Agripedia

शेतकऱ्याच्या डोक्यावरील आणखी एक संकट म्हणजे घोणस अळी.

Updated on 22 September, 2022 9:08 PM IST

शेतकऱ्याच्या डोक्यावरील आणखी एक संकट म्हणजे घोणस अळी. घोणस अळीचे शास्त्रीय नाव आहे - Euclea delphinii (Spiny oak stinging slug caterpillar) चा प्रादुर्भाव हा ऊस गवत आंबा अशा विविध पिकावर होताना दिसत आहे. सध्या ह्या आळीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर मौजे चांगेफळ येथील प्रगत शेतकरी श्री. नितीन सवडे यांच्या सोयाबीन पिकात फवारणी करतांना आढळली. शेतकरी मित्रांनो ही कीड येते आणि निघून जाते. तिचा जीवनक्रम ही कमी आहे या अळीच्या शरीरावर

केस असतात या केसांमधून एक विशिष्ट प्रकारचे रसायन ही आळी स्वतःच्या बचावासाठी बाहेर काढते ते विषारी असते अशा प्रकारच्या बऱ्याच अळ्या असतात पण काही अळ्या या विषारी रसायन बाहेर सोडत असतात.

हे ही वाचा - रब्बी मध्ये अशी करा ज्वारी पेरणी, होईल भरघोस उत्पन्न

त्यामुळे जर आपला या आळीला स्पर्श झाला किंवा आपण या अळीच्या संपर्कात आलो तर आपली त्वचा काही मिनिटातच सुजते किंवा खाज सुटते जवळजवळ दोन ते तीन दिवस असा प्रभाव जाणू शकतो काही व्यक्तींमध्ये या रसायनाला एलर्जी गुणधर्म असे संबोधतात त्यामुळे

अशा लोकांना याचा त्रास होतो त्यामुळे ज्या ठिकाणी अशा अळ्या असतील त्याला स्पर्श करू नका. खबरदारी म्हणून आळीला बाहेर उचलून टाकावे त्यासाठी हातात क्लब वापरावे बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात अशा प्रकारची घटना घडली होती आणि आत्ता ही आळी आपल्या इकडे पण आढळून येत आहे. या संदर्भित व्यक्तीला रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक भीतीच वातावरण निर्माण झालं होतं जर ही

अशी अळी दिसली तर कृपया तिला स्पर्श करू नका ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि अशा अळ्या दुर्मिळच आढळतात त्यामुळे फवारणी करताना अंगावर प्रोटेक्टिव्ह कपडे किंवा रेनकोट घालून फवारणी केल्यास अति चांगले होऊ शकते गॉगल किंवा हेल्मेट डोक्यामध्ये असल्यास ही चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन होऊ शकते. किंवा हातामध्ये हातमोजे घालून आळीला वेळीच नष्ट करणे उपायकारक ठरू शकते.

 

डॉ. विवेक सवडे (पी. एच. डी. कृषी कीटक शास्त्रज्ञ, व.ना.म.कृ.वी., परभणी ) 9673113383

English Summary: Ghos worm found in Sindkhedaraja taluka, village entomology expert provided prompt guidance
Published on: 21 September 2022, 05:50 IST