Agripedia

शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ.नैसर्गिक आपत्तिमूळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बरेच शेतकरी यांचा मृत्यू ओढावतो

Updated on 05 December, 2021 9:00 PM IST

किंवा काहींना अपंगत्व येते घरातील कर्त्या व्यक्तिस तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यास झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवुन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकरी/ त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने सन २००५/०६ पासून शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना कार्यान्वित केलेली आहे. सन २०१५/१६ पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राज्यात सुरु करण्यात आलेली आहे.

 

पात्रता

अ) महाराष्ट्र राज्यातील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदीनुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई, वडिल, शेतकऱ्यांची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकुण दोन जण.

ब) सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र शेतकऱ्यांने / शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वीत असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी या योजने अंतर्गत लाभास पात्र असणार नाही.

                                                

नुकसान भरपाईची रक्कम

अ) अपघाती मृत्यू  रुपये २ लाख

ब) अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे रुपये २ लाख                                            

क) अपघातामुळे १ डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे  रुपये १ लाख                                     

विमा पॉलिसी कालावधी

      ०७.०४.२०२१ ते ०६.०४.२०२२

सदरचा दावा दुर्घटनेनंतर शक्यतो ४५ दिवस कालावधीत नोंदवण्यात यावा.

आवश्यक कागदपत्रे

अ) लाभ घेण्याकरिता दावा दाखल करताना सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे

१) विहित नमुन्यातील पुर्व सुचनेचा अर्ज (सहपत्र क्र.१) पुर्व सूचनेसोबत आवश्यक कागद पत्रे

२) ७/१२ उतारा, ८/अ (मुळ प्रत)

३) मृत्यू दाखला (स्वयं साक्षांकीत प्रत)

४) प्रथम माहिती अहवाल

५) विजेचा धक्का, विज पडून मृत्यू, रस्ते अपघात, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, उंचावरुन पडून झालेला मृत्यू, सर्प दंश/ विंचू दंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलिस पाटील अहवाल

६) घटनास्थळ पंचनामा (स्वयं साक्षांकीत प्रत)

७) वयाचा दाखला (नसल्यास शपथपत्र, आधारकार्ड, मतदान कार्ड)

आ) प्रस्तावासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे

१)ज्या नोंदीवरुन अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे नाव ७/१२ वर आले असेल अशी संबंधीत फेरफार नोंद (गाव नमुना नं.६ ड) मुळ उतारा अथवा फेरफार नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिका-याने दिलेले प्रमाणपत्र.

२) शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गाव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद. मुळ उतारा अथवा वारसाच्या नोंदीबाबत सक्षम प्राधिकृत अधिकार्याने दिलेले प्रमाणपत्र.

३) विहित नमुन्यातील कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र (प्रपत्र-ग) (मुळ प्रत)

४) याशिवाय अपघाताच्या घटनेच्या स्वरुपानुसार पुराव्यादाखल सादर करावयाची प्रपत्र-क मधील कागद पत्रे.

५) ७/१२ उतारा, ८/अ (मुळ प्रत)

६) वारसदाराचे राष्टियकृत बँकेच्या खाते पुस्तकाचे पहिले पृष्ठ

७) मृत्यू दाखला (स्वयं साक्षांकीत प्रत)

८) खातेदार शेतकरी कुटुंबाची शिधापत्रिका (शेतकऱ्यांचे नाते स्पष्ट करणारा पुरावा राजपत्रीत अधिकारी यांनी स्वाक्षांकीत केलेली)

 

पुराव्यादाखल सादर करावयाची प्रपत्र-क मधील कागदपत्र

१) रस्ता / रेल्वे अपघात

इन्क़्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टेम अहवाल, विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना.

२) पाण्यामध्ये बुडून मृत्यू

इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टेम अहवाल, बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल व क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक.

३) जंतूनाशक अथवा अन्य कारणामुळे विषबाधा

इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टेम अहवाल, रासायनीक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल).

४) विजेचा धक्का अपघात / विज पडून मृत्यू

इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टेम अहवाल.

५) खून

इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टेम अहवाल, रासायनीक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल), दोषारोप पत्र.

६) उंचावरून पडून झालेला मृत्यू

इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टेम अहवाल, पोलिस अंतीम अहवाल._

७) सर्प दंश / विंचू दंश

इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टेम अहवाल, वैद्यकीय उपचारापुर्वीच निधन झाल्याने पोस्टमार्टेम झाले नसल्यास या अहवालातून सूट मात्र वैद्यकीय अधिका-यांचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकाऱ्यांकडून प्रतिस्वाक्षरीत असणे आवश्यक.

८) नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टेम अहवाल, नक्षलवादी हत्येसंदर्भातील कार्यालयीन कागदपत्र.

९) जनावरांच्या चावण्यामूळे रेबिज होवुन मृत्यू

औषधोपचाराची कागदपत्रे.

१०) जनावरांच्या हल्ल्यात जखमी होवुन मृत्यूइन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टेम अहवाल

११) जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होवुन शव न मिळणे

क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक.

१२) दंगल

इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टेम अहवाल, दंगली बाबतची कार्यालयीन कागदपत्रे.

१३) अन्य कोणतेही अपघात

इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्टमार्टेम अहवाल, पोलिस अंतीम अहवाल.

१४) अपंगत्वाच्या लाभाच्या पुराव्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे

अपंगत्व अथवा अवयव निकामी होण्याचे कारणाबाबत डॉक्टरांचे अंतीम प्रमाणपत्र अथवा दवाखान्याच्या नोंदी, प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र/जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र, मेडिको लिगल सर्टिफिकेट, फोटो

वरिल १ ते १४मधील कागदपत्र मुळ किंवा राजपत्रीत अधिकारी यांनी स्वाक्षांकित केलेले अथवा स्वसाक्षांकीत (घोषणापत्र-ब नुसार) असल्यास ग्राह्य धरण्यात येइल. मृत्युच्या कारणाची नोंद सक्षम प्राधिका-याने स्पष्ट केली असल्यास रासायनीक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल) या कागद पत्रांची आवश्यकता राहणार नाही.

अर्ज कुठे करावा

तालुका कृषी अधिकारी कार्यालयात

१) विमा दाव्याच्या अनुषंगाने पुर्व सुचना अर्ज विहित कागदपत्रांसह ज्या दिनांकास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल/प्राप्त होइल व संगणक प्रणालीमध्ये अपलोड होइल त्या दिनांकासच तो विमा कंपनीस प्राप्त झाला आहे असे समजण्यात येइल.

२) विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह योजनेअंतर्गत विमा संरक्षित कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्यानंतर ९० दिवसांपर्यंत तालुका कृषी अधिकारी यांचेकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील३) शिवाय योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्या नंतर ९० दिवसांपर्यंत संगणक प्रणालीमध्ये नोंद झालेल्या पुर्वसुचना अर्जान्वये तालुका कृषी अधिकारी यांचेकडे प्राप्त होणारे विमा प्रस्तावसुद्धा विमा पॉलिसीचा कालावधी संपल्याच्या दिवसापासून ३६५ दिवसांपर्यंत स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील. मात्र सदर कालावधीनंतर कोणताही प्रस्ताव स्विकारला जाणार नाही. तसेच या संदर्भात ग्राहकमंच किंवा इतर निर्णय/आदेश शासनावर बंधनकारक राहणार नाहीत.

 

विमा कंपनी

दि.युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी ली.

ब्रोकर कंपनी- जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. नागपुर

संकलन - प्रवीण सरोदे कराड

English Summary: Gopinath Munde Farmers Accident Insurance Scheme.
Published on: 05 December 2021, 09:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)