Agripedia

राज्यात काही भागात झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. खरीप पिकांच्या पेरणीची लगबग सुरु झाली आहे. खरीप पिकांच्या पेरणीमध्ये योग्य जमिनींत, योग्य वेळी, योग्य अंतरावर पेरणी करण्याबरोबरच खत व्यवस्थापनास पीक उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्व आहे.

Updated on 05 July, 2022 11:07 PM IST

राज्यात काही भागात झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. खरीप पिकांच्या पेरणीची लगबग सुरु झाली आहे. खरीप पिकांच्या पेरणीमध्ये योग्य जमिनींत, योग्य वेळी, योग्य अंतरावर पेरणी करण्याबरोबरच खत व्यवस्थापनास पीक उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्व आहे. पिकाच्या वाढीसाठी योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य खतांची मात्रा देणे आवश्यक आहे. माती परीक्षणानुसार खते दिल्यास पीक उत्पादनात वाढ होऊन, जमिनीची सुपिकता टिकून राहील. प्रस्तुत लेखात खरीप हंगामातील पिकांसाठी जमिन व खत व्यवस्थापन यावर माहिती दिलेली आहे.

सोयाबीन:

जमिन: मध्यम खोलीची,चांगला निचरा होणारी,अत्यंत हलकी,उथळ तसेच मुरमाड जमिनीत लागवड करू नये. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त वा रेताड जमिनीत पीक घेऊ नये. जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चांगले असावे.
शेणखत/कंपोस्ट खत : १२ ते १५ टन/हेक्टरी

रासायनिक खते :

५०:७५:४५ नत्र:स्फुरद:पालाश किलो /हेक्टरी + २० किलो गंधक
२५ किलो झिंक सल्फेट आणि १० किलो बोरॅक्स प्रति हेक्टरी द्यावे.
पीक २० ते २५ दिवसाचे असताना सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिवळे पडल्यास
सुक्ष्म अन्नद्रव्याची ५० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी
शेंगा लागण्याच्या अवस्थेत १९:१९:१९ तर शेंगा भरण्याच्या अवस्थेत ०:५२:३४ या विद्राव्य खतांची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा.

सुर्यफुल :

जमिन:मध्यम ते भारी खोलीची, चांगला निचरा होणारी, आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत पीक चांगले येत नाही 

शेणखत/कंपोस्ट खत : १०  ते १२ टन/हेक्टरी

रासायनिक खते :

  • बागायती :६०:६०:६० नत्र:स्फुरद:पालाश किलो /हेक्टरी, अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी, उर्वरीत अर्धे नत्र ३० कि/हे पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे.
  • गंधकाची कमतरता असल्यास २० किलो प्रति हेक्टरी गंधक शेणखतात मिसळून द्यावे
  • कोरडवाहू: ५०:२५:२५ नत्र:स्फुरद:पालाश किलो /हेक्टरी

भुईमूग

जमिन: मध्यम,भुसभुशीत,चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली,पाण्याचा उत्तम निचरा होणारी

शेणखत/कंपोस्ट खत :१० टन/हेक्टरी

रासायनिक खते :

२५:५० नत्र:स्फुरद किलो /हेक्टरी + जिप्सम ४०० कि/हे (पेरणीच्या वेळी आणि आरया सुटताना प्रत्येकी २०० कि/हे जिप्सम कि/हे  द्यावे).

तीळ

जमिन: मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी
शेणखत /कंपोस्ट खत : ५ टन/हेक्टरी

रासायनिक खते :

२५ किलो नत्र प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळी व पीक तीन आठवड्याचे झाल्यावर २५ किलो नत्र द्यावे.
गंधकाची जमिनीत कमतरता असल्यास पेरणीच्या वेळी २० किलो गंधक प्रति हेक्टरी द्यावे.

बाजरी :

जमिन: हलकी ते मध्यम,चांगला निचरा होणारी. हलक्या जमिनीत सरी-वरंबा पद्धत फायदेशीर ठरते.  

शेणखत/कंपोस्ट खत : ५  टन/हेक्टरी

रासायनिक खते :

  • हलकी जमिन ४०:२०:२० नत्र:स्फुरद:पालाश किलो /हेक्टरी

मध्यम जमिन: ५०:२५:२५ नत्र:स्फुरद:पालाश किलो /हेक्टरी अर्धे नत्र,संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी, उर्वरीत अर्धे नत्र २५  कि/हे पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी

बाजरी :

जमिन: हलकी ते मध्यम,चांगला निचरा होणारी. हलक्या जमिनीत सरी-वरंबा पद्धत फायदेशीर ठरते.
शेणखत/कंपोस्ट खत : ५ टन/हेक्टरी

रासायनिक खते :

हलकी जमिन ४०:२०:२० नत्र:स्फुरद:पालाश किलो /हेक्टरी
मध्यम जमिन: ५०:२५:२५ नत्र:स्फुरद:पालाश किलो /हेक्टरी अर्धे नत्र,संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी, उर्वरीत अर्धे नत्र २५ कि/हे पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी

खरीप ज्वारी :

जमिन: मध्यम काळी ,चांगला निचरा होणारी
शेणखत/कंपोस्ट खत : ५ टन/हेक्टरी
रासायनिक खते :
१००:५०:५० नत्र:स्फुरद:पालाश किलो /हेक्टरी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी, उर्वरीत अर्धे नत्र ५० कि/हे पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी

 हेही वाचा : कापूस उत्पादकांसाठी महत्त्वाचे! कापसातील 'रूट नॉट नेमाटोड'ची लक्षणे आणि व्यवस्थापन

मका :

जमिन: मध्यम,भारी,खोल,रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची अधिक सेंद्रिय पदार्थ व जलधारणशक्ती असलेली
शेणखत/कंपोस्ट खत : १० ते १२ टन/हेक्टरी

रासायनिक खते :

१२०:६०:४० नत्र:स्फुरद:पालाश किलो /हेक्टरी,१/३ नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी, १/३ नत्र ४० कि/हे पेरणीनंतर ३० दिवसांनी, उर्वरित १/३ नत्र ४० कि/हे पेरणीनंतर ४५ दिवसांनी
सूक्ष्म अन्नद्रव्ये– झिंकची कमतरता असल्यास प्रति हेक्टरी २० ते २५ किलो झिंक सल्फेट द्यावे.

तूर :

जमिन: मध्यम ते भारी,(४५ ते ६० से.मी )पाण्याचा चांगला निचरा होणारी, तो पण पाणथळ. जमिनीत पीक चांगले येत नाही, कसदार,भुसभुशीत,पोयट्याच्या जमिनीत तूर चांगली येते. जमिनीत स्फुरद, कॅल्शियम, गंधक या अन्नद्रव्याची कमतरता नसावी. सेंद्रिय कर्ब ०.५ पेक्षा जास्त असावा.
शेणखत/कंपोस्ट खत :५ टन/हेक्टरी

रासायनिक खते :

२५:५०:०० नत्र:स्फुरद:पालाश किलो /हेक्टरी अथवा १२५ किलो डीएपी पेरणीच्या वेळी द्यावे.
पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी ३० किलो पालाश म्हणजेच ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश दिल्यास पिकामध्ये रोगप्रतिकारक्षमता वाढून उत्पादन वाढते.
पीक ५०% फुलोऱ्यात असताना १९:१९:१९ या खताची (१ ते २ % )याप्रमाणे फवारणी करावी.
पाणी देण्याची सोय नसेल तर फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम) किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत २ टक्के पोटॅशियम नायट्रेटची(१३:०:४५) एक फवारणी करावी.

मूग आणि उडीद

जमिन: मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, पाणीसाचून राहणारी, क्षारपड ,चोपण किंवा हलकी जमिन टाळावी.
शेणखत/कंपोस्ट खत : ५ टन/हेक्टरी

रासायनिक खते :

२०:४० नत्र:स्फुरद किलो /हेक्टरी अथवा १०० किलो डीएपी पेरणीच्या वेळी, किंवा ३० किलो युरिया आणि २५० किलो सिंगल सुपर फॉसपेट प्रति हेक्टरी द्यावे.
पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी ३० किलो पालाश म्हणजेच ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश दिल्यास पिकामध्ये रोगप्रतिकारक्षमता वाढून उत्पादन वाढते

कुळीथ आणि मटकी

जमिन:हलकी ते मध्यम,माळरानाची ,पाण्याचा उत्तम निचरा होणारी, पाणथळ चोपण,क्षारयुक्त
जमिनीत या पिकाची लागवड टाळावी
शेणखत/कंपोस्ट खत : ५ टन/हेक्टरी
रासायनिक खते :
१२.५:२५ नत्र:स्फुरद: किलो /हेक्टरी अथवा ७५ किलो डीएपी पेरणीच्या वेळी .

चवळी

जमिन: मध्यम ते भारी ,पाण्याचा उत्तम निचरा होणारी, पाणथळ चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी.
शेणखत/कंपोस्ट खत : ५ टन/हेक्टरी
रासायनिक खते :
२५:५० नत्र:स्फुरद: किलो /हेक्टरी अथवा १२५ किलो डीएपी पेरणीच्या वेळी.

हेही वाचा : पीक व्यवस्थापन: 'या' गोष्टी आहेत छोट्या परंतु कमी खर्चात जास्त उत्पादन देण्यासाठी आहेत उपयुक्त

राजमा

जमिन:मध्यम ते भारी,पाण्याचा उत्तम निचरा होणारी, पाणथळ चोपण,क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी.
शेणखत/कंपोस्ट खत : ५ टन/हेक्टरी
रासायनिक खते :
पेरणी करताना ३०:८० नत्र:स्फुरद: किलो /हेक्टरी अथवा १७० किलो डीएपी
पीक २० दिवसाचे झाल्यावर नत्राचा दुसरा हप्ता ३०कि/हे म्हणजेच ७० किलो युरिया प्रति हेक्टरी द्यावा.

कापूस

जमिन : काळी,मध्यम ते खोल (९० से.मी),पाण्याचा चांगला निचरा होणारी,उथळ,हलक्या,
क्षारयुक्त पाणथळ जमिनीत कपाशीची लागवड करण्याचे टाळावे.
शेणखत/कंपोस्ट खत : बागायती १० टन/हेक्टरी, कोरडवाहू - बागायती ५ टन/हेक्टरी

 

रासायनिक खते :

संकरीत कापूस :१००:५०:५० नत्र:स्फुरद:पालाश किलो /हेक्टरी
सुधारित कापूस : ८०:४०:४० नत्र:स्फुरद:पालाश किलो /हेक्टरी
बी टी.कापूस : १२५:६५:६५ नत्र:स्फुरद:पालाश किलो /हेक्टरी
पेरणीच्या वेळी २०% नत्र ,संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी ४०% नत्र व पेरणीनंतर ६० दिवसांनी उर्वरित ४०% नत्र द्यावे.
नत्र, स्फुरद व पालाश या प्रमूख घटकाव्यतिरिक्तं मॅग्नेशियम, गंधक, लोह,जस्त, मॅगनीज आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा गरज असते.
गंधक- २० किलो /हेक्टरी
मॅग्नेशियम सल्फेट-२० किलो /हेक्टरी
झिंक सल्फेट -२५ किलो /हेक्टरी
बोरॅक्स -५ किलो /हेक्टरी

पेरणीयोग्य पाऊस झाल्यास, जमिनीत वाफसा येताच खरीप पिकांच्या पेरण्या कराव्यात.पेरणी करतांना कृषि विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या वांणाची योग्य अंतरावर,योग्य वेळी,योग्य प्रमाणात खत मात्रा द्यावी.शेतकऱ्यांनी स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊनच पेरणीचे निर्णय घ्यावेत.

लेखक -

डॉ.आदिनाथ ताकटे,मृद शास्रज्ञ

एकात्मिक शेती पद्धती

महात्मा फुले कृषि विद्यापीठ ,राहुरी

मो.९४०४०३२३८९

English Summary: Give balanced fertilizer to kharif crops
Published on: 05 July 2022, 11:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)