Agripedia

आपल्याकडे दुधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुधाशिवाय जशी चहाची कल्पना आपण करू शकत नाही, अगदी तसंच दुधाशिवाय देवाच्या प्रसादाची कल्पना देखील करवत नाही.

Updated on 05 February, 2022 12:40 AM IST

आपल्याकडे दुधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुधाशिवाय जशी चहाची कल्पना आपण करू शकत नाही, अगदी तसंच दुधाशिवाय देवाच्या प्रसादाची कल्पना देखील करवत नाही.

अगदी जाहिरातींमधून सुद्धा दुधाचं महत्व प्रत्येक वेळेला दर्शवलं जातं! बॉर्न व्हिटा सारख्या कंपन्या सुद्धा त्यांचं प्रोडक्ट विकलं जावं म्हणून त्यांच्या जाहिरातींमध्ये दुधाचे फायदे लोकांना सांगतात!

लहान मुलांना नुसतं दूध आवडत नाही, मग ते पोटात जावं यासाठी अशा कित्येक युक्त्या आणि जाहिराती केल्या जातात! आपल्याइथे तर दूध एक रस्त्यावरच्या भिकाऱ्यापासून अंबानी पर्यंत सगळ्यांनाच लागत!

तबेल्यातल्या दुधापासून थेट बंद टेट्रा पॅक मध्ये येणाऱ्या दुधाचा खप आपल्याला माहित आहेच, शिवाय लोक श्रद्धेच्या पोटी शंकराच्या पिंडीवर जे दूध वाहतात त्याची तर गणनाच होऊ शकत नाही, असो तो ज्याचा त्याचा श्रद्धेचा विषय असतो!

पाहायला गेलं तर प्रत्येक महत्त्वाच्या खाद्यपदार्थामध्ये दुध अतिशय महत्वाची भूमिका बजावतं आणि आपल्या जिभेची चव शांत करतं.

महाराष्ट्रात तर कित्येक दुधाचा धंदा करणाऱ्यानी योग्य ती किंमत मिळावी म्हणून आंदोलनं केली, कोल्हापुरात तर कित्येक दुधाचे टँकर्स रस्त्यावर ओतले गेले ज्यामुळे दुधाची प्रचंड नासाडी झाली!

हे असं कोणतंही वळण न घेता आंदोलन झालं पाहिजे, आपल्याला दुधाची किंवा अशा तत्सम पदार्थांची किंमत कळली पाहिजे!

असं हे दुध आपल्या घरी पोचतं केलं जातं ते पण प्लास्टिकच्या थैल्यांमधून!

सकाळी सकाळी पहाटे दुधवाला घराच्या दरवाज्याबाहेर दुध पिशवीची डिलिव्हरी करून जातो आणि जर दुधवाला नसेलच तर सकाळी सकाळी दुध केंद्रांवर, डेअरीवर किंवा दुकानांमध्ये हजेरी लावणं आलंच.

बरं तर ही दुधाची पिशवी काही जण एका दिवसाला संपवत असतील तर काही जण दोन-तीन दिवस वापरत असतील, पण सगळीकडे एकच सल्ला दिला जातो की दुध लवकर संपवून टाका नाहीतर खराब होईल किंवा नासेल.

म्हणजेच काय तर आपल्याला ही खात्री असते की आपल्याकडच दुध २ दिवसांच्यावर टिकणार नाही.

परंतु तुम्हाला हे माहित आहे का की अमेरिका, युरोप आणि विदेशातील इतर बऱ्याच देशांमध्ये दुध आठवड्यापेक्षा जास्त काळ सहज राहतं. ही गोष्ट जाणून घेतल्यावर तुम्हाल देखील प्रश्न पडला असेलच की असं का? चला तर आज जाणून घेऊया या प्रश्नामागचं उत्तर!

यामागचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे आपल्याकडे दुध उत्पादनापासून ते ग्राहकापर्यंत पोचेपर्यंत दुधाला अनेक वेळा उच्च तापमानांमधून जावं लागतं. म्हणजे दुधाच्या प्रक्रियेची सुरुवातच चुकीची होते असे म्हटले तर वावगे ठरू नये.

गायीच्या कासेमधून दुध काढल्यापासून ते ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी आपल्याकडे सामान्यत: ६ तासांचा कालावधी लागतोच!

आणि एवढ्या वेळ कोणकोणत्या प्रक्रियांमधून गेलेले आपल्याकडचे हे दुध ते जागतिक स्तरावर घालून दिलेल्या डेअरी मानकनानुसार विक्री करण्यासारखेही नसते.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे दुधात भेसळ करण्याचे नवनवीन फंडे शोधले जातात, ज्यामुळे आपसूकच दुधाची गुणवत्ता ढासळते. आपल्याकडे दुधासोबत अजून एक खास गोष्ट केली जाते ती म्हणजे जवळपास दिवसातून ४-५ वेळा दुध गरम केले जाते.

पण असं करणं चुकीच आहे, कारण सारखं सारखं दुध गरम केल्याने दुधाचे जीवनमान कमी होते, अर्थात ते लवकर खराब होते. तसेच प्रणामापेक्षा जास्त गरम केल्यास त्यातील तत्वे नष्ट होण्याचा धोका असतो.

डेअरीमध्ये Pasteurization प्रक्रीयेवेळी देखील दुधातून Bacterial Spores संपूर्ण नष्ट होत नाही.

त्यामुळे पुन्हा दुधामध्ये Bacterial निर्माण होऊ शकतात. यावर उपाय म्हणून Ultra High Temperature पद्धतीचा वापर करत येऊ शकतो, पण समस्या ही आहे की या पद्धतीमुळे दुधाची चव थोडीफार बदलते आणि दुध पूर्णत: सफेद रंगाचं दिसू लागतं.

चव आणि रंग बदलल्यास ग्राहक दुध खरेदी करणार नाहीत या भीतीमुळे दुध उत्पादक ही पद्धती आपल्याकडे वापरत नाहीत. परंतु या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे दुध एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकून राहतं.

अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये दुध जास्त काळ टिकून राहण्याचं अजून एक कारण म्हणजे गायीच्या कासेतून दुध काढल्यानंतर ते थंड तापमानामध्ये स्टोअर केले जाते.

English Summary: Hair 2 days milk ferment but in other country can be stored one week
Published on: 05 February 2022, 12:40 IST