Agripedia

पिकांच्या अधिक उत्पादनासाठी योग्य वेळेत तन नियंत्रण करणे आवश्यक असते. तण नियंत्रणासाठी एकात्मिक कीडनियंत्रण पद्धतीचा अवलंब करणे महत्त्वाचे असते. परंतु मजुरांची कमतरता असल्यामुळे पीकनिहाय योग्य तणनाशकांचा वापर करावा. तसे पाहायला गेले तर एकात्मिक त्यांना नियंत्रणाच्या विविध प्रकारच्या पद्धती आहेत.यामध्ये पेरणीपूर्व मशागत,लागवड करताना ची मशागत,पिकांची आंतरमशागत, तणनाशकांचा वापर इत्यादी पद्धतींचा समावेश होतो.

Updated on 17 November, 2021 8:38 PM IST

पिकांच्या अधिक उत्पादनासाठी योग्य वेळेत तन नियंत्रण करणे आवश्यक असते. तण नियंत्रणासाठी एकात्मिक कीडनियंत्रण पद्धतीचा अवलंब करणे महत्त्वाचे असते. परंतु मजुरांची कमतरता असल्यामुळे पीकनिहाय योग्य तणनाशकांचा वापर करावा. तसे पाहायला गेले तर एकात्मिक त्यांना नियंत्रणाच्या विविध प्रकारच्या पद्धती आहेत.यामध्ये पेरणीपूर्व मशागत,लागवड करताना ची मशागत,पिकांची आंतरमशागत, तणनाशकांचा वापर इत्यादी पद्धतींचा समावेश होतो.

पिकांमधील तणनियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर करताना लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या बाबी:

  • तणनाशकाची निवड, वापरावयाचे प्रमाण व वेळ इत्यादींबाबत योग्य माहिती असावी.
  • शक्यतो पीक पेरणीनंतर, परंतु उगवणी पुर्वीची तणनाशक वापरावेत. उदा. एकदल पिकांमध्ये ऍट्राझीन, द्विदल पिकासाठी पेंडीमेथिलिन
  • उभ्या पिकातील तणनियंत्रणासाठी सुद्धा तणनाशकांचा वापर करता येतो.मात्र त्यासाठी पिकांचा वर्ग माहीत असणे आवश्यक आहे.
  • उभ्या पिकांमध्ये तणनाशकांचा चांगला परिणाम दिसण्यासाठी तने दोन ते चार पानावर असतांना फवारणी करावी.
  • तणनाशकाची फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. किमान दोन ते तीन तास सूर्यप्रकाश असावा.
  • पाठीवरील साधा फवारणी पंप वापरावा. फ्लॅट पेन किंवा फ्लड जेट नोझल चा वापर करावा. फवारणीचाअंश पिकावर जाऊ नये यासाठी वाऱ्याचा वेग कमी असताना फवारणी करावी.

पिकनिहाय तणनाशक

  • हरभरा-वेळ- पिक उगवणीपुर्वी

तणनाशक प्रति हेक्‍टरी प्रति 300 लिटर पाणी पेंडीमेथिलिन (30 टक्के ) 2.5 लिटर

 टीप- पेरणी नंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी करावी.

  • मका-

वेळ- पिक उगवणीपुर्व

 तणनाशक- प्रति हेक्‍टरी प्रति 300 लिटर पाणी ऍट्राझीन (50 डब्ल्यू पी ) 1000 ग्रॅम

  • कांदा-

वेळ- पिक उगवणीपुर्वी

 तणनाशक- प्रति हेक्‍टरी प्रति 300 लिटर पाणी

ऑक्सीफ्लोरफेन (10 टक्के) एक लिटर किंवा पेंडीमेथिलिन ( तीस टक्के ) 2.5 लिटर

 

 टीप- ऑक्सीफ्लोरफेनफवारणी करणारा असल्यास पेरणी नंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी करावी.पेंडीमेथिलिन ची फवारणी करणार असल्यास पेरणी नंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी करावी किंवा पेरणीनंतर तीन ते सहा आठवड्यांनी अशा दोन खुरपण्या कराव्यात.

  • करडई-

वेळ- पिक उगवणीपुर्वी

 तन नाशक- प्रति हेक्‍टरी प्रति 300 लिटर पाणी ऑक्सिफ्लोरफेन (10 टक्के) एक लिटर

 टीप-पेरणी नंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी करावी.

( टीप- वरील तणनाशकांचा किंवा कुठल्याही कीटकनाशकांचा वापर करण्यापूर्वी कृषी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा)

English Summary: herbicide use gor control weed in crop take proper stape for that
Published on: 17 November 2021, 08:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)