Agripedia

सर्वात आधी मी तुम्हांला माझा परिचय करून देतो, मी आहे पैसा.

Updated on 19 March, 2022 1:33 PM IST

सर्वात आधी मी तुम्हांला माझा परिचय करून देतो, मी आहे पैसा. माझं साधारण रूप आहे, पण जगाला व्यवस्थित ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे. मनुष्याची नियत आणि प्रकृती बदलण्याची क्षमताही माझ्यात आहे. कारण मनुष्य मला आदर्श समजतो. अहो काही लोक तर माझ्यासाठी आपला जात, धर्म सोडतात, आपल्याच लोकांना धोका देतात, अहो एवढंच नाही तर माझ्यासाठी आपला देह विकतात.

लक्षात ठेवा मी चांगल्या आणि वाईट गोष्टीत कधीच फरक करत नाही, परंतु लोक मला स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी वापरतात. मी राक्षस नाही, पण लोक माझ्यासाठी अपराध करतात.

हे सत्य आहे की मी देव नाही पण लोक माझी देवाप्रमाणे पूजा करतात. खरं तर मी लोकांच्या सेवेसाठी आहे पण लोकच माझे गुलाम झाले आहेत. मी कधी कुणासाठी त्याग नाही केला पण लोक माझ्यासाठी स्वत:चाही जीव देतात तर कधी दुसऱ्याचा जीव घेतात.

मला तुम्हांला काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत सांगायच्या आहेत. मी तुम्हांला सगळं विकत घेऊन देऊ शकतो. मी तुमच्यासाठी घर विकत घेऊ शकतो पण तुमच्या घरात घरपण नाही आणू शकत.

मी तुमच्यासाठी औषध आणू शकतो पण तुमचं वय नाही वाढवू शकत. मी तुमच्यासाठी घड्याळ विकत घेऊ शकतो पण गेलेली वेळ नाही. 

मी तुमच्यासाठी मोठे पद विकत घेऊ शकतो पण आदर नाही. मी तुमच्यासाठी मखमली गादी विकत घेऊ शकतो पण झोप नाही. मी तुमच्यासाठी पुस्तके विकत घेऊ शकतो पण विद्या नाही. मी तुमच्यासाठी रक्त विकत घेऊ शकतो पण कोमेजून जात असलेले जीवन नाही.

म्हणून लक्षात ठेवा पैसा हेच सर्वस्व नाही. पैसा जरुर कमवा पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका. पैशाची पूजा जरूर करा पण पैशाचे गुलाम बनू नका. माणसासाठी पैसा बनला आहे. पैशासाठी माणूस नाही.

आपलं कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्र-परिवार, आप्तेष्ट हेच आपले धन आहे, त्यांना जाणीवपूर्वक जपा, कारण जेव्हा तुम्हांला देवाचं बोलावणं येईल,‌ तेव्हा मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत. 

तुम्ही केलेला परोपकार, दुसऱ्याला दिलेला आनंद, मातृ पितृ भक्ती, त्यांची सेवा व देशसेवा हेच खरं तुमचे धन आहे. तेव्हा सेवा, साधना व सत्संग करा. आयुष्यात तुमच्यासारखे सुखी कोणीही नसणार.

 पैसा म्हणतो तर मी लोकांच्या सेवेसाठी आहे पण लोकच माझे गुलाम झाले आहेत. मी कधी कुणासाठी त्याग नाही केला पण लोक माझ्यासाठी स्वत:चाही जीव देतात तर कधी दुसऱ्याचा जीव घेतात.

मला तुम्हांला काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत सांगायच्या आहेत. मी तुम्हांला सगळं विकत घेऊन देऊ शकतो. मी तुमच्यासाठी घर विकत घेऊ शकतो पण तुमच्या घरात घरपण नाही आणू शकत.

आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगू द्या. सर्वांनी आनंदात रहा. आपला समाजातील जिव्हाळा कायम राहो.

                         

Durgasing solanake

 jilla upadhyaksh

Rashtrawadi Congress party

 Granthalaya vibhag Buldhana

English Summary: Hello I speak a money read this you will talented
Published on: 19 March 2022, 01:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)