Agripedia

शेत तयार करण्यापुर्वी वापरावे. रुंद पानांचे तण उगवणीपुर्वी आणि उगवणीनंतर देखिल नियंत्रण करते. पिक लागवडीपुर्वी शेताची मशागत करुन मगच लागवड करावी. लागवड करण्याच्या ९० ते १२० तास अगोदर वापरावे.

Updated on 10 November, 2021 1:17 PM IST

मिरचीचे शेत तयार कऱण्यापुर्वी

तणनाशकातील घटक - ऑक्झिफ्लोरफेन, व्यापारी/कृषी केंद्रातील नाव - गोल

पिक लागवडीपुर्वी शेताची मशागत करुन मगच लागवड करावी. लागवड करण्याच्या ९० ते १२० तास अगोदर वापरावे.

तयार केलेल्या शेतावरिल तण नियंत्रण

तणनाशकातील घटक - पॅराक्वेट, व्यापारी/कृषी केंद्रातील नाव - ग्रामोक्झोन

तण १ ते ६ इंचाचे असतांना वापरावे. तणसोबत उगवुन आलेले किंवा पुर्नलागवड केलेले रोप देखिल मरुन जाते, त्यामुळे लागवड करण्यापुर्वी वापरावे. दुपारच्या उन्हात फवारणी केलेली जास्त फायदेशिर ठरते.

तणनाशकातील घटक - ग्लायफोसेट , व्यापारी/कृषी केंद्रातील नाव - ग्लायसेल, राउंडअप

तणाच्या उंचीवर बहुतांशी नियंत्रण अवलंबुन असते. पिक पेरणी (पुर्नलागवड नव्हे) च्या तिन दिवस आधी पर्यंत वापर केलेला चालतो.

मिरचीचे शेत उगवणीनंतर

तणनाशकातील घटक - पेंडीमेथिलिन , व्यापारी/कृषी केंद्रातील नाव - टाटा पनिडा, स्टॉम्प

पुर्नलागवड केलेल्या मिरची साठीच उपयुक्त, लागवड करण्यापुर्वी किंवा लागवड केल्यानंतर वापरता येते. फवारणी करतांना जमिनीला चिकटुन फवारणी करावी, मिरचीच्या पानांवर उडाल्यास पिकास इजा पोहचते, काळजी पुर्वक फवारणी घ्यावी.

 तणनाशकातील घटक - ऑक्झिफ्लोरफेन , व्यापारी/कृषी केंद्रातील नाव - गोल

फवारणी करतांना जमिनीला चिकटुन फवारणी करावी, मिरचीच्या पानांवर उडाल्यास पिकास इजा पोहचते, काळजी पुर्वक फवारणी घ्यावी.

 तणनाशकातील घटक - मेटाक्लोर , व्यापारी/कृषी केंद्रातील नाव - मॅचेट

फवारणी करतांना जमिनीला चिकटुन फवारणी करावी, मिरचीच्या पानांवर उडाल्यास पिकास इजा पोहचते, काळजी पुर्वक फवारणी घ्यावी.

(जरी वरिल माहिती उपयुक्त आहे तरी तणनाशक शिफारस स्व-जबाबदारी वर वापरावे!)

 

श्री. विनोद धोंगडे नैनपुर 

ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर

English Summary: Herbicides on pepper and its use
Published on: 10 November 2021, 01:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)