Agripedia

लॉकडाऊनच्या काळात अनेकजणांनी स्वतला बागकामांमध्ये गुंतवून घेतलं. जेव्हा झाडांची पाने काही कारणामुळे किंवा कीडमुळे पाने खराब होत असतात तेव्हा त्यांना खूप दुख होत असते. परंतु लॉकडाऊनमुळे बाहेर जात नसल्याने झाडांच्या बचावासाठी त्यांना औषध घेता येत नाही. यावर आम्ही एक उपाय सांगत आहोत, तो म्हणजे घरच्या घरी कीटकनाशके insecticides तयार करण्याचा.

Updated on 27 May, 2020 5:33 PM IST


लॉकडाऊनच्या काळात अनेकजणांनी स्वतला बागकामांमध्ये गुंतवून घेतलं. जेव्हा झाडांची पाने काही कारणामुळे किंवा कीडमुळे पाने खराब होत असतात तेव्हा त्यांना खूप दुख होत असते. परंतु लॉकडाऊनमुळे बाहेर जात नसल्याने झाडांच्या बचावासाठी त्यांना औषध घेता येत नाही.  यावर आम्ही एक उपाय सांगत आहोत, तो म्हणजे घरच्या घरी कीटकनाशके insecticides तयार करण्याचा. हे कीटकनाशके बनवून आपण आपल्या बागेचे रक्षण करु शकता.  यातील  पहिले कीटकनाश आपण पाहू...

दोम चमचा  निंबाच्या तेलात एक चमचा  कोणताही द्रव साबण २ लेकर० मिली पाण्यात मिक्स करा. या स्प्रेचे आपल्या झाडे वाचविण्यासाठी उपयोग करा.

 ऑल इन वन स्प्रे

एक लसूण आणि एक कांदा घ्यावा. दोघांची बारीक पेस्ट करावी. त्याता एक चमचा लाल मिरची पावडर टाकावी. हे मिश्रण दोन तास असेच राहू द्यावे. या मिश्रणात एक लिक्विड सोप liquid soap मिसळावे. स्प्रे करतांना २५० मिली पाणी यात टाकावे मग स्प्रे करावे.

 


ऑईल स्प्रे  - एका बाटलीत एक कप गोडेतेल भाजी बनविण्यासाठी वापरण्यात येणारे तेल घ्यावे. एक चमचा ऑईल आणि साबण त्यात मिसळावे. जेव्हाही हे स्प्रे वापराचे आहे, तेव्हा २५० मिली पाण्यात दोन चमचा ऑईल स्प्रे मिळवून  चांगली मिश्रित करावे. याची फरवाणी झाडांच्या वरती करावी.

गार्लिक स्प्रे  (लसूण स्प्रे )

या स्प्रे साठी लसणाच्या दोन गाठी घ्याव्यात. थोडसं पाणी मिसळून याची पेस्ट करावी. ही पेस्ट एका भांड्यात टाकावे यात २५० मीली मिसळावे. हे मिश्रण एक रात्रभर असेच राहू द्यावे.  दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण उपयोग करण्यासाठी घेऊ तर तेव्हा लसूण हे खाली तळाला गेले असतील.  याला दुसऱ्या भांड्यात टाकावे. त्यात एक चमचा व्हेजिटेल तेल टाकावे आणि liquid soap यात टाकावे. जेव्हा याचे फरवाणी कराल तेव्हा  एक कप मिश्रणात २५० मिली पाणी टाकावून फरवाणी करावी.

 

English Summary: homemade insecticide save our garden, know the making method of spray
Published on: 27 May 2020, 04:48 IST