Agripedia

या झाडाची फुले, पाने, साल हे खूप उपयुक्त्त आहे. यांचा औषधी स्वरूपात उपयोग केला जातो. तसेच या झाडाच्या पानांचा जनावरांना चारा म्हणून उपयोग होतो.

Updated on 07 May, 2022 3:39 PM IST

हादगा हे सध्या दुर्मिळ होत चाललं पीक आहे. कोकण भागात या वृक्षाला फार उपयोगी मानले जाते. हादगा या वृक्षाला अगस्ती किंवा अगस्ता या नावानेदेखील संबोधले जाते. तसेच या वृक्षाची वाढ ही झपाट्याने होते. मात्र याचे आयुर्मान हे जवळपास तीन ते साडेतीन वर्ष इतके असते. ज्याप्रमाणे प्रत्येक झाडाचे किंवा वनस्पतीचे काही न काही गुणवैशिष्ट्य असते अगदी तसंच या वृक्षाचे देखील गुणवैशिष्ट्य आहेत. याचा बऱ्याच कारणांसाठी वापर केला जातो. हे वृक्ष बहुगुणी आहे.

याचा वापर केवळ मनुष्यासाठी नसून पशूंसाठी देखील केला जातो. या झाडाची फुले, पाने, साल हे खूप उपयुक्त्त आहे. यांचा औषधी स्वरूपात उपयोग केला जातो. तसेच या झाडाच्या पानांचा जनावरांना चारा म्हणून उपयोग होतो. तसेच झाडाचे लाकूड शेतीची अवजारे तयार करण्यासाठी केला जातो. शिवाय आगपेटीच्या काड्या तयार करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पहिले तीन ते चार वर्षापर्यंत लाकडाचा उपयोग हा स्वस्त कागद तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून करतात.

या झाडाचे विशेष म्हणजे याच्या पानाची व फुलाची भाजी करतात. हादग्याच्या कोवळ्या शेंगाची भाजी केली जाते. एका शेंगेमध्ये जवळपास २५ ते ३० हादग्याच्या बिया असतात. ही वनस्पती मुख्यत्वे मराठवाड्यामध्ये विपुल प्रमाणात आढळून येते. या वनस्पतीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. तयामुळे याच्या खोडाची साल, पाने व मूळ औषधात वापरले जातात. अनार्तवांत फुलांची भाजी उपयुक्त आहे. जर फुफ्फुस सुजून ज्वर, कफ ही चिन्हे दिसल्यास,

विहीर अनुदान : विहिरी साठी अनुदान हवे असेल तर कृषी स्वावलंबन योजना ठरेल तुमच्यासाठी महत्त्वाची, वाचा माहिती

यावेळी हादग्याच्या मुळाची साल विड्याच्या पानातून किंवा तिचा अंगरस मधाबरोबर देतात, त्यानंतर घाम येतो व कफ पडायला मदत होते. दृष्टी कमी झाल्यास फुलांचा रस डोळ्यात घालतात. संधिशोथात मुळाचा लेप करतात. याच झाडांचा, वनस्पतींचा वापर जनावरांच्या आहारात केला जातो. यापैकी अनेक वनस्पतीच्या पाल्याचा वापर मानवी आहारातसुद्धा केला जातो. हादग्याच्या कोवळ्या शेंगाची भाजी केली जाते. हे झाड बहुवार्षिक आहे. म्हणजे एकदा केलेली लागवड, अनेक वर्ष उत्पन्न देते.

तसेच या झाडाची पाने सतत खुडून घेतल्यावर त्याला नवनवीन पालवी फुटत राहते. याचा चारा पौष्टिक असतो. तयामुळे जनावरे आवडीने खातात. तसेच हे पिक अत्यंत औषधी गुणांनी युक्त असे आहे. हादग्याच्या आधाराने काळी मिरीचा वेल व पानवेलाची लागवड करता केली जाते. तसेच हादग्याची लागवड ही नारळाच्या झाडाला थोड्या प्रमाणात सावली देण्यासाठीदेखील केली जाते. केळीच्या बागेला वारा प्रतीबंधक म्हणूनही हादगा लागवड केली जाते. हादगा लागवडीमुळे रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या:
निर्यात चालू ठेवणार सरकारची घोषणा, गव्हाच्या किमतीत २-३ टक्यांनी वाढ
Apollo Tyres : आधुनिक शेती प्रणालीसाठी अपोलोने न्यू-जेन अँग्रीचे 'विराट' टायर केला लाँच

English Summary: Hadaga plant is multifaceted; Learn about ...
Published on: 06 May 2022, 04:39 IST