Agripedia

शेतकरी आपल्या शेतात नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन काढत असतो. सध्या लवंग लागवड चर्चेत आहे. यामधून शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत. मात्र लवंग लागवड व त्याचे योग्य व्यवस्थापन याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे आज आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Updated on 08 August, 2022 10:39 AM IST

शेतकरी (farmers) आपल्या शेतात नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन काढत असतो. सध्या लवंग लागवड (planting cloves) चर्चेत आहे. यामधून शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत. मात्र लवंग लागवड व त्याचे योग्य व्यवस्थापन याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे आज आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

लवंगाची लागवड फक्त उष्ण प्रदेशात करणे अधिक योग्य आहे. लवंग वनस्पतींच्या वाढीसाठी, तापमान 10 अंश सेंटीग्रेडपेक्षा जास्त असावे. त्याच वेळी, त्याच्या झाडाच्या वाढीसाठी 30 ते 35 अंश तापमान आवश्यक आहे. थंड ठिकाणी लागवड करणे टाळावे अन्यथा शेतकऱ्यांचे (farmers) मोठे नुकसान होऊ शकते.

Tur Producer Farmers: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; तुरीच्या दरात वाढ, जाणून घ्या बाजारभाव

एका झाडापासून 2 ते 3 किलो उत्पादन

पावसाळा महिना सुरू आहे. हा महिना अनेक पिकांच्या पेरणीसाठी योग्य वेळ आहे. मसाल्यांच्या लागवडीसाठीही हा महिना उत्तम मानला जातो. लवंग हे मसाल्यांचे असेच एक पीक आहे, ज्याची लागवड देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते.

विविध प्रकारची औषधे तयार करण्यासाठी तसेच सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. लवंग लागवडीतून शेतकरी वर्षाकाठी 5 ते 6 लाखांपर्यंत सहज उत्पन्न घेऊ शकतो. हे मसाल्याचे पीक असल्याने याला जास्त मागणी असते.

भाजीपाला लागवडीतून शेतकरी कमवतात भरघोस नफा; जाणून घ्या उत्पन्नाची सोप्पी पद्धत

लवंग कुठे वापरली जाते?

देशात लवंगीचे (cloves) धार्मिक महत्त्वही खूप जास्त आहे. पुजा-हवनातही लवंग वापरतात. याशिवाय सर्दी, ताप यांसारख्या समस्यांमध्ये याचे सेवन फायदेशीर ठरते. बाजारात लवंगाच्या तेलापासून ते टूथ पेस्ट, दातदुखीचे औषध, पोट आणि तोंडाच्या आजाराच्या औषधापर्यंत अनेक उत्पादने आहेत.

लागवडीसाठी योग्य हवामान

लवंग लागवड फक्त उष्ण प्रदेशातच अधिक योग्य आहे. लवंग वनस्पतींच्या वाढीसाठी, तापमान 10 अंश सेंटीग्रेडपेक्षा जास्त असावे. लवंग झाडाच्या वाढीसाठी 30 ते 35 अंश तापमान आवश्यक आहे. थंड ठिकाणी लागवड करणे टाळावे अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

लवंगा पेरणीसाठी, पिकलेली फळे प्रथम त्याच्या मातृ रोपातून गोळा केली जातात. पेरणी करायच्या आदल्या दिवशी एक दिवस आधी पाण्यात भिजत ठेवा. यानंतर वरील साल काढून पेरणीची प्रक्रिया सुरू करावी.

10 सेमी अंतरावर ओळीत पेरणी करावी. झाडांच्या वाढीसाठी सेंद्रिय खत (Organic fertilizer) वापरत राहा. साधारण चार-पाच वर्षात ही वनस्पती तयार होऊन फळे देऊ लागते. जर त्याच्या झाडाची चांगली काळजी घेतली तर ते आपल्याला दीर्घकाळ नफा देऊ शकते.

महत्वाच्या बातम्या 
Agricultural Business: 'या' फुलांपासून बनतो चहा; शेती करून कमवा तिप्पट नफा
Strawberry Farming: 'या' फळाच्या लागवडीने बदलणार शेतकऱ्यांचे नशीब; जाणून घ्या सविस्तर माहिती
Agricultural Business: शेतकरी मित्रांनो 'या' पिकाची करा लागवड; कमी कालावधीत व्हाल मालामाल

English Summary: Get bumper profits planting cloves Farmers earning income year
Published on: 08 August 2022, 10:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)