Agripedia

महाराष्ट्र राज्यामध्ये हळदीचे सर्वात जास्त उत्पादन हे हिंगोली जिल्ह्यामध्ये घेतले जाते. हे उत्पादन वाढण्यामागे एक कारण सुद्धा आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत परिसरात हळदीची लागवड करण्यापूर्वी केळीची लागवड केली जायची मात्र केळी पिकांवर वाढती रोगराई पाहून केळीच्या उत्पादनात घट होत होती त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक बदल करण्याचा निर्धार केला होता जे की केळी पिकानंतर शेतकऱ्यांनी थेट हळद लागवड करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये बदल तर केला तसेच उत्पादन ही भेटले मात्र उत्पादनात सातत्य राहिले नाही जे की वातावरण बदलाने हळदीच्या पिकावर सुद्धा करपा आणि हुकमी रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे हळद पिकाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Updated on 17 February, 2022 6:52 PM IST

हळदीवर हुमणी अन् करप्याचा प्रादुर्भाव :-

मध्यंतरी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे तर नुकसान झाले आहेत पण त्यासोबत ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्यामुळे हळदीच्या पिकावर करपा आणि हुकमी रोगाचा ही प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे हळदीच्या उत्पादनात चांगल्याच प्रमाणत घट झालेली आहे. येत्या हंगामामध्ये हळद पिकाची लागवड करण्यासाठी बियाणे तरी भेटतायत की नाही अशी अवस्था झालेली आहे जे की बियाणांची किमंत वाढली असून शेतकरी नामर्जी असून हळदीची लागवड करत आहेत. उगाच पडीक क्षेत्र राहील म्हणून शेतकरी हळदीच्या बियाणांची लागवड केली होती. बियाणांची लागवड झाली आणि अंतिम टप्यात करपा तसेच हुमणी रोगाचा प्रादुर्भाव हळदीच्या पिकावर झाला.

हळदीला एकरी 50 हजार रुपये खर्च :-

अगदी मोजक्या क्षेत्रामध्ये घेतले जाणारे पीक म्हणजे हळदीचे पीक होय. विविध प्रकारची हळद असते जे की हळदीच्या गुणधर्मावर तिची ओळख निर्माण होते. हळदीची लागवड करण्यापासून ते पीक काढणी पर्यंत सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचा सरासरी खर्च येतो. या ५० ते ६० हजार खर्चामध्ये बियाणे खरेदी, लागवड, खते, औषध फवारणी, मजुरी, काढणी झाल्यानंतर त्यास शिजवणे आणि त्याची फिनिशिंग प्रक्रिया चा समावेश आहे. जर हळदीच्या पिकाला प्रति क्विंटल ८ ते ९ हजार रुपये दर मिळला तरच पीक परवडते अथवा शेतकऱ्यांचे नुकसान होते. जरी निसर्गाच्या संकटामुळे हळदीच्या उत्पादनात घट झाली असली तरी यंदा दर चांगला भेटला असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे हळदीच्या उत्पादनात घट :-

अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे तर नुकसान झाले आहेच पण त्या सोबत ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने हळदीच्या पिकावर करपा तसेच हुकमी रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे उत्पादनात घट निर्माण झाली पण याचा जास्त असा काय परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थव्यस्थेवर झालेला नाही जे की यंदा हळदीला चांगले दर भेटले असल्यामुळे शेतकरी खुश आहेत.

English Summary: Hingoli farmers gettting more profit from Turmeric crop
Published on: 17 February 2022, 06:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)