फळबाग लागवडीसाठी जमिनीची उपयुक्तता असते महत्त्वाची,जाणून घ्या कोणत्या फळबागासाठी कशी लागते जमीन
जमिनीत फळबाग लागवड करताना जमिनीची निवड ही सगळ्यात महत्त्वाचे असते. जमिनीचा पोत चांगला नसला तर फळबागेची वाढ समाधानकारक होत नाही. त्यासाठी फळबाग लागवडीपूर्वी जमिनीची योग्यता तपासून घेणे गरजेचे असते. त्या लेखात आपण विविध प्रकारच्या फळबागेची लागवड करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीची माहिती घेऊ.
फळबागांचे विविध प्रकार व त्यांना लागणारी जमीन
आंबा- आंब्यासाठी लालसर पोटाची जमीन उत्तम असते. जमिनीचा सामू 6 ते 7.2 पर्यंत असावा. चोपण जमीन, खूप हलकी, कठीण मुरूम असणारी जमीन आंब्यासाठी आयोग्य असते. डोंगर उताराच्या जमिनीवर आंब्याचे उत्पादन कमी मिळते. चुनखडीचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी असावे. खूप खोलीच्या चिकन माती अधिक असणाऱ्या जमिनीत आंबा लागवड टाळावी. कारण अशा जमिनीत क्षारांचे प्रमाण अधिक आणि कमी पाण्याचा निचरा होतो. जमिनीचा उतार माफक असावा व पावसाचे पाणी साठून राहू नये. खूप उताराच्या जमिनीत पाणी वाहून जाण्याचे प्रमाण अधिक असल्याने आंबा पिकास पाणी वारंवार द्यावे लागते.
चिकू- चिकूची वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत लागवड करतात. चिकू साठी खोल जमीन,वालुकामय पोयटा, उत्तम निचरा होणारी जमीन चांगली असते. जमिनीचा सामू सहा ते आठ पर्यंत असावा. उथळ जमीन व कडक मुरूम, पाषाण आणि अधिक चुनखडी असणाऱ्या जमिनीत चिकूची लागवड करू नये. पाण्यातून जाणाऱ्या क्षारांना चिकू प्रतिबंधक आहे.
पेरू- पेरू साठी हलकी वालुकामय पोयटा व चिकन पोयटायुक्त जमीन उत्तम असते. नदीकाठच्या जमिनीत पेरू चांगले उत्पादन मिळते. पेरूची मुळे वरच्या थरात अधिक असतात. पेरू साठी जमिनीचा सामू साडेचार ते 8.2 यादरम्यान असला तरी मानवतो.
डाळिंब- डाळिंब साठी उत्तम निचरा असणारी हलकी ते मध्यम जमीन असावी. जमिनीचा सामू साडेपाच ते सात इतका असावा.चोपन, क्षारयुक्त जमिनीत डाळिंबाची लागवड करू नये. चिकन माती भरपूर असलेल्या जमिनीत निचऱ्याच्या प्रश्न असल्याने अशा जमिनीत डाळिंब लावू नये. हलक्या जमिनीत आकर्षक रंगाचे व चांगल्या प्रतीच्या डाळिंबाचे उत्पादन मिळते.
लिंबूवर्गीय फळझाडे- लिंबू हे बर्याच प्रकारच्या जमिनीत चांगले उत्पादन देते.पण तरीसुद्धा पाण्याचा चांगला निचरा असणाऱ्या जमिनीत विशेषतःपोयट्याच्या किंवा वालुकामय पोयटात पिकाचे उत्पादन चांगले मिळते.क्षार युक्त, चिकन माती युक्त आणि जास्त चुनखडीयुक्त जमिनीत लिंबू व इतर फळझाडांची वाढ मंदावते.जमिनीचा सामू साडे पाच ते साडे सहा असल्यास या फळझाडासफायदा होतो.
सिताफळ- सिताफळाची लागवड हलक्या ते वालुकामय पोयट्याच्या जमिनीत करावी. खूपच चिकन माती असणाऱ्या जमिनीत मुळकुज होण्याच्या शक्यतेने अशा जमिनीत सीताफळाची लागवड करू नये. जमिनीचा सामू 6.5 ते 7.6असल्यास वाढीस फायदा होतो.
आवळा-आवळ्या साठी क्षारयुक्त आणि चोपण जमीन असली तरीदेखील उत्पादन चांगले मिळते. आवळा साठी जमिनीचा सामू साडेसहा ते साडेनऊ इतका असला तरी उत्पादन चांगले मिळते.
पपई-पपई लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची जमीन आवश्यक असते.गाळाची जमीन उत्तम,जमिनीचा सामू साडेसहा ते सात दरम्यान असावा. पपईची मुळे खूप खोल जात असल्याने जमिनीची खोली कमी असली तरी पपई लागवड करता येते.जमिनीत पाणी साठले तर पिकास खूप हानिकारक ठरते. म्हणून खूप काळ्या जमिनीत पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत पपई लागवड करू नये.
आंबे कृषि चिकू फळबाग फळबाग लागवड शेतकरी शेतजामिन शेती
Published on: 05 February 2022, 02:56 IST