शेतकऱ्यांच सोन समजल्या जाणाऱ्या कापसाला यंदा चांगला भाव मिळेल.१५ टक्के कापसाचे उत्पादनही वाढेल. जिनिंगलाही चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा या आंतराष्ट्रीय परिषदेत सहभागी तज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून तोटा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच कापसावरील आधारीत टेक्टटाईल्स क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार
आहे. चीन, पाकिस्तान, बांगलादेश येथे कापसाचे ४० ते ४५ टक्के नुकसान झाले आहे.40 to 45 percent loss of cotton has been reported in China, Pakistan, Bangladesh. त्याचा फायदा भारताला होणार असून कापसाची (Cotton) सर्वत्र निर्यात वाढणार आहे.
हे ही वाचा - पाण्याचे योग्य नियोजन, अत्यंत महत्त्वाची यशोगाथा
जागतिक पातळीवर कापूस उत्पादनात अग्रेसर असलेल्या चीन, पाकिस्तान आणि अमेरिकेत कापूस पिकाचे मोठे नुकसान झाल्याने भारतीय कापसाला मोठी मागणी निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी चीन, पाकिस्तान तसेच बांगलादेशातून
कापसासाठी मागणी होती. त्याठिकाणी भारतातून कापसाची निर्यात वाढेल. गेल्या काही वर्षांपासून कापसाचे जे बीटी वाण आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रोग आले असून त्याचा सामना शेतकऱ्यांना नुकसानाच्या स्वरुपात करावा लागत आहे. शासनाने नवीन वाणाची निर्मीती करावी, जेणेकरुन त्यावर रोग येणार नाही अशी विनंती परिषदेच्या माध्यमातून शासनाला करण्यात आली असून त्यामुळे शेतकऱ्याचे
एकरी उत्पन्न वाढेल असा आशावाद खान्देश जिनिंग असोसिएशन अध्यक्ष प्रदीप जैन यांनी व्यक्त केला. देशात केळीपाठोपाठ जळगाव जिल्हा हा कापूस उत्पादनातही तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर कापूस निर्यात करण्यात अग्रेसर जिल्हा आहे.शेतकरी ते शेवटचा घटना उत्पादक यापर्यंत ती पोहचण्यास मदत होते. त्यामुळे उत्पादनासाठी, शेतीतील तोटे नुकसान
कमी होतील. शास्वत विकास साधता येईल, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास या क्षेत्रातील धोके टाळता येतील. त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पादन वाढावा, त्याला फायदा व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कापूस परिषदेत महत्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती खान्देश जिनिंग असोसिएशनचे सचिव अतुल जैन यांनी दिली.
Published on: 22 September 2022, 01:47 IST