Agripedia

यावर्षी परतीचा पाऊस चांगला झाला त्यामुळे तुर पिकाची वाढ उत्तम आहे

Updated on 19 August, 2022 5:47 PM IST

यावर्षी परतीचा पाऊस चांगला झाला त्यामुळे तुर पिकाची वाढ उत्तम आहे व पीक सुद्धा चांगले येणार आहे.आपल्याकडे तुर या पिकामधील सोयाबीन कापणी सुरू आहे .या तुर पिकांमध्ये खोल मशागत करू नये, शक्यतोवर रोटावेटर करूच नये कारण वरचा भाग भुसभुशीत दिसत असला तरी जमीन ओलसर असल्यामुळे खालील भाग टणक येतो व त्यामुळे मुळी अडचणीत येते . तरी शक्यतोवर तन किंवा काडीकचरा नसेल तर आंतर मशागत नाही

केली तरी चालेल किंवा करावयाची झाल्यास अगदी वरचे हाताने हलकी आंतरमशागत करावी जेणेकरून सक्रिय मुळ्या/ जारवट तुटणार नाही ही काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.It is very important to take care not to break the sprouts.तूर या पिकांमध्ये दुसरे कमी उत्पादन येण्याचे कारण म्हणजे वेळेवर पीकसंरक्षण . बहुतेक शेतकरी फुले येण्याची वाट बघतात नंतर फवारणी करतात असे न करता कळी दिसावयास लागली म्हणजेच पिकावर फवारणी करावी कारण कळी वरती फुले उमलण्याच्या आधी फुलपाखरं अंडी घालतात व

अळी बाहेर पडून फुले उमलल्या पूर्वी कळी खाऊन टाकतात तरी कळी अवस्थेत पहिली कीटकनाशकाची फवारणी करावी त्यामध्ये (डायथेन एम-45 + कार्बनडॅनजिम ) 30 ग्रॅम + फायटर 30मी.ली + मोर 50मी.ली प्रति पंपास (15 लिटर) घेऊन फवारणी करणे वनंतर 12 ते 15 दिवसांनी दुसरी फवारणी O2 1ग्रॅम प्रती एकर + फायटर 30मी.ली.प्रति पंपास (15 लिटर) घेऊन फवारणी करणे यानंतर शक्यतोवर फवारणीचे काम पडणार नाही तरी पण गरज भासल्यास तिसरी फवारणी करणे . क्युट 4मी.ली 15लि.पाण्यासाठी

बहुतेक वेळा तूर या पिकाला पाणी देताना अति पाणी दिल्या जाते त्यामुळे ही उत्पादनात घट येणे किंवा अपरिपक्व दाणे( मुकंन) जास्त प्रमाणात तयार होऊन प्रत खालावते.म्हणून तूर या पिकाला पाणी देताना कळी येण्याची अवस्था व दुसरे पाणी फुलं गळून शेंगा पकडल्यानंतर पाणी देणे.पाणी द्यावयाचे असल्यास फुलं शेट होउन शेंगा धरल्या नंतर पाणी उपलब्ध असल्यास एक पाण्याची पाळी देणे .मागील तीन-चार वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी तीन ते चार पाण्याच्या पाळ्या दिल्या त्या शेतकऱ्यांना उत्पादनात मोठी घट आल्याचा अनुभव आहे. 

 

राहुल सुर्यवंशी

9657573220

7875433538

English Summary: Here are some simple tips to increase production of turmeric
Published on: 19 August 2022, 05:47 IST