Agripedia

ईशान्य कडील भागातील शेतकऱ्यांसाठी मिशन ऑरगॅनिक व्हॅल्यू चैन डेव्हलपमेंट आणि पारंपरिक कृषी योजनाया दोन योजना

Updated on 31 March, 2022 7:18 PM IST

ईशान्य कडील भागातील शेतकऱ्यांसाठी मिशन ऑरगॅनिक व्हॅल्यू चैन डेव्हलपमेंट आणि पारंपरिक कृषी योजनाया दोन योजना शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सन दोन हजार पंधरा ते सोळा पासून सुरू करण्यात आले आहेत. या योजनांच्या माध्यमातून पिकांची लागवड करण्यापासून तर काढणी आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापनअसे विषय हाताळण्यात येणार आहेत.या योजनांचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून सेंद्रिय शेती वाढवण्यासाठी देखील यांची मदत होणार आहे.यामध्ये पारंपरिक कृषी विकास योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये आणि तीन वर्षासाठी तात्पुरती मदत करणार असल्याचे कृषी कल्याणमंत्री कैलास चौधरी यांनी सांगितले. या माध्यमातून हेक्टरी 31 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहेत. 

सध्या पीक वाढीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करतात. आपल्याला माहित आहेच की रासायनिक खतांच्या वापरामुळे जमीन तर नापीक होतच आहेत.

सेंद्रिय शेतीला मदत करण्यासाठी आहे हे अत्याधुनिक मोबाईल ॲप 

सेंद्रिय शेती बद्दल ची माहिती आणि तिचे फायदेशेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावेत यासाठी केंद्र सरकारने एक अत्याधुनिक असे ॲप तयार केले आहे.

या ॲपच्या माध्यमातून सेंद्रिय उत्पादन,शेतमालाचे दर आणि भविष्यातील मार्केट यासंबंधी माहिती शेतकऱ्यांना सहज मिळणार आहे.या ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत पाच लाख 73 हजार शेतकरी जोडले गेले आहेत. यामध्ये किसान पोर्टल आणि त्यांच्या बायो उत्पादनांचा तपशील अपलोड केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल विक्री करणे अधिक सोयीस्कर आणि सुलभ होणार आहे.

तसेच त्यामुळेआरोग्याला देखील मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे.कोरोना कालावधीपासून प्रत्येकजण स्वतःच्या आरोग्याबद्दल सजग झाला असून हळूहळू सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढताना दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात सेंद्रिय शेतीला अच्छे दिवस येतील या दुमत असण्याचे काही कारण नाही. याच गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकार देखील सेंद्रिय शेतीवर भर देत आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळावे म्हणून शेतकऱ्यांना मदत स्वरूपात 50 हजार रुपये मदत करून सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी दोन योजना राबवल्या जाणार असल्याचे केंद्रीय कृषि कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी लोकसभेमध्ये सांगितले.

सेंद्रिय शेती म्हणजे शेतीत रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरण्याऐवजी सेंद्रिय खत किंवा नैसर्गिक खतचा वापर करणे.

 ही शेतीची पारंपारिक पध्दत आहे, ज्यामुळे जमिनीची सुपीकता सुधारते आणि पर्यावरणाचे प्रदूषण कमी होते. सेंद्रिय शेतीचा अवलंब करून शाश्वत शेती, जैवविविधता संवर्धन इत्यादीचे ध्येय साध्य करता येते. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे महत्वाचे आहे. दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि मातीची घटनारी उत्पादकता या दुष्परिणामांचा नाश करण्यासाठी सेंद्रिय शेती हा एक उपयुक्त पर्याय असू शकतो.

English Summary: Government give founding for organic farming this is more benifits
Published on: 31 March 2022, 07:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)