Agripedia

मागील वर्षीचे आपण हरबरा पीक बघितले तर,

Updated on 15 October, 2022 9:28 PM IST

मागील वर्षीचे आपण हरबरा पीक बघितले तर, हरबरा पिकावर मर तसेच कॉलर रॉटचा प्रादुर्भाव यामुळे खूप कमी उत्पादन मिळाले आहे, या वर्षी सुध्दा मागील वर्षी प्रमाणे जास्त प्रमाणात पाऊस झालाआहे, त्यामुळे कॉलर रॉट किंवा मर रोग यांचा प्रादुर्भाव हरबरा पिकावर मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.हरबरा पेरणी ऑक्टोबर महिन्यातच होणे अपेक्षित असते, त्यादृष्टीने बियाणे निवड असेल तसेच वाण

निवड असेल याचे नियोजन करणे आवश्यक आहे, पेरणीसाठी बियाणे निवड आणि बीजप्रक्रिया व पेरणी पूर्वीचे नियोजन हे खूप महत्त्वाचे असते.Seed selection and seed processing and pre-sowing planning are very important for sowing.

"युवा महोत्सव युवकांना कलाविष्कारांचे प्रदर्शनाचे हक्काचे व्यासपीठ"

हरबरा वाण निवड करता असताना दोन प्रकारचे असतात टपोरे दाणे म्हणजे काबुली व. लहान दाणे म्हणजे देशी वाण. आपल्या कडे उपलब्ध असलेली जमीन व पाणी यानुसार वाण निवड करावी.बीज प्रक्रियेसाठी Carbendazim 25 %+ Mancozeb 50 % WS

(Sprint) 3 ग्राम प्रती किलो किंवा Carbendazim २-३ ग्रॅम प्रति किलो किंवा Thiophanate Methyl 45% + Pyraclostrobin 5% FS (xelora) २-३ ml प्रती किलो किंवा Penflufen 13.28% ww + Trifloxystrobin 13.28% ww FS, (Ever gol extend ) ० .५ ते १ ml प्रती किलो बियाणे तसेच Thimethoxum ३० FS ५ -७ ml प्रती किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर पेरणी करण्याच्या १ तास अगोदर

Rhizobium ( जैविक खत ) २०० -२५० ग्रॅम १० किलो बियाण्यास याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी व सावली मध्ये वाळवून नंतर पेरणी करावी पेरणी करत असताना किंवा नंतर Trichoderma viridi एकरी ४-५ लिटर किंवा किलो गांडूळ खतामद्ये मिसळून टाकावे किंवा sprinkler च्या पाण्यातून सोडावे मर व कॉलर रॉट या दोनही रोगांच्या नियंत्रणासाठी प्रभावी जैविक बुरशीनाशक म्हणून

trichoderma viridi काम करते त्यामुळे त्याचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते हरबरा पीकामध्ये मर रोग व्यवस्थापन महत्वाचे आहे त्यासाठी बीजप्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे आहे वरील प्रमाणे बीजप्रक्रिया करावी व पेरणी नंतर १०-१५ दिवसांनी Trichoderma viridi चे ड्रेंचींग करावे ( पाण्यासोबत) किंवा १०-२० किलो ओली माती किंवा ५० किलो गांडूळ खत घेऊन त्यामधे ४ किलो किंवा ४ लिटर trichoderma viridi यांचे

मिश्रण बनवून शेतामध्ये ओलावा असताना धुरळणी करावी. ( हे सर्व रोग येण्यापूर्वी करणे अपेक्षित आहे).हरबरा पिकला रासायनिक खत जास्त नाही दिले तरी चालते परंतु २५:५०:०० किंवा २०:४०:२० नत्र : स्फुरद : पालाश किलो प्रति हेक्टर प्रमाणे खत देणे तितकेच महत्वाचे आहे. यासाठी आपण १२:३२:१६ ५०-६० किलो किंवा DAP ५०-६५ किलो प्रती एकर दिले तरी चालेल . युरिया किंवा पोटॅश देण्याची गरज

नाही. जर आपल्या जमिनीत अन्नद्रव्ये कमतरता असेल तर सल्फर १० किलो किंवा झिंक ५ किलो यांचा वापर करू शकता. सल्फर व झिंक चा वापर केल्यास उत्पादनात नक्कीच भर पडते.हरबरा पिकला जास्त पाणी देऊ नये फक्त २ पाणी द्यावेत.जास्त ओलावा असताना पेरणी करू नये शेत व्यवस्थित सुकले की, योग्य ओलावा असताना पेरणी

करावी, खोल पेरणी करावी, तसेच पेरणी नंतर पहिली फवारणीच्या वेळी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा,पाणी देण्यासाठी स्प्रिकलर चा वापर केल्यास फायदा होतो तसेच शेंडे खुडने सुध्दा महत्वाचे असते. कीड - रोग व्यवस्थापन करण्यासाठी शिफारशीत उपाययोजना कराव्यात.अशा प्रकारे नियोजन केल्यास नक्कीच उत्पादनात वाढ होईल. 

 

डॉ अनंत उत्तमराव इंगळे

Ph.D. Genetic and Plant Breeding MPKV Rahuri,

( VADF Chikhli) 

English Summary: Harbara Crop Cultivation : Special Advance Planning
Published on: 15 October 2022, 01:17 IST