आपल्या आहारामध्ये चवळी या कडधान्याचा समावेश असतोच जे की अनेक लोक अशी आहेत ज्यांना चवळी आवडते. सतत समावेश असणाऱ्या चवळीला बारमाही मागणी असते. महाराष्ट्र राज्यातील विविध भागांमध्ये चवळी या कडधान्य पिकाची लागवड केली जाते. चवळी ची लागवड करण्यासाठी मध्यम तसेच भारी आणि उत्तम पाण्याचा निचरा करणारी जमीन योग्य ठरते त्यामुळे पाणथळ, चोपण तसेच क्षारयुक्त जमिनीमध्ये चवळी पिकाची लागवड करणे टाळावी. पाण्याचा निचरा करणाऱ्या जमिनीमध्ये जर तुम्ही हे पीक घेतले तर उत्पादनही चांगल्या प्रकारे मिळते तसेच पिकाला पोषक अन्नद्रव्ये या जमिनीतून भेटतात.
प्रति हेक्टरी १५-२० किलो बियाणे लावणे गरजेचे:
चवळी या कडधान्य पिकाची लागवड करतेवेळी तुम्ही प्रथमता उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी. यानंतर प्रति हेक्टर ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. मृगाचा पाऊस झाला की नंतर कुळवाच्या दोन पाळ्या देणे गरजेचे आहे. जूनच्या शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये पेरणीयोगी पाऊस पडला की वाफसा येईल त्याचवेळी पेरणी करून घ्यावी. आपल्याकडे ही पेरणी जास्त प्रमाणावर केली जाते. प्रति हेक्टरी १५-२० किलो बियाणे लावणे गरजेचे आहे. पेरणी करतेवेळी दोन ओळींमध्ये ४५ सेमी तसेच दोन रोपांमध्ये १० सेमी अंतर ठेवणे आवश्यक आहे.
प्रति हेक्टरी १ किलो बियांनाना २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम कार्बेन्डेझीम चांगल्या प्रकारे चोळावे. हे झाल्यानंतर तुम्ही २५० ग्रॅम रायझोबियम हे जिवाणू संवर्धन १० ते १५ किलो बियानास गुळाच्या थंड द्रावनामध्ये चोळावे. २५ किलो नत्र तसेच ५० किलो स्फुरद या प्रमाणात चवळीला रासायनिक खतांची मात्रा देणे गरजेचे आहे. प्रति हेक्टरी पेरणी करताना १२५ किलो डीएपी खत द्यावे. जेव्हा पीक २० ते २५ दिवसांचे होईल त्यावेळी त्या पिकाची पहिली कोळपणी करावी तसेच ३० ते ३५ दिवसानंतर पिकाची दुसरी कोळपणी करणे गरजेचे आहे. पिकाची पेरणी झाली की ३० ते ३५ दिवस पिकामध्ये कोणत्याही प्रकारचे तण नसावे. चवळी पिकासाठी जमिनीचा सामू हा उदासीन असावा.
जो पर्यंत जमिनीमध्ये पाण्याचा साठा आहे तो पर्यंत पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते. परंतु जर फुले येण्याचा काळ असो किंवा दाणे भरण्याचा आणि परिपक्व होण्याचा जो कालावधी असतो त्यावेळी जर पाण्याची टंचाई झाली तर चवळी पिकाच्या उत्पादनामध्ये चांगलीच घट होते. अशा वेळी तुम्ही पिकाच्या वाढीसाठी दोन ते तीन वेळा पाणी देणे गरजेचे आहे म्हणजे पिकाचे सरंक्षण ही होते आणि पिकाची वाढ होऊन उत्पन्न ही चांगले मिळते.
Published on: 11 February 2022, 06:40 IST