चाळिशी हा आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. या वयात शरीरातील दुरुस्ती यंत्रणा कमजोर होते. याचं कारण शरीराचं नियंत्रण करणाऱ्या संप्रेरकांचं – म्हणजे हॉर्मोन्सचं प्रमाण कमी होतं. परिणामी स्नायूंचा लवचीकपणा कमी होतो. ते आखडतात. सांध्यात हालचालीच्या वेळी त्यांच्यात घर्षण होतं. त्यामुळे शारीरिक हालचाली करताना गुडघे दुखायला लागतात.
वयाच्या चाळिशीनंतर साधारण प्रत्येकालाच थोडयाफार प्रमाणात गुडघेदुखी जाणवते. जिन्याची चढ-उतार करणं, मांडी घालून किंवा उकिडवं बसता येणं, चालताना, पळताना होणाऱ्या हालचाली करणं या सर्व शारीरिक हालचाली अवघड होत आहेत याची जाणीव दिवसेंदिवस वाढते आणि रोजचे कामकाज करणंही अवघड होतंय हे लक्षात येतं.
मग मित्रमंडळीत किंवा कुटुंबात चर्चा करताना सर्वांनाच या वयात हा त्रास जाणवतो हे समजतं. आपण हळूहळू म्हातारे होत आहोत याची जाणीव होते
हे घरगुती उपचार करून पहा
व्हिटॅमिन डी चे सेवन उत्तम
जी माणसे दमट किंवा थंड हवामानात राहतात त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता असते.. मात्र जे भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा भागात राहतात त्यांच्या मध्ये व्हिटॅमिन ‘डी’ ची डेफिशिएन्सी नसते.
खाद्यपदार्थातून सुद्धा शरीराला भरपूर व्हिटॅमिन ‘डी’ मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला अवोकॅडो, मश्रूम्स, अंडी, मासे आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे लागेल.
आपला आहार योग्य आहे का?
डॉक्टर्स देखील आंबट पदार्थ, अति स्निग्ध पदार्थ जसे की मटण, मास, चिकट पदार्थ जसे की मैदा वगैरे वर्ज्य सांगतात सांधेदुखी मध्ये.ह्याचे कारण असे आहे की आपले मोठे आतडे ह्या पदार्थांमुळे नीट काम करत नाही.. त्यामुळे हे मोठे आतडे शरीरातील बॅक्टेरिया विसर्जित करण्या ऐवजी रक्तात मिसळायला मदत करते.
आणि आपली इम्युन सिस्टीम आपल्याच टिश्यूज वर हमला करते.ह्यात नुकसान स्नायूंचे होते. जॉइन्ट्सवरच्या स्नायूंचे नुकसान झाले तर अर्थरायटीस होतो.
त्यामुळे आहारावर लक्ष असणे अत्यंत गरजेचे आहे.. आतड्याचे आजार उद्भवू नयेत आणि शेवटी त्यांचे रूपांतर अर्थरायटीस मध्ये होऊ नये म्हणून आहारात पुढील पदार्थ नक्की घेऊ शकता.
भाज्या,फळे,कडधान्ये,डाळी आले :
ह्यातले जिंजरॉल नावाचे द्रव्य अर्थरायटीस थांबवायला मदत करते.
ओमेगा ३ असलेले पदार्थ आवर्जून खा
ओमेगा ३ फॅटी ऍसिड हे शरीरातील इंफ्लेमेशन बरे करते आणि अर्थरायटीसचा त्रास निर्माण करण्याच्या प्रक्रियेलाही थांबवते असे डॉक्टर्स सांगतात.
इतकेच नाही तर हे ओमेगा ३ शरीराचे मेटाबॉलिझम वाढवतात.. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणारे योद्धे आपले वजन झपाझप कमी करू शकतात.
आणि वजन कमी होणे म्हणजेच अर्थरायटीस होण्याची शक्यता कमी होणे असेही गणित आहेच.
म्हणून हे ओमेगा ३ फॅटी ऍसिड शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे.. सगळ्या प्रकारचा सुकामेवा जसे की अक्रोड, बदाम आणि मासे जसे की टुना, सारडीन, रावस ह्यांच्या सेवनाने भरपूर ओमेगा ३ मिळते.
मालिश सर्व प्रकारच्या सांधेदुखीवर हा एकच उत्तम उपाय आहे. तिळाचे तेल, मोहरीचे तेल, एरंडेल तेल ही स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेले काही तेलाचे प्रकार आहेत जे वेदना कमी करण्यासाठी सांध्यांवर लावता येतात.
त्यानंतर अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टरांना प्रकृती दाखवल्यावर, तेही काही दिवस नवीन औषधोपचार, फिजिओथेरपी करण्याचा सल्ला देतात आणि उपचारांनी बरं वाटलं नाही, तर गुडघ्याची कृत्रिम सांधारोपणाची शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचं सांगतात. शस्त्रक्रिया करण्याने किती रुग्ण बरे झाले याची आकडेवारी देतात आणि शस्त्रक्रिया करण्याचा आग्रह धरतात.
शस्त्रक्रियेचा सल्ला ज्यांना मानवत नाही किंवा परवडत नाही, ती मंडळी पुन्हा आपल्या जुन्या उपचाराकडे वळतात. ज्यांना हा सल्ला पटतो, आर्थिकदृष्टया परवडतो, ते रुग्ण शस्त्रक्रिया करून घेऊन मोकळे होतात. शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यातील वेदना तर आजिबात नाहीशा झालेल्या असतात, म्हणून थोडा उत्साह वाढतो, पण शारीरिक हालचालीत फारशी सुधारणा झाल्याचं जाणवत नाही. तज्ज्ञ डॉक्टर धीर देतात. औषधं, विश्रांती आणि फिजिओथेरपी यातून सुधारणा होईल असं आश्वासन देतात. मांडी घालून बसणं कसं अनावश्यक आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतात.
शस्त्रक्रिया, औषधं, फिजिओथेरपी हे सर्व उपचार पुढे काही दिवस केल्यानंतर आपण पूर्णपणे बरे झालो नाही असं रुग्णाला हळूहळू वाटायला लागतं. कारण त्याच्या अपेक्षा खूप असतात आणि त्या काही पूर्ण झालेल्या नसतात. आपण थोडया प्रमाणात विकलांग झालो आहोत का? आपलं काही चुकलं कां? असे प्रश्न त्याच्या मनात यायला लागतात. त्याचं हिंडणं, फिरणं, उत्साह आणि आत्मविश्वास हळूहळू ढासळायला लागतो.
हे असं कां होतं? आधुनिक वैद्यकशास्त्रातील अत्याधुनिक पध्दतीने केलेली ‘कृत्रिम सांधारोपण’ शस्त्रक्रिया रुग्णाला समाधान का देत नाही? याचं एकमेव कारण म्हणजे हे उपचार बाहेरून केलेले, कृत्रिम स्वरूपाचे आहेत.
व्याधीचं नेमकं कारण काय आहे
याचं खरं ज्ञान हे जाणून घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा आणि नेमका तोच होत नाही. प्रामुख्याने सांध्यांची झालेली झीज हे प्रमुख कारण अधिक असते. त्यामुळे ही झीज भरुन काढणारी न्युट्रीशन थेरपी (Food supplement) उत्तम.
व्याधीचे नेमके कारण जाणून, मूळ जाणून घेऊन जर त्यावर उपचार झाले तर रुग्णाला शारीरिक तसेच मानसिक रित्या बरे वाटायला लागते आणि हे झालेली झीज भरुन काढणारी न्युट्रीशन थेरपी (Food Supplements) आणि व्यायाम याच्या मदतीने सहज शक्य आहे.
Published on: 02 April 2022, 01:54 IST