Agripedia

हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती ,झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरुन आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरुन

Updated on 09 February, 2022 4:22 PM IST

हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती ,झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरुन आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरुन वाढलेली पिके फुलो-यावर आली म्हणजे शेतात नांगरून ती गाडून एकजीव करणे या वनस्पतींच्या हिरव्या व कोवळ्या अवशेषांपासून तयार झालेल्या खतास "हिरवळीचे खत "असे म्हणतात.

 

हिरवळीच्या खताचे फायदे :

ही खते जवळजवळ प्रति हेक्टरी ५० -१७५ किलो नत्राचे योगदान करते .

फार मोठ्या प्रमाणात जमिनीत कर्बाचे प्रमाण वाढवते .

मातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवणयाची क्षमता वाढवते.

मातीत फायदेशीर सुक्ष्म जीवाणूंच्या निर्मितीचे प्रमाण वाढवते

मातीच्या भौतिक रासायनिक व जैविक पोतावर किंवा वातावरणात कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही.

सर्वसाधारपणे शेंगवर्गीय पिकांपासून बनलेले १ टन हिरवळीचे खत २.८ ते ३ .० टन शेणखताच्या बरोबर असते .या खतांच्या आच्छादनाने जमिनीची धुप होत नाही .

 हिरवळीच्या खतांचे प्रकार:

शेतात लगवड करून घेण्यात येणारी हिरवळीची खते :- जेव्हा हिरवळीच्या खतांचे पीक शेतात सलग ,मिश्न किंवा एखाद्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून पेरतात व त्याच शेतात ते पीक फुलो-यावर येण्यापूर्वी शेतात नागंरून मिसळतात ,तेव्हा त्याला शेतातच घेण्यात येणारे हिरवळीचे खत असे म्हणतात .या प्रकारच्या हिरवळीच्या खतामध्ये ताग, गवार ,चवळी ,धैचा ,मूग ,मटकी ,मेथी ,लाख ,मसूर ,वाटाणा ,उडीद ,कुळीथ,सेंजी,शेवरी ,लसुरघास ,बरसीम या पिकांचा समावेश असतो.

हिरव्या कोवळ्या पानांचे हिरवळीचे खत :- पडीक जमिनीवर अथवा जंगलात वाढणा-या वनस्पतीची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात गाडणे अथवा पडीक जमिनीवर किंवा शेताच्या बांधावर हिरवळीच्या झाडांची लगवड करून त्याचा पाला आणि कोवळ्या फांद्या शेतात पसरवून नांगरणीच्या अथवा चिखलणीच्या वेळी मातीत मिसळणे होय .हिरवळीच्या खतासाठी गिरिपुष्प , शेवरी ,करंज ,सुबाभुळ ,टाकळा,कर्णिया,ऎन ,किंजळ यांची झाडे व झुडपे पडीक जमिनीत वाढ्वून त्यांच्या हिरव्या पानाण्चा व कोवळ्या फांद्याचा हिरवळीच्या खतासाठी वापर करतात .

 

 हिरवळीचे खत तयार करण्याच्या पध्दती:

निरनिराळ्या हंगामातील पिकांचे हिरवळीचे खत करण्याच्या वेळी हिरवळीचे पीक फुलो-यावर आलेले असावे .ही पिके ६ ते ८ आठवड्यात फुलो-यावर येतात .ही पिके ज्या शेतात घेतली असतील त्याचे खत तयार करावे .या हिरवळीच्या पिकांची पाने बाहेरून आणतात ती जमिनीवर पसरवून नांगरामागे टाकून गाडावीत .ट्रायकोडरमा चा उपयोग केल्यास ह्या खताची प्रत वाढविता येईल .

 

नुकत्याच फूलो-यात आलेले हिरवळीच्या पिकांची जमिनीलगत कापणी करावी . कापलेले हिरवळीचे पीक शेतात लोखंडी नागंराने तास घेउन नागंराच्या प्रत्येक सरीमध्ये उपलब्ध प्रमाणात टाकावे .नंतर नागंराच्या दुस-या तासाच्या वेळी अन्यथा धानाच्या चिखलणीच्या वेळी संपूर्ण गाडले जाईल याची काळजी घ्यावी .हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरुन फळी किंवा मैद फिरवावा .त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय पदार्थ पूर्णपणॆ झाकले अथवा दाबले जाऊन ते कुजण्याची क्रिया वेगाने सुरु हाते.

 

हिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा लागतो म्हणून सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून अथवा पावसाच्या सुरवातीस करुन आँगस्टमध्ये गाडणी करावी . हिरवळीचे पीक गाडण्याच्या वेळी जर पाऊस पडला नाही किंवा जमिनीलगत ओलावा कमी असेल तर पाणी द्यावे .त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होईल .

शेतात उपलब्ध काडी कचरा व गवत ह्यांचे ढिग शेतात जागोजागी करुन कुजण्यास ठेवावे व योग्यवेळी जमिनीत गाडावे कुजण्याची प्रक्रिया लवकर होण्यास ३ .५ फुट x ३.५ फुट खड्डयात गवत व काडी कचरा कुजवता येईल .

कपाशीच्या रांगामध्ये तूणधान्य ,शेगवर्गीय व तेलवर्गीय पीक घेऊन ह्या पिकांच्या कापणी नंतर कपाशीच्या रांगामध्ये जमिनीत पुरावे ,उत्तम हिरवळ खत म्हणून कपाशीवर ह्याचा परिणाम दिसून येतॊ . सोयाबिन ,तूर व ज्वारी सोबत पेरून ,सोयाबीन हिरवळखत म्हणून वापरता येईल ;ज्वारी व तूर ह्यांचे उत्पादनात वाढ होईल .

हिरवळीच्या खतांची पिके :

ताग / बोरु - ताग हे हिरवळिचे उत्तम खत आहे .ज्या विभागात पुरेसा पाऊस अथवा सिंचनाच्या पाण्याची हमी असते तेथे तागाचे पीक घेण्यात यावे .सर्व प्रकारच्या जमिनीत या खताची वाढ चांगली होत असली तरी आम्लधर्मिय जमिनीत या पीकांची वाढ जोमाने होत नाही .तसेच पाणी साचून राहणा-या शेतात तागाची चांगली वाढ होत नाही .पावसाळ्याच्या सुरूवातीस तागाचे बी हेक्टरी ५० ते ६० किलो पेरावे .पेरणीनंतर ५ ते ६ आठवड्यांनी हे पीक फुलो-यावर येण्याच्या सुमारास ६० ते ७० से .मी .उंच वाढली असतांना नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडून टाकावे .तागामध्ये नत्राचे प्रमाण ०.४६ टक्के असून या पिकापासून हेक्टरी ८० ते ९० किलो नत्र मिळते .

धैचा - तागापेक्षा काटक असे हिरवळीचे हे पीक असून कमी ,पर्जन्यमान ,पाणथळ िकाण ,क्षारमय अथवा आम्लधर्मीय जमिनीत सुद्धा हे पिक तग धरु शकते .या वनस्पतीच्या मुळांवर तसेच खोडावरही गाठी दिसून येतात या गाठीमध्ये रायझोबियम जीवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात . या पिकांच्या लगवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० किलो बियोणे पावसाळ्याच्या सुरूवातीस शेतात पेरावे . बियाण्याची उगवण लवकर होण्यासाठी त्यास गंधकाची प्रक्रिय करून परत थंड पाण्याने धुवावे आणि त्यानंतर रायझॊबियम जीवाणू संवर्धनाची प्रक्रिय बियाण्यास करावी .पिकाच्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करून पीक ६ ते ७ आठवड्यात ९० ते १०० से .मी .उंचीपर्यत वाढले असता जमिनीत नांगराने गाडून टाकावे .या काळात धैच्यापासून १० ते २० टनापर्यत हिरव्या सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते .या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण ०.४६ ट्क्के इतके आहे .भाताची लावणी करण्यापूर्वी आठ दिवस पीक जमिनीत गाडल्यास हेक्टरी ८० किलो नत्राची उपलब्धता होऊ शकते .

घेवडा - हे पीक कमी पर्जन्यमान व हलक्या प्रतीच्या जमिनीत चांगले वाढते .पाणथळ जमीनीस हे पीक योग्य नाही .पावसाळ्याच्या सुरूवातील प्रती हेक्टरी ५० किलो बियोण पेरावे .नतर आँगस्टच्या दुस-या आठवड्यात ते जमिनीत गाडावे .

सेंजी - रब्बी हंगामासाठी हे उपयुक्त हिरवळीचे खत आहे . सिचनाची सोय असलेल्या ठिकाणी हेक्टरी ३०त े ४० किलो बियाण्याचा वापर करून पेरणी करावी .जानेवारीच्या अखेरीस जमिनीत गाडण्यास ते योग्य होते.उसाच्या पिकास ते योग्य हिरवळीचे खत आहे .

द्विदल कडधान्याची पिके - पावसाळ्याच्या सुरुवातीस शेत तयार करून मूग ,चवळी ,उडीद ,कुळी्थ ,गवार ,यांचे बियाणे शेतात पेरले असता या द्विदल वर्गीय पिकांचा हिरवळीच्या खतासाी चांगला उपयोग होतो जमिनीची पुर्व मशागत केल्यावर मूग ,उडीद ,कुळीथ यासाठी २५ ते ३० कि .ग्रँ . प्रति हेक्टरी बियाणे पेरावे पेरणीपुर्वी बियाण्यास राय़झॊबियम जीवाणु चोळूण आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात .पीक फुलो-यावर येण्यापुर्वी नांगरणी करून जमिनीत गाडले असता यापासून प्रति हेक्टरी ५० ते ६० कि .ग्रँ .नत्र पिकास उपल्ब्ध होतो.

गिरीपुष्प (ग्लिरिसिडिया) - झुडुप वर्गातील हे हिरवळीचे खत कोणत्याही प्रकारच्या जमिनीत तसेच निरनिराळ्या पर्जन्यामानाच्या प्रदेशात चांगले येते .या झाडाची लगवड दोन प्रकारे करतात .पहिल्या पध्दतीत छाट कलमाद्वारे लागवड करण्यासाठी ३० से .मी . लांब ३ सेमी .व्यासाची दोन छाट कलमे निवडून पावसाळ्याच्या सुरुवातीस ३० x३० x ३० सेमी .आकाराचा खड्डा करून बाधावर अथवा पडीक जमिनीत लगवड करावी .दुस-या पध्दतीत गादी वाफे तयार करून अथवा प्लँस्टिकच्या पिशवीत बी पेरून रोपे तयार करावे .ही रोपे ५ आठवड्यांची झाल्यावर पावसाच्या सुरूवातीस शेताच्या बांधावर खड्डे खोदून लावावीत .

संकलन - विजय भुतेकर चिखली

English Summary: Green manure do work as and this is benefits
Published on: 09 February 2022, 04:22 IST