Agripedia

महाराष्ट्रामध्ये टोमॅटो पिका खाली सुमारे 50 हजार हेक्टंर क्षेत्र असून,त्यापासून जवळ-जवळ 1.05लाख टन टोमॅटो उत्पादन मिळते. तसेच सरासरी उत्पादनात आपले राज्य इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे.

Updated on 16 February, 2022 11:44 AM IST

महाराष्ट्रामध्ये टोमॅटो पिका खाली सुमारे 50 हजार हेक्‍टर क्षेत्र असून,त्यापासून जवळ-जवळ 1.05लाख टन टोमॅटो उत्पादन मिळते. तसेच सरासरी उत्पादनात आपले राज्य इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे.

महाराष्ट्रातील हवामान या पिकास योग्य असून, जमीन, पिक, हवामान, पाणी, खत व संरक्षण यांचे योग्य नियोजन केल्यास टोमॅटोची उत्पादकता सहज 60 ते 70टन प्रति हेक्‍टर पर्यंत वाढू शकते.

  • पिक संरक्षण :
  • रोग :

टोमॅटो मध्ये प्रामुख्याने मर, करपा विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.तसेच फळे पोखरणारी अळी, नाग आळी चा प्रादुर्भाव दिसून येतो.

  • मर :

 हा बुरशीजन्य रोग असून, झाडे अचानक वाळू लागतात.उपटल्यानंतर  मुळे कुजलेली दिसतात. रोपवाटिकेत प्रादुर्भाव झाल्यास रोप मरगळलेली, माना पडलेली दिसतात.

 नियंत्रण : रोपांच्या मुळ्या जवळ खुरप्यानेरेघा ओढून कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर या द्रावणाची जिरवण करावी. लागवडीनंतर कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 30 ग्रॅम प्रति 10 लिटर या द्रावणाची प्रति झाड 50 ते 100 मी. ली. प्रमाणे जिरवण करावे.

 ) करपा:

 यात लवकर येणारा व उशिरा येणारा, असे दोन प्रकार आहेत. पानांवर पिवळसर डाग पडून नंतर गोल काळे तपकिरी ठिपके दिसतात. नंतर पाने वाळतात.

 नियंत्रण:-मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर किंवा टेब्युकोनॅझोल10 मि.ली. प्रति 10 लिटर प्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी तज्ञांच्या सल्ल्याने करावी.

  • विषाणूजन्य रोग:

 टोमॅटो मध्ये प्रामुख्याने ग्राउंड नट बड नेक्रोसिस व्हायरस व पूर्ण गुच्छ (लीपकरल व्हायरस)हे विषाणूजन्य रोग आढळतात. त्यांचा प्रसार फुलकिडे, पांढरी माशी या मुळे होतो. या किडींचे नियंत्रण केल्यास रोगांचे प्रमाण कमी ठेवता येते.किडीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफोस किंवा डायमिथोएट 15 ते 20 म. लि. प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी.रॉक शेतामध्ये आढळल्यास झाडे उपटून नष्ट करावीत.

  • फळे पोखरणारी आळी :

ही अळी पाने खाते. नंतर हिरवी किंवा पिकलेली फळे पोखरून आत शिरते.

 नियंत्रण:- क्विनॉलफॉस 20 मी.लि.प्रति 10 लिटर प्रमाणे फवारणी करावी.हेलीयु थिसन्यूक्लियर पाली पॉलिहेड्रोसीस व्हायरस (एच एनपीव्ही )विषाणूजन्य कीटकनाशक 200 मि.ली. प्रति 200 लिटर पाण्यातून संध्याकाळी फवारावे.

  • नाग अळी:

 या अळ्या पानांच्या पापुद्रेमध्ये शिरून हिरवा भाग खातात. परिणामी पानांच्या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये बाधा येते.

 नियंत्रण :- रोपांची लागवड करतेवेळी अशी पाने काढून टाकावीत. चार टक्के निंबोळी अर्काच्या दोन ते तीन फवारण्या द्याव्यात.

अळीचे प्रमाण वाढल्यास अबामेक्टीन4 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी. पुढील फवारणी तज्ञांच्या सल्ल्यानुसार द्यावी.

English Summary: harmful disease in tommato crop and this management method of controll
Published on: 16 February 2022, 11:44 IST