Agripedia

वाशिम: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

Updated on 07 September, 2022 7:18 PM IST

वाशिम: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय अकोला येथील सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव या कार्यक्रमांतर्गत कोंडाळा झांबरे येथे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा सहाय्याने मार्गदर्शन केले आपल्या कानावर नेहमीच अशा बातम्या येत राहतात की शेतकऱ्यांच्या हातून फवारणीच्या वेळेस

अनावधानाने किंवा हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागतो Farmers lose their lives due to inadvertence or carelessness याबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषी महाविद्यालय अकोला येथील विद्यार्थी पवन टिकार,तुषार बगे,सारंग काकडे,गौरव बलदवा, रुद्रेश राजपूत,भागवत शेळके,अभिजीत तळणीकर यांनी कोंडाळा झांबरे

या गावांमध्ये फवारणीच्या वेळेस सेफ्टी किट घालण्याचे आवाहन केले तसेच ते जर केले नाही तर होणारे दुष्परिणाम लॅपटॉपच्या सहाऱ्याने शेतकऱ्यांना दाखवण्यात आले जेणेकरून शेतकरी या गोष्टीचे गांभीर्य समजून घेतील व अशा घटनांना आळा घालता येईल

सदर कार्यक्रम राबवण्यासाठी कृषी महाविद्यालय अकोला चे सहयोगी अधिष्ठाता डॉ पि.के. नागरे, कार्यक्रम अधिकारी डॉ संदीप लांबे, कृषी संशोधन केंद्र वाशिम चे प्रमुख डॉ बि.डी. गीते, डॉ अनिल खाडे, डॉ वैभव उज्जैनकर,डॉ गिरीश जेउघाले व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

English Summary: Guidance given by Agriculture Envoys, precautions to be taken while spraying
Published on: 07 September 2022, 07:18 IST