सध्या तुरीचे पीक फुलकळी येण्याच्या अवस्थेत आहे. यापुढील टप्प्यात बदलत्या हवामानानुसार पिकाचे योग्य व्यवस्थापन ठेवणे आवश्यक आहे. वाढीच्या टप्प्यात तूर पिकाला पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात असते. सध्या तुरीमधील आंतरपीक सोयाबीन काढून झाले आहे. अशा परिस्थितीत तूर पिकास एक संरक्षित पाणी द्यावे. तुरीची वाढ फारशी झाली नसली तरी पीक निरोगी असल्याने संरक्षित पाणी दिल्यास निश्चित फायदा होईल.
फुलगळीची कारणे - 1) फुले लागण्याच्या वेळी जमिनीत अत्यंत कमी ओलावा असणे Very low soil moisture at the time of flowering किंवा सततचा जास्त ओलावा असणे. 2) जमिनीत जास्त दिवस पाणी धरून राहणे किंवा लवकर वापसा न येणे.
जाणून घ्या ठिबक वरील वांग्याची शेती
3) वातावरण सतत ढगाळ असणे व हवेत दमटपणा असणे.4) जमिनीत ओलावा जास्त असणे. लागवडीचे क्षेत्र हे पाणवठा, नदी किंवा तळ्याच्या जवळ असल्यास आणि वातावरणात तापमान अत्यंत कमी झाल्यास वाफेचे रूपांतर धुक्यात होऊन फुलगळ होते.5) अतितापमान झाल्यास व जमिनीत ओलावा कमी असल्यास फुलगळ होते.
उपाययोजना - 1) फुलगळ कमी करण्यासाठी वाढ उत्प्रेरक एनएए (नॅप्थॅलिक ऍसिटिक ऍसिड) 20 पीपीएम (100 लिटर पाण्यात 20 मिलि एनएए) या प्रमाणात फवारणी करावी. यामुळे फुलगळ काही प्रमाणात कमी करता येईल.2) चमत्कार ची फवारणी करावी पर पंप 20मि.. मोठ्या प्रमाणात फुलाची वाढ होते शेंगात रूपातर लवकर होते.. 3) फुलाच्या वेळी बोराॅन ची फवारणी किंवा निर्मल कंपनी चे बेरिलाॅन घ्यावी. + 0 :52: .34 70 ग्राम 3) 9 29 18 flower special या विद्राव्य
खताचा वापर करावा... 4) बुमप्लस, boomflower , फॅन्टाक प्लस,काॅन्टीस,या पैकी एक फुल उत्तेजकाची फवारणी करावी.... 5) काॅन्टाप प्लस , एम- 45 धुवारी असल्यास फवारणी करावी.. जास्त नुकसान होत असल्यास किंवा फुल गळ मोठ्या प्रमाणात असेल तर आॅमिस्टार टाॅप किंवा ,स्कोर नेटीवो, या पैकी एक बुरशीनाशकाची फवारणी करावी....*शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण*1) अळीची अंडी फुलकळीच्या देठावर किंवा जवळच्या पानाच्या मागील बाजूस एकट्याने किंवा गुच्छात दिसतात. 5 ते 7 दिवसांत लहान अळी बाहेर
पडते. ही अवस्था सर्वांत घातक असते. या अवस्थेत नियंत्रण केल्यास पुढील दोन फवारण्या वाचतात. 2) नियंत्रणासाठी निंबोळी अर्क 5 टक्के किंवा क्लोरोपायरिफॉस 17 मिलि प्रति10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. दुसरी फवारणी क्विनॉलफॉस किंवा प्रोफेनोफॉस 20 मिलि प्रति10 लिटर पाण्यात मिसळून पीक 50 टक्के फुले व शेंगा असताना करावी. दाणे भरताना शेंगा पोखरणाऱ्या अळीबरोबरच शेंगमाशीचा प्रादुर्भाव वाढल्यास इमामेक्टीन बेन्झोएट 10ग्रॅम प्रति15 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. फेनास की 15मि किंवा आॅप्लीगो 10 मि .बाराझाईड 30मि कोराजन 7मि
Published on: 09 October 2022, 02:25 IST