Agripedia

रब्बी हंगामातील मुख्य पीक म्हणून हरबरा या पिकाकडे बघितल्या जाते. आणि हे पीक शेतकऱना मोठे नफा मिळून देणार आहे. त्यामूळे शेतकरी वर्गाने या पिकाचा अभ्यासपूर्वक नियोजन केले पाहिजे.

Updated on 23 October, 2021 8:21 PM IST

आंतरमशागत

पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवातीपासूनच तण विरहीत ठेवावे. पीक २० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वापशावर करावी. कोळपणीमुळे जमिनीत हवा चांगली खेळती राहते आणि पिकाची वाढ चांगली होते. कोळपणीनंतर एक खुरपणी करावी. कोरडवाहू क्षेत्रामध्ये कोळपणीमुळे जमिनीत पडत असलेल्या भेगा बुजून जातात आणि ओल टिकून राहते. तणनियंत्रणासाठी तणनाशक वापरावयाचे असल्यास पेरणी करताना वापशावर स्टॉप (पेंडीमेथीलीन) हे तणनाशक २.५ लिटर प्रति हेक्टर प्रमाणे 500 लिटर पाण्यातून फवारावे. फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे.

पाणी व्यवस्थापन:-

जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. बागायत हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन साऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुध्दा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यमजमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीसपाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा होतात. त्यासाठी पहिले पाणी ३०-३५ दिवसांनी व दुसरे पाणी ६५-७० दिवसांनी द्यावे. हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे २५ सेंमी पाणी लागते. प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर ( ७ ते ८ सें.मी.) देणे महत्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यामध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडण्याच्या आतच पिकास पाणी द्यावे. पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा मुळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते.

पीक संरक्षण:-

पेरणी झाल्यानंतर 20-25 दिवसांच्या आत एकरी किमान 10 हेलीको ल्युर व फनेल ट्रॅप लाऊन घ्यावेत. त्यामुळे किडीचे शेतामधील प्रमाण व 50-60% किडीचे नियंत्रण होईल. हरभरा पिकाचे घाटेअळीमुळे ३० ते ४० टक्के नुकसान होते. पीक ३ आठवडयाचे झाले असता त्यावर बारीक अळया दिसू लागतात. पानांवरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले दिसतात. 

याकरिता पिकास फुलकळी लागण्याच्या वेळेस पहिली फवारणी करावी. यासाठी २५ किलो निंबोळी पावडर रात्रभर ५० लिटर पाण्यात भिजत ठेवावी. सकाळी कापडाच्या सहाय्याने अर्क काढून त्यामध्ये ४५० लिटर पाणी टाकावे. असे द्रावण १ हेक्टर क्षेत्रावर फवारावे.  पुढे १० ते १५ दिवसांनी हेलिओकिल ५०० मिली ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टर या विषाणूजन्य किटकनाशकाची फवारणी करावी. आवश्यकता असेल तरच तिसरी फवारणी १८.५ % एस.सी. क्लोरॲन्ट्रीनिलीप्रोल १०० मिली हेक्टरला ५०० लिटर पाण्यातून फवारावे, या किडीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने चांगले होते.  त्यासाठी पेरणीच्या वेळी २०० ग्रॅम ज्वारी बियांमध्ये मिसळून शेतामध्ये पेरावी. या पिकांचा मित्रकिडींच्या आकर्षणासाठी उपयोग होतो. नैसर्गिक पक्षिथांबे तयार होतात त्यामुळे घाटेअळीचे नियंत्रण होते. त्यावर कोळसा, चिमण्या, साळुंख्या असे पक्षी येतात आणि अळ्या वेचतात .

काढणी:-

११० ते १२० दिवसांमध्ये हरभरा पीक तयार होते. पीक ओलसर असताना काढणी करु नये. घाटे कडक वाळल्यानंतर मगच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी. यानंतर धान्यास ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवावा. त्यामध्ये कडुलिंबाचा पाला (५ टक्के) घालावा. त्यामुळे साठवणीत कीड लागत नाही.

 

उत्पादन:-

अशाप्रकारे सुधारित वाण आणि तंत्रज्ञान वापर करून हरभऱ्याची शेती केल्यास सरासरी २५ ते ३० क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते.

- IPM school

English Summary: Gram crop management
Published on: 23 October 2021, 08:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)