हरभरा पिकासाठी 10किलो नत्र (nitrogen), 20 किलो phosporous, 12 किलो potassium ची आवश्यकता असते. हे घटक एकाच वेळी न देता दोन टप्प्यांमध्ये विभागून द्यावे. कारण आपण पेरणी करतो त्यानंतर काही दिवसांनी पिकाची शाकीय वाढ़ सुरु होते त्या वेळी पिकाला तीनही घटक NPK लागतात., आणि जेव्हा reproductive growth सुरु होते म्हणजे जेव्हा फुलं लागायला सुरुवात होते तेव्हा phosporous ची गरज जास्त असते., यासाठी पेरणीसोबत 10:26:26 एकरी 50किलो आणि त्यासोबत 6किलो sulphur द्यावे (तुम्ही इतर खत घेत असाल तर त्यामध्ये NPK चं % बघून त्यानुसार वर दिलेले levels maintain करावे ).यामधून 5 किलो Nitrogen ; 13 किलो Phosporous; 13 किलो Potassium पिकाला मिळतं. हा झाला खताचा पहिला डोस, त्यानंतर 26-30 दिवसांच्या दरम्यान खताचा दुसरा डोस द्यावा,
यासाठी 12 किलो यूरिया ; 50 किलो Single Super Phosphate (SSP) दोन्ही मिक्स करून मातीमध्ये टाकावं यामधून पिकाला 5किलो Nitrogen आणि 8 किलो Phosporous पिकाला मिळतं.
ज्यामुळे reproductive stage boost होते, खतं देतांना जमिनीमध्ये ओलावा असणे आवश्यक आहेहरभरा फवारणी नियोजन (अन्नद्रव्य व्यवस्थापन)हरभरा पिकाची vegetative growth stage 20 दिवसांनी सुरु होते,पेरणीनंतर 25-35 दिवसांच्या दरम्यान पिकाला शाकीय वाढीसाठी व फांदया जास्त येण्यासाठी योग्य ते घटक देणे गरजेचे असते, यामध्ये पहिला घटक आहे Auxin ऑक्सिन हा एक plant harmone(वनस्पती संजीवक ) आहे जो पिकामध्ये नैसर्गिक रित्या तयार होतो पण जर आपण externally ऑक्सिन या घटकाची फवारणी केल्यास शेंड्याची वाढ़ जोमाने होते म्हणून हा घटक असणारे औषध पहिल्या फवारणी मध्ये घ्यावे, तसेच फांदया जास्त येण्यासाठी Cytokinin सायटोकायनिन किंवा सायटोकिनीन हा plant harmone महत्वाचा असतो जो पिकामध्ये तयार होतो आणि फांदया निघायला सुरुवात होते म्हणून Cytokinin हा घटक असणारे औषध पहिल्या फवारणी मध्ये घ्यावं ज्यामुळे फांदया जास्त येतात.
Cytokinin(सायटोकायनिन) आणि Auxin (ऑक्सिन) घटक असणारे औषध फवारणी केल्यामुळे झाडाची वाढ़ होईल व फांदया सुद्धा वाढतील पण या वनस्पती संजीवकांमुळे झाडाच्या खोडाचा आकार कमी होतं जाईल त्यासाठी पिकाच्या खोडाचा आकार वाढण्यासाठी आणि झाड मजबूत होण्यासाठी Amino Acid 22% हा घटक महत्वाचा असतो ज्यामुळे पिकाला प्रोटीन मिळून खोडाचा आकार वाढतो.
फ्लोरिजण हा plant harmone (वनस्पती संजीवक) फुलं निघण्यासाठी पिकामध्ये तयार होत असतो.
Gibrellic Acid + Cytokinin(जिब्रेलिक ऍसिड +सायटोकायनिन) या दोन घटकांच्या फवारणी मुळे फळाचा आकार वाढण्यास मदत होते.
Gibrellic Acid मुळे फळांमधील पेशी लांबट होतात आणि Cytokinin मुळे पेशी विभाजन होते.
योग्य घटकांनुसार हरभरा पहिली फवारणी
1)Spring Ever (Cytokinin+Humic)
Spring Ever या औषधामध्ये वनस्पती संजीवक Cytokinin आणि Humic चं कॉम्बिनेशन असल्यामुळे या औषधाने झाडाच्या पांढऱ्या मुळांची वाढ़ होते आणि फांदया वाढतात.
2)Allwin Gold Super(ऑल्विन गोल्ड सुपर)
(Amino Acid+ Potassium Based Ajurvants)
Allwin Gold Super या औषधामध्ये Amino Acid आणि त्यासोबत potassium based ajurvants असल्यामुळे झाडाच्या खोडाचा आकार वाढतो आणि झाड मजबूत होते.
3)EM-1(Emamectin Benzoate)/Bioclaim
EM-1 Emamectin Benzoate हे कीटकनाशक पानं खाणाऱ्या अळीसाठी प्रभावी आहे तसेच इतर कीटकांसाठी contact type मध्ये काम करून त्यांना नष्ट करते.
4)Roko (Thiophanate Methyl)
थायोफेनेट मिथाईल हा घटक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे ज्यामुळे मररोग, मूळकूज व इतर बुरशीजण्य रोगांपासून पीक संरक्षित होते.
पहिली फवारणी मात्रा(Dose)
1)Spring Ever (Cytokinin+Humic+Fulvic+seaweed) (40मिली/15 लिटर)
2)Allwin Gold Super (Amino Acid +Potassium Based Ajurvants) (35मिली /15 लिटर)
3)EM-1(Emamectin Benzoate)(15ग्राम/15 लिटर )
4)Roko(Thiophanate Methyl) (15ग्राम/15 लिटर)
हरभरा दुसरी फवारणी
1)Flower Magic (Based On NB)
20मिली/15 लिटर
2)Tebuconazole +Sulphur (बुरशीनाशक)
15 ग्राम/15 लिटर
3)Emamectin Benzoate* (insecticide)
15 ग्राम/15 लिटर
हरभरा तिसरी फवारणी (Optional)
फुलगळ थांबविण्यासाठी/फुलं गळ होऊ नये म्हणून
1)Hydro Proकिंवा tata bahaar (Protein Hydrolysate) 30मिली /15 लिटर
2)Micronutrient
(zinc+boron+calcium)
25ग्राम/15 लिटर
3)0:52:34 80ग्राम/15 लिटर
हरभरा शेवटची फवारणी
दाना भरतांना
1) Gibrellic Acid
40मिली/15 लिटर
2)0:0:50 80ग्राम/15 लिटर
3)Lambda Cyhalothrin (Insecticide)
15मिली/15 लिटर
5)Roko(Thiophanate Methyl) Fungicide
15 ग्राम/15 लिटर
Published on: 12 December 2021, 08:22 IST