Agripedia

हरभरा ही रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे.महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. परंतु बऱ्याच वेळेस या हरभरा पिकावर वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांचा व रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.हरभरा म्हटले म्हणजे सगळ्यातअगोदर डोळ्यासमोर येते ती घाटेअळी. या अळीच्या प्रादुर्भावामुळे हरभरा पिकाचे सगळ्यात जास्त नुकसान होते. या लेखात आपण हरभऱ्यावरील घाटे आळीचे नुकसान व त्यावरील नियंत्रण याबद्दल माहिती घेऊ.

Updated on 17 September, 2021 11:58 AM IST

हरभरा ही रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे.महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. परंतु बऱ्याच वेळेस या हरभरा पिकावर वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांचा व रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.हरभरा म्हटले म्हणजे सगळ्यातअगोदर डोळ्यासमोर येते ती घाटेअळी. या अळीच्या प्रादुर्भावामुळे हरभरा पिकाचे सगळ्यात जास्त नुकसान होते. या लेखात आपण हरभऱ्यावरील घाटे आळीचे नुकसान व त्यावरील नियंत्रण याबद्दल माहिती घेऊ.

 हरभरा पिकावरील घाटेअळी

ही अळी आपल्या  सगळ्यांना माहिती आहे. घाटे आळी तशी वेगळ्या नावाने ओळखले जाते म्हणजेच अमेरिकन बोंड आळी,हिरवी बोंड आळी, तुरीवरील शेंगा पोखरणारी आळी इत्यादी.पूर्ण विकसित झालेली घाटे अळी पोपटी रंगाचीदिसते व शरीराच्या बाजुवर तुटक करड्या रेषा आढळतात.

 घाटे आळी मुळे होणारे नुकसान

 या अळ्या सुरुवातीस लहान असताना पानावरील आवरण खरडून खातात.त्यामुळे पानेकाही अंशी जाळीदार व भुरकट पांढरी पडलेली दिसतात. नंतर विकसित घाटे अळी कळ्या व  फुले कुरतडून  खाते. या अळीची पूर्ण वाढ झालेली अवस्था तोंडाकडील भाग घाट्यात घालून मधील दाणे खाते.

 अशा पद्धतीने करा घाटी अळीचे एकात्मिक नियंत्रण

1-उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरणी करावी. त्यामुळे मातीत असलेली किडीचे कोश उघडे पडून त्यांना पक्षी वेचून  खातात व काही कोष उन्हामुळे मरतात.

2- वाना विषयी शिफारस केलेल्या अंतरावरच पेरणी करावी.

3- घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळा मध्ये लुरचा वापर करावा. शेतात हेक्‍टरी पाच सापळे पिकापेक्षा एक फूट उंचीवर लावावे. पतंगांची संख्या सतत तीन दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त  म्हणजे प्रति सापळे आठ किंवा दहा आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी.

 तसेच हरभरा लावण्याच्या ठिकाणीवीस पक्षी थांबे उभारावेत.पक्ष्यांमुळे अळ्यांची संख्या कमी होण्यास मदत होते.

5- प्रति ओळीत प्रति मीटर1 किंवा दोन अळ्या दिवा 5% कीडग्रस्त घाटे आढळल्यास हीआर्थिक नुकसानीची पातळी समजली जाते. पातळी दिसल्यासपटकन व्यवस्थापन उपाययोजना करावी.

वनस्पतिजन्य कीटकनाशकांची फवारणी

1-सुरुवातीच्या काळात पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी केल्यास फायदेशीर आहे.

घाटे अळीचे जैविक व्यवस्थापन

  • घाटेअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापरशिफारसीनुसार करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे.

 

घाटे आळी चे रासायनिक नियंत्रण

  • हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील प्रभावी व्यवस्थापनासाठीक्लोरअँट्रानीलिप्रोल (20 ए.सी) 2.5 मिली किंवा इमामेक्टीन बेंजोएट (पाच टक्के पाण्यात मिसळणारी दाणेदार) तीन ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
English Summary: ghateali management in gram crop and taking precaution
Published on: 17 September 2021, 11:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)