Agripedia

पिकांच्या वाढीसाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांची आवश्यकता असते. प्रत्येक घटकाची उपयोगिता ही त्यानुसार वेगवेगळी असते. आपल्याला जिप्सम म्हणजेच त्याला कॅल्शियम सल्फेट असे देखील म्हणतात हा माहिती आहे. तर हा घटक शेतीसाठी एक महत्त्वाचा असून चांगल्या प्रकारचा भूसुधारक देखील आहे.

Updated on 29 August, 2022 10:53 AM IST

पिकांच्या वाढीसाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांची आवश्यकता असते. प्रत्येक घटकाची उपयोगिता ही त्यानुसार वेगवेगळी असते. आपल्याला जिप्सम म्हणजेच त्याला कॅल्शियम सल्फेट असे देखील म्हणतात हा माहिती आहे. तर हा घटक शेतीसाठी एक महत्त्वाचा असून चांगल्या प्रकारचा भूसुधारक देखील आहे.

चोपण जमिनीत सुधारणा करायची असेल तर कॅल्शियम सल्फेट अर्थात जिप्समचा उपयोग खूप महत्त्वाचा ठरतो. या लेखात आपण जिप्सम वापराचे फायदे त्याबद्दल माहिती घेऊ.

नक्की वाचा:सोयाबीन उत्पन्न वाढीसाठी परफेक्ट+ ची करा फवारणी आणि वाढवा उत्पन्न

जिप्सम वापराचे फायदे

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जिप्समचा वापर केल्याने जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते.

2- तसेच जमीन भुसभुशीत होण्यासाठी मदत तर होतेच परंतु जमिनीची रचना बदलण्यास देखील खूप प्रकारे मदत होते.

3- क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्समचा वापर यामुळे सुटसुटीत होतात त्यामुळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते.

4- जिप्समचा वापर केल्याने लागवड केलेल्या बियाण्याची उगवणक्षमता चांगली होते.

5- पाण्याबरोबर जे काही क्षार जमिनीत येतात ते जिप्समचा वापर यामुळे कमी होतात.

नक्की वाचा:टिकवा जमिनीची सुपीकता, एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीचा वापर

6- जमिनीची धूप कमी होते.

7- जमिनीचा पाण्याचा निचरा होतो आणि जमीन या पाणथळ होत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जमिनीतील कॅल्शियम व मॅग्नेशियमचे प्रमाण सुधारते.

8- जमिनीतील सेंद्रिय पदार्थ लवकर कुजण्यास मदत होते.

9- जिप्सम मुळे पिकांना  गंधक उपलब्ध होतो व तो पिकांना खूपच महत्त्वाचा आहे.

10- जिप्समचा वापर आणि पिकांची बाह्यकक्षा सुधारते आणि अन्नद्रव्ये जास्त शोषले जातात.

11- कंद पिकांसाठी जिप्सम खूप महत्त्वपूर्ण असून यामुळे कंद पिकाला मातीची चिटकत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीतील हुमणी किडीचे देखील नियंत्रण होते.

नक्की वाचा:काय आहे पोटॅशियम ह्युमेट-98%' आणि त्याचा शेतीत वापर का करावा?

English Summary: gypsum is so useful for growth and improvement in land
Published on: 29 August 2022, 10:53 IST