Agripedia

महाराष्ट्रात तेलबियांची तब्बल नऊ पिके घेतली जातात. त्यापैकी भुईमूग हे एक महत्वाचे पीक आहे. राज्यात सन २०१९ ते २० मध्ये खरीप भुईमुगाची लागवड २.३६ लाख हेक्टरवर झाली. त्यापासून २.५७ लाख टन वाळलेल्या शेंगांचे उत्पादन मिळाले.

Updated on 27 June, 2020 11:49 AM IST


महाराष्ट्रात तेलबियांची तब्बल नऊ पिके घेतली जातात. त्यापैकी भुईमूग हे एक महत्वाचे पीक आहे. राज्यात सन २०१९ ते २० मध्ये खरीप भुईमुगाची लागवड २.३६ लाख हेक्टरवर झाली. त्यापासून २.५७ लाख टन वाळलेल्या शेंगांचे उत्पादन मिळाले. राज्यात शेंगांची सरासरी उत्पादकता १०८२ किलो प्रति हेक्टर इतकी झाली.

भुईमूग हे भारतातील एक प्रमुख गळीतधान्य पीक असून, त्याची लागवड खरीप (८५%),  रब्बी (१०%) व उन्हाळी(४%) अशी घेतली जाते. महाराष्ट्रात सन २०१९ ते २० साली खरीप हंगामात भुईमुगाची एकूण २.३७ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड व सरासरी उत्पादकता १०८२ प्रती हेक्टर एवढी आहे. भारतातील भुईमूग पिकावणाऱ्या पाच प्रमुख राज्यांपैकी महाराष्ट्र एक राज्य आहे.

भुईमुगाच्या शेंगांपासून खाद्यतेल व पेंड मिळते. पाल्याचा उपयोग जनावरांचा चारा म्हणून होतो व टरफलांपासून हार्डबोर्ड तयार होतात. भुईमूग हे एक शेंगवर्गीय द्वीदल पिक असल्याने जमिनीची सुपीकता वाढवते. भुईमूगामध्ये २६% प्रथिने,४८%तेल आणि ३% तंतुमय पदार्थ असतात. तसेच त्यामध्ये कॅल्शियम, थिअॉनिन,व नायासिनचे प्रमाण चांगले असते. वरील गुणधर्मामुळे भारतासारख्या विकसनशील व प्रामुख्याने शाकाहारी देशात चांगल्या पोषणयुक्त आहाराच्या दृष्टीने भुईमूग हे निसर्गाने दिलेले वरदान आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

   भारतात दरवर्षी खाद्यतेलाच्या एकूण गरजेच्या अंदाजे ५०%गरज आयात केलेल्या तेलापासून भागवली जाते. तेलबियांच्या उत्पादनात आपला देश स्वयंपूर्ण व्हावा,  यादृष्टीने खरीप भुईमुगाची लागवड सुधारित पद्धतीने होणे गरजेचे आहे.  भुईमुगाची उत्पादकता वाढीची प्रमुख कारणे खालील्रमाणे आहेत.

 १)सुधारित वाणांची लागवडीसाठी निवड करणे.

२)प्रमाणित बियाण्याचा योग्य प्रमाणात वापर करणे.

३) प्रती हेक्टर रोपांची संख्या अपेक्षित संख्येवढी असणे.

४) बीजप्रक्रिया, खते, जीवाणू संवरधके व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा गरजेनुसार संतुलित वापर करणे.

५) रोग व कीड नियंत्रण वेळेत करणे.

६)योग्य पाणी व्यवस्थापन.

 

भुईमुगाची उत्पादन वाढविण्याचा दृष्टीने पुढील बाबींचा अवलंब मोठ्या प्रमाणावर करणे गरजेचे आहे.

 सुधारित वाण:-

अ . क्र

वाणाचे प्रकार

कालावधी (दिवस)

दाण्याचे शेंगेशी गुणोत्तर (टक्के)

उत्पादन क्विं. / हे

1

फुले उन्नती

(आरएचआरजी -6083)

110-115

68

20-25

2

जे. एल -501

99-104

67

16-18

3

टी. जी.-26

95-100

72

15-16

4

फुले प्रगती ( जे. एल.-24)

90-95

72

18-20

5

टी.ए.जी.-24

100-105

71

15-20

6

एस.बी.-11

105-110

72

15-20

 

 बियाणे बीजप्रक्रिया :-

 पेरणीपूर्वी ८ ते १० दिवस अगोदर शेंगा फोडून पेरणीसाठी बियाणे तयार करावे. फुटके, किडके, साल निघालेले, बी निवडून राहिलेले टपोरे बियाणे पेरणीसाठी वापरावे. पेरणीसाठी टीएजी -२४, टी पिजी -४१, फुले उन्नती या उपत्या वाणांचे १२० ते १५० किलो बियाणे प्रती हेक्टर वापरावे. इतर वाण एस. सी.११, टी.जी.२६ या वाणांसाठी १०० किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे. पेरणी टोकण पद्धतीने करावी. पेरणीपूर्वी बीयान्याची उगवण क्षमता विचारात घेऊन त्याप्रमाणे वाढीव बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास त्रयकोदर्मा /था य रम किंवा कार्बे्डाझिम हे बुरशीनाशक एक किलो बियाण्यास अनुक्रमे ५ ग्रॅम किंवा ३ ग्रॅम या प्रमाणात चोळावे. वरील बीजप्रक्रियानंतर १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम व २५० ग्रॅम पिएसबी जिवाणू संवर्धक थोड्या पाण्यात मिसळून हलक्या हाताने चोळून बियाणे वाळवावे. बियाणे पेरणीसाठी लगेच वापरावे. भुईमुगाची पेरणी करताना २ ओळीतील अंतर ३० से.मी. व दोन रोपांतील अंतर १० से.मी.ठेवावे.

 


इक्रिसँट
पद्धतीने भुईमूग लागवड  :-

या पद्धतीस रुंद वरंबा सरी पद्धत असे म्हणतात. भुईमुग पिकास पाणी जास्त संवेदन क्षमता आहे. जास्त अथवा कमी पाणी झाल्यास उत्पादावर अनिष्ट परिणाम होतो.

एकरीसात पद्धतीचे फायदे पुढील प्रमाणे आहेत.

१) जास्त झालेले सरितील पाणी काढून देता येते किंवा पाणी द्यावयाचे झाल्यास सरीतून देता येते.

२) पाण्याचा निचरा चांगला होतो.

३) मुळांच्या जवळ हवा खेळती राहते.

४)ओळीतील रोपांना चांगला सूर्यप्रकाश मिळतो.

५) भुसभुशीत मातीत शेंगा चांगल्या पोसतात.

   पूर्वमशागतीनंतर तयार झालेल्या शेतामध्ये १.२० मीटर अंतरावर छोट्या नग्रणीने ३०से.मी.रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात. त्यामुळे ०.९० मीटर रुंदीचे रुंद वाफे  (गादी वाफे ) तयार होतात. वाफ्याची उंची १५ ते २० से.मी.ठेवावी. रुंद वाफ्यावर दोन ओळीतील अंतर ३० से.मी. व दोन रोपांतील अंतर १० से.मी. ठेऊन टोकण पद्धतीने भुईमूगाची लागवड करावी. बियाणे ,खते व इतर मशागत नेहमीच्या पद्धतीने करावी.

खते :- भुईमूग पिकासाठी हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत शेतामध्ये पसरवून कुळवाच्या सह्यायाने पेरणीपूर्वी जमिनीत मिसळावे. भुईमुगला हेक्टरी २५ किलो नत्र ५० किलो स्पुरद द्यावे. ही खते पुढीलप्रमाणे प्रती हेक्टरी पेरून द्यावे म्हणजेच ५४ किलो युरिया , ३१२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट पेरणीच्या वेळेस द्यावे. भुईमूग पिकाच्या अधिक उत्पादन वाढीसाठी रासायनिक खत मात्रेसोबत जीपसम ४०० किलो प्रति हेक्टर (२०० किलो प्रति हेक्टर पेरणी वेळी,तर उर्वरित २०० किलो प्रति हेक्टर आर्या सुटताना ) जमिनीत मिसळून द्यावे.

आंतरपिके :-

भुईमुपासून अनपेक्षित उत्पादन मिळण्याची शाश्वती नसल्यास भुईमुग + तीळ (६:२),भुईमुग + कापूस (२:१),भुईमुग + तुर (६:२) प्रमाणात पेरणी करून दोन्ही पिकांचे अधिक उत्पादन घेणे शक्य होते. भुईमूग फलबगांमधे आंतरपीक घेतल्यास फलबघेस फायदा होतो.  

आंतरमशगत :-

भुईमुगाची पिक उगवल्यानंतर १० ते १२ दिवसांच्या अंतराने दोन कोळपण्या व एक खुरपणी द्यावी. ३५ ते ४० दिवसानंतर आर्‍या सुटू लागल्यावर कोळपणी वा खुरपणी करू नये, फक्त मोठे तन उपटून टाकावे. भुईमुग पिकातील कार्यक्षम तन व्यवस्थापन करिता पेरणीनंतर व पिक उगवणीपूर्वी लगेच पेंदमिठ्छिलिन १ किलो क्रियाशील घटक प्रती हेक्टरी पाण्यातून ऑलिव्ह फवारणी करावी. तसेच फावरणीनंतर  तयार केली जमीन विस्कळीत करु नये. पेरणीनंतर तणांच्या बंदोबस्तासाठी २० ते २५ दिवसांनी emyzethaypr ७५० मी.ली.प्रती हेक्टर ५०० लिटर पाण्यातून फवारावे.  किंवा २५ ते ३० दिवसांनी एक खुरपणी करावी.  

पाणी  व्यवस्थापन :-

भुईमुग पिक पाण्याच्या बाबतीत अतिशय संवदनशील आहे. फांद्या फुटण्याची अवस्था (२० ते ३० दिवस) आर्या उतरण्याची अवस्था (४० ते ४५ दिवस) आणि शेंगा वाढीची अवस्था (६५ ते ७० दिवस) या महत्त्वाच्या सवेदांशिल अवस्थांमध्ये पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. 

 पिक संरक्षण

   रोग :-

 रोपांमध्ये मुळकुजव्या व खोड कुजव्या या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळतो. त्यामुळे ५ ते १० टक्के नुकसान होत, म्हणून या रोगांच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. तसेच नंतरच्या वाढीच्या अवस्थेत टिक्का व तांबेरा या रोगंचा प्रादुर्भाव आढल्यास पाण्यात मिसळणारे गंधक (८०%) २    किलो मंकोझेब १.२५ किलो किंवा करबेदाझिम २५० ग्रॅम ५०० लिटर पाण्यात मिसळून २० दिवसांच्या अंतराने गरजेनुसार फवारण्या कराव्यात.     

 

 

कीड :

खरिफ भुईमुगाच्या पिकावर मावा, फुलकिडे किंवा तुडतुडे या रस सोसणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसताच निंबोळी अर्क ५% किंवा अझेदरक्तीन २मी.ली.प्रती लिटर पाणी यांची फवारणी करावी. १५ दिवसांनी फवारणी करावी.  किंवा रोगोर ५०० मी.ली.किंवा मेट्यासिस्टोक ४०० मी.ली.यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी. पाने खाणाऱ्या व पाने गुंडाळणार अळीच्या बंदोबस्तासाठी प्रादुर्भाव दिसताच प्रती हेक्टर सायपर्मिठ्रिन २० ई. सी. २५० मी.ली.किंवा देकमेथरिन ५०० मी.ली.किंवा कविणफोस २५. ई. सी. १००० मी.ली.यापैकी कोणत्याही कीटकनाशकाची १५ दिवसांच्या अंतराने ५०० लिटर पाण्यात मिसळून २ ते ३ फवारण्या कराव्यात. 

 

काढणी ,उत्पादन आणि साठवण  :-

      भुईमूगाचा पला पिवळा दिसू लागल्यावर आणि शेंगांचे टरफल टणक होऊन आतल्या बाजूने काळसर दिसू लागताच काढणी करावी. काढणीनंतर शेंगा चांगल्या वाळवाव्यात व पोत्यात भरून ठेवाव्यात.शेंगतील आद्रतेचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत खाली आणावे. शेंगा बियाण्यास वापरावयाच्या असल्यास सावलीत वाळवाव्यात अन्यथा बियाण्याची उगणक्षमता कमी होते. सुधारित पदधतीने लागवड केल्यास खरीप भुईमूगापासून सर्वसाधाणपणे प्रती हेक्टर २५ ते ३० क्विंटल वाळलेल्या शेंगांचे उत्पादन मिळते. याबरोबरच ५ ते ६ टन ओला चारही मिळतो.

लेखक 

  1. सुशील पंडीतराव दळवी (90961 11855)
  2. समाधान दि. जाधव
  3. पवन ज्ञा. थोरहाते

सह्या.प्रा. विवेकानंद कृषी महाविद्यालय हिवरा बू. ता.मेहकर जि.बुलढाणा.

English Summary: Ground nut farming : how does increased productive ; know the cultivation method
Published on: 27 June 2020, 11:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)