यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे, पाऊसाळ्याच्या सुरवातीला अतिवृष्टी मुळे द्राक्ष समवेत सर्वच फळाबागांचे मोठे नुकसान झाले होते तेव्हा लाखोंचा खर्च करून रोगावर नियंत्रण प्राप्त केले होते. आता देखील अवकाळीमुळे अनेक रोग द्राक्षे बागांवर बघायला मिळत आहेत.
अवकाळी नंतर तयार झालेल्या वातावरणामुळे द्राक्षे बागांवर डाउनी, करपा, मोठ्या प्रमाणात दिसत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षे लागवड केली जाते, विशेषता नाशिक जिल्ह्यात याची लागवड लक्षणीय आहे. आणि डाउनीचा प्रादुर्भाव हा नाशिक जिल्ह्यातील द्राक्षे बागांवर प्रकर्षाने जाणवून येत आहे. जिल्ह्यातील द्राक्षे बागा ह्या फुलोरा अवस्थेत अधिक बघायला मिळत आहेत, त्यामुळे या अवस्थेतील बागांवर मनींगळ व घडकूज याचा देखील प्रादुर्भाव दिसतोय. अनेक बागा ह्या फळधारणाच्या अवस्थेत आहेत अशा बागांवर डाउनी वाढल्यास घडकूज होऊन द्राक्षे मन्यांची क्वालिटी हि खराब होऊ शकते. म्हणुन यावर नियंत्रण मिळवणे महत्वाचे आहे.
असे करा डाउनीला डाउन
डाउनीचा प्रादुर्भाव जर जास्त वाढला तर उत्पादनात कमालीची घट घडून येऊ शकते. म्हणुन यावर लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी कृषी वैज्ञानिकांनी काही औषधंची फवारणी करण्याची शिफारस केली आहे. डाउनीचा धोका टाळण्यासाठी
»अमिसूलब्रोम 17.7 % एस.सी. या बुरशीनाशकाचा वापर करावा. 0.38 मि.लि./लिटर पाणी हे प्रमाण घेऊन ह्या औषधाची फवारणी करावी.
»किंवा डायमिथोमॉर्फ 50 डब्ल्यू.पी. याचा देखील वापर चांगला ठरू शकतो. 0.50 ग्रॅम /प्रति 1 लिटर हे प्रमाण यासाठी घ्यावे.
»मॅडीप्रोपॅमीड एस. सी. ह्या औषधाची फवारणी देखील चांगला रिजल्ट देऊ शकते. यासाठी 0.8 मि.लि./लीटर पाणी हे प्रमाण घ्यावे.
ह्या पद्धतीने डाउनिवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांनी कुठलीही फवारणी करण्याआधी कृषी वैज्ञानीकांचा सल्ला घेणे बंधनकारक ठरते. द्राक्षे बागांवर बदलत्या हवामानाचा मोठा गंभीर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे वेळेवर उपाययोजना करण्याचा सल्ला दिला जात आहे.
माहिती स्रोत टीव्ही9
Published on: 16 December 2021, 12:23 IST