डॉ. आदिनाथ ताकटे, ऐश्वर्या राठोड
भुईमुगाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी.पेरणीच्या वेळी रात्रीचे किमान तापमान १८० सेल्सियस पेक्षा जास्त असावे.फुलोरा अवस्थेमध्ये या पिकाला दिवसाचे तापमान २४० ते २५० सेल्सियस लागते. अन्यथा फुलधारणेवर क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. उशिरा पेरणी केल्यास फुलोऱ्याच्या कालावधीत तापमान वाढलेले असते.
जातनिहाय तसेच दाण्याच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण ठरते.कमी आकाराचे दाणे असलेल्या वाणासाठी १०० किलो, मध्यम आकाराच्या दाणे असलेल्या वाणासाठी १२५ किलो टपोऱ्या दाण्यासाठी १५० किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे.
उन्हाळी हंगामासाठी भुईमुगाचे वाण आणि वैशिष्टे खालील प्रमाणे.
एस. बी -११
प्रसारण वर्ष : १९६५
हंगाम: खरीप व उन्हाळी हंगामासाठी संपुर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित
प्रकार: उपटी
पिकाचा कालावधी : ११५-१२० दिवस
वैशिष्टे : कोरडवाहू साठी उत्तम,सर्व भागात वापर ,जास्त दाण्याचे प्रमाण
उत्पादन :१५-२०क्विं/हे.
टीएजी-२४ ( TAG 24)
प्रसारण वर्ष :
हंगाम: खरीप व उन्हाळी हंगामासाठी संपुर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित
प्रकार: उपटी
पिकाचा कालावधी :११०-११५दिवस
उत्पादन : २५-३०क्विं/हे.
जे . एल २८६ ( फुले उनप)
प्रसारण वर्ष :२००४
हंगाम:खरीप हंगामासाठी संपुर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित
प्रकार: उपटी
पक्वता दिवस : ११५-१२० दिवस
वैशिष्टे :मूळ कुजव्या रोगास प्रतिकारक्षम, फुले येणारा कालावधी जास्त, तेलाचे प्रमाण ४९-५०%
उत्पादन :१८-२०क्विं/हे.
टीपीजी-४९ ( TPG 49)
प्रसारण वर्ष :
हंगाम: रब्बी व उन्हाळी हंगामासाठी महाराष्ट्रासाठी जळगांव, धुळे, व अकोला जिल्ह्यांकरिता प्रसारित
प्रकार: उपटी
पिकाचा कालावधी :१२५-१३०दिवस
वैशिष्टे :जाड दाणे
उत्पादन :२५-३०क्विं/हे.
टीजी-२६(TG 26)
प्रसारण वर्ष –
हंगाम: खरीप व उन्हाळी हंगामासाठी संपुर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित
प्रकार: उपटी
पिकाचा कालावधी :११०-११५दिवस
उत्पादन :२५-३०क्विं/हे.
जेएल ५०१
प्रसारण वर्ष :२००९
हंगाम: खरीप व उन्हाळी हंगामासाठी म.फु.कृ.वि. राहुरी कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यासाठी प्रसारित
प्रकार: उपटी
पिकाचा कालावधी :११०-११५दिवस
वैशिष्टे :तेलाचे प्रमाण ४९%,दाणे खवट होण्यास प्रतिकारक्षम
उत्पादन :३०-३२क्विं/हे.
फुले ६०२१ (आर एच आर जी - ६०२१)
प्रसारण वर्ष :२०११
हंगाम: उन्हाळी हंगामासाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित
प्रकार: निमपसरी
पिकाचा कालावधी :१२०-१२५ दिवस
वैशिष्टे : उंची २० ते २५ से.मी.,फुले नारंगी रंगाचे,आरया रंगीत, शेंगा लहान आकारच्या दोन दाणे असलेल्या, शेंगादाणे गुलाबी रंगाचे, तेलाचे प्रमाण ५१%, पाने खाणारी अळी,तांबेरा ,टिक्का,व खोड्कुजरोगास प्रतिकारक्षम
उत्पादन :३५-४०क्विं/हे.
फुले उन्नती (आर एच आर जी ६०८३)
प्रसारण वर्ष :२०१२
हंगाम: खरीप व उन्हाळी हंगामासाठी संपुर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित
प्रकार: उपटी
पिकाचा कालावधी :खरीप १११ दिवस ,उन्हाळी १२८
वैशिष्टे : उंची ४० ते ४५ से.मी.,फुले नारंगी रंगाचे,आरया रंगीत, शेंगा मध्यम आकारच्या दोन दाणे असलेल्या,शेंगादाणे लाल रंगाचे,तेलाचे प्रमाण ५२ %, पाने खाणारी अळी,तांबेरा ,टिक्का,व खोड्कुजरोगास प्रतिकारक्षम
उत्पादन:३५-४०क्विं/हे.
फुले चैतन्य (केडीजी-१६०)
प्रसारण वर्ष :२०१६
हंगाम: उन्हाळी हंगामासाठी आंध्रप्रदेश, तेलगंणा, तामिळनाडू प्रसारित
प्रकार: उपटी
पिकाचा कालावधी :१०५-११०दिवस
वैशिष्टे :खोड्कुज,पानावरील ठिपके आणि तांबेरा रोगास मध्यम प्रतिकारक्षम,तेलाचे प्रमाण ५१.६%, मध्यम टपोरे दाणे ,शेंगातील शेंगदाण्याचे प्रमाण ६५ ते ६९ %
उत्पादन :२०-२४ क्विं/हे.
जे एल ७७६ (फुले भारती)
प्रसारण वर्ष :२०१४
हंगाम: प्रकार: उपटी
पिकाचा कालावधी :१०५-११० दिवस
वैशिष्टे :जास्त तेलाचे प्रमाण,खरीपासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि उन्हाळी साठी आंध्रप्रदेश, तेलगंणा, तामिळनाडू राज्यासाठी प्रसारित
उत्पादन:३०-३५ (क्विं/हे.)
लेखक - डॉ. आदिनाथ ताकटे, मृद शास्रज्ञ एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषि विदयापीठ, राहुरी, मो. ९४०४०३२३८९
ऐश्वर्या राठोड, आचार्य पदवी विद्यार्थी, कृषि विद्या विभाग महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, मो. ८४११८५२१६४
Published on: 24 January 2024, 02:46 IST