीवादळ (सायक्लोन‌कि स्टॉर्म) - ६० ते ९०

तीव्र चक्रीवादळ (सिव्हिेअर सायक्लोन‌कि स्टॉर्म) - ९० ते ११९

अतितीव्र चक्रीवादळ (व्हेरी सिव्हिअर सायक्लोन‌कि स्टॉर्म) ११९ ते २२०

सुपर सायक्लोन - २२० पेक्षा अधिक

 

बंगालच्या उपसागरात सर्वाधिक वादळे का?

भारताच्या दोन्ही बाजूंनी समुद्र असूनही सर्वाधिक वादळे बंगालच्या उपसागरातूनच जन्माला येतात. याचे कारण लपले आहे दोन्ही समुद्रांच्या तापमानात. बंगालच्या उपसागराचे तापमान मान्सूनआधी आणिर मान्सूननंतर अरबी समुद्राच्या तुलनेत उबदार असते. त्यामुळे पावसाआधी किंवा नंतर खास करून ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे तयार होण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. त्यातही वैश‌ष्ट्यिपूर्ण बाब म्हणजे भौगोल‌कि रचना. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्याला पूर्व भारताजवळ तिन्ही बाजूंनी जमीोन असल्याने वाऱ्यांना कमी जागा मिळते. त्यामुळेच ते अध‌कि विध्वंसक बनतात. याच्या उलट अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळाला आजूबाजूला केवळ समुद्र असल्याने ते लवकर विरते. बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ आणिर अरबी समुद्रात तयार होणारे चक्रीवादळ यांतील गुणोत्तर ४ : १ आहे.

 

बंगालच्या उपसागरातील भीषण चक्रीवादळे

ग्रेट बोहा सायक्लोन, बांगलादेश (१९७०) : तीन ते पाच लाख जण मृत्यमुखी

हुगळी रिव्हर सायक्लोन, भारत आणि बांगलादेश (१७३७) : तीन लाख मृत्युमुखी

कोरिंगा, भारत (१८३९) : तीन लाख मृत्युमुखी

बेकरगंज सायक्लोन, बांगलादेश (१८७६) : दोन लाख मृत्युमुखी

ग्रेट बेकरगंज सायक्लोन, बांगलादेश (१८९७) : दोन लाख मृत्युमुखी

अरबी समुद्रात १८८२ मध्ये निर्माण झालेल्या ग्रेट बॉम्बे सायक्लोनमुळे सर्वाधिक विध्वंस झाला होता या वादळात सुमारे एक लाख नागरिकांना जीव गमवावा लागला होता, असे समजते.

जगात आतापर्यंत नोंदविण्यात आलेल्या ३५ सर्वात विध्वंसक चक्रीवादळांपैकी २६ चक्रीवादळे बंगालच्या उपसागरात तयार झालेली होती दोन दशकांत चक्रीवादळाशी संबंधित मृत्युंपैकीमध्ये ४२ टक्के मृत्यू एकट्या बांगलादेशात झाले आहेत. त्यात भारताचा वाटा २७ टक्के आहे.

 

चक्रीवादळांची नावे कशी ठरतात?

दरवेळी कुठलेही चक्रीवादळ तयार झाले की त्याला दिले जाणारे नाव कुतूहल निर्माण करते मग ते पायलीन असो की फयान, हुदहुद, असो की निलोफर, ही नावे कशी दिली जातात. त्यामागे कोणती प्रक्रिया असते, हे जाणून घेण्याची जिज्ञासा सगळ्यांनाच असेत. चक्रीवादळांना हवामान खात्याच्या सांकेतिक आणि शास्त्रीय नावांनी ओळखण्याऐवजी त्यांना त्या त्या देशातील वैशिष्टपूर्ण नावे देण्याचा प्रघात १९५० च्या दरम्यान सुरू झाला. आधी गंमतीने महिलांची नावे या चक्रीवादळांना

दिली जात अमेरिकेत चक्रीवादळाला आजही महिलांचेच नाव दिले जाते. भारतीय उपखंडात थडकणाऱ्या चक्रीवादळासाठी रिजनल स्पेशलाइज्ड मेटिअरोलॉजिकल सेंटर, दिल्ली ही नावे ठरवते.

 

चक्रीवादळाची नावे ठरवताना पुढील निकष पाळले जातात

नावे छोटी आणि लक्षवेधी असावीत.

नाव सामाजिक-धार्मिक तेढ निर्माण करणारे नसावे.

उपखंडातील त्या-त्या देशाची ओळख किंवा वैशिष्ट्यपूर्ण बाब त्यात असावी.

 

अलीकडील चक्रीवादळे

मारुथ - सप्टेंबर २०१७ (बंगालचा उपसागर)

मोरा - मे २०१७ (बंगालचा उपसागर)

वरदाह - डिसेंबर २०१६

ओखी

सागर

 

चक्रीवादळ निवारण केंद्र

चक्रीवादळ, पुरापासून रक्षण करण्यासाठी किनारी भागात ‘सायक्‍लॉन शेल्टर’ उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोकणातील पहिले सायक्‍लॉन शेल्टर सैतवडे (ता. रत्नागिरी) येथे उभारले जाणार आहे. त्यासाठी पावणे चार कोटी खर्च अपेक्षित आहे. प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापनकडे पाठविण्यात आला आहे. राज्यातील मान्यता मिळालेल्या 29 चक्रीवादळ निवारा केंद्रांपैकी चार केंद्रे रत्नागिरीत उभारण्यासाठी जागांचा शोध सुरु आहे.

 

ओडीशात 2000 पूर्वी चक्रीवादळाने थैमान घातले होते त्यामध्ये उध्वस्त झालेल्या नागरिकांच्या निवाऱ्याची सोय नव्हती. त्यावेळी केंद्र सरकारने चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला पहिल्या टप्प्यात पश्‍चिम बंगालमध्ये केंद्र उभारले दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गुजरात राज्यांचा समावेश आहे. 2015-16 च्या राज्य अर्थसंकल्पात नऊ जिल्ह्यांमध्ये आश्रयस्थाने बांधण्यासाठी 28.16 कोटीची तरतूद केली.

 

जागतिक बॅंकेच्या साह्याने

नॅशनल सायक्‍लोन रिस्क मिटींग प्रोजेक्‍ट (एनसीआरएमपी) अंतर्गत हा कार्यक्रम राबविला जात आहे जागतिक बॅंकेचा 75 तर 25 टक्के राज्य सरकारचा वाटा आहे. चक्रीवादळात शाळा आणि इतर संस्थांचा तात्पुरत्या सुविधांसाठी वापर केला जातो. तो आता बंद केला जाणार आहे चक्रीवादळे आता नेहमीच निर्माण होत आहे व नुकसान पण होत आहे ओडीसा, आंध्रा पंश्चिम बंगाल यांना दर वेळी झटका बसत आहे.

संकलन - प्रवीण सरवदे , कराड

प्रतिनिधी गोपाल उगले

 

English Summary: How are hurricanes formed?
Published on: 04 October 2021, 08:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)