Agripedia

सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीचीलगबग सुरू आहे. रब्बी हंगामामध्ये बहुतांश ठिकाणी गव्हाची लागवड केली जाते. गव्हाची लागवड करताना शेतकरी चांगले उत्पादन आणि गुणवत्ता असलेली गव्हाच्या वरायटीला प्राथमिकता देताना दिसत आहे.

Updated on 15 October, 2021 2:09 PM IST

 सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीची लगबग सुरू आहे. रब्बी हंगामामध्ये बहुतांश ठिकाणी गव्हाची लागवड केली जाते. गव्हाची लागवड करताना शेतकरी चांगले उत्पादन आणि गुणवत्ता असलेली गव्हाच्या वरायटीला  प्राथमिकता देताना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय कृषि अनुसंधान संस्था क्षत्रिय स्टेशन इंदोर यांनी गव्हाची एक वरायटी विकसित केलीआहे. या वरायटी चे नाव आहे एचआय 1636. या लेखात आपण या वरायटी विशेष जाणून घेणार आहोत.

कोणत्या राज्यांसाठी आहे उपयोगी?

 गव्हाची ही प्रजाती मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेश च्या झासी विभागासाठी उपयोगी मानली गेली आहे.

या जातीची वैशिष्ट्ये

  • एचआय 1636 या गव्हाच्या प्रजातीचा दाण्याचा आकार आयताकार असतो.
  • या प्रजातीमध्ये झिंक (44.4पीपीएम), आयर्न(35.7 पीपीएम ) आणि प्रोटीन 11.3 असून त्यासोबतच बायो फोर्टिफाइड मोठ्या प्रमाणात आढळते.

या गव्हाच्या प्रजाती चा लागवडीचा कालावधी

  • गव्हाच्या या प्रजाती ची लागवड 5 ते 15 नोव्हेंबर पर्यंत करणे चांगले असते.
  • जर शेतकऱ्यांनी या जातीची लागवड वेळेत केली तर चांगले उत्पादन मिळवण्याची शक्यता असते.

पाण्याची व्यवस्था

 

  • जर शेतकऱ्यांनी गव्हाच्या एचआय 1636 या जातीची लागवड केली तरया जातीसाठी 20 ते 24 दिवसाच्या अंतरात तीन ते चार वेळेस पाणी देण्याचा सल्ला दिला आहे.
  • पक्वतेच्या कालावधीमध्ये जास्त पाणी देऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.

या जातीपासून मिळणारे उत्पादन

 जर शेतकऱ्यांनी चांगली मेहनत घेऊन गव्हाच्या एचआय 1636 या जातीची लागवड केली तर योग्य नियोजनाने प्रति हेक्‍टर सरासरी 56.6 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.( स्त्रोत-eKISAN)

English Summary: HI 1636 is most benificial veriety of wheat crop
Published on: 15 October 2021, 12:33 IST