Agripedia

बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे अथवा २ ग्रॅम थायरम अ २ ग्रॅम कार्बन्डॅझीम एकत्र करून प्रति केिली बियाण्यास चोळावे.

Updated on 24 September, 2021 11:01 AM IST

यानंतर १o किलो बियाण्यास रायझोबियम जिवाणू संवर्धनाचे २५० ग्रॅम वजनाच्या एका पाकिटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. 

 

गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. 

 

बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे हरभ-याच्या मुळावरील ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो आणि पिकाचे ३ ते ५ टक्के उत्पादन वाढते.

 

बियाणे प्रमाण

 

हरभन्याच्या विविध दाण्यांच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण वापरल्याने हेक्टरी रोपाची संख्या अपेक्षित मिळते. 

विजय या मध्यम दाण्याच्या वाणाकरिता ६५ ते ७0 किलो, तर विशाल, दिग्विजय आणि विराट या टपो-या दाण्यांच्या वाणाकरिता १oo किलो प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे. 

 

तसेच कृपा आणि पी. के. व्ही. ४ या जास्त टपोच्या काबुली वाणांकरिता १२५ ते १३० किलो प्रतिहेक्टर बियाणे वापरावे. 

 

हरभरा सरी- वरंब्यावरही चांगला येतो. ९0 सें.मी. रुंदीच्या स-या सोडाव्यात व वरब्यांच्या दोन्ही बाजूला १० सें.मी. अंतरावर बियाणे टोकण करावे. 

 

काबुली वाणासाठी जमीन ओली करून वापशावर पेरणी करावी.

 

संकलन-

विजय भूतेकर, चिखली

प्रतिनिधी- गोपाल उगले

 

English Summary: Gram seed processing and bacteriology
Published on: 24 September 2021, 11:01 IST