Agripedia

गवार पिकाचा विचार केला तर या पिकाच्या साठीमध्यम खोलीची कसदार जमीन चांगली मानवते. पाण्याचा निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत लागवड करावी.जमिनीचा सामू हा साडे सात ते आठच्या दरम्यान असावा.जमीन हलकी असल्यास भरपूर सेंद्रिय खाद्य द्यावे.आठ ते 10 टन कुजलेले शेणखत मातीत घालावे.

Updated on 21 November, 2021 7:20 PM IST

गवार पिकाचा विचार केला तर या पिकाच्या साठीमध्यम खोलीची कसदार जमीन चांगली मानवते. पाण्याचा निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत लागवड करावी.जमिनीचा सामू हा साडे सात ते आठच्या दरम्यान असावा.जमीन हलकी असल्यास भरपूर सेंद्रिय खाद्य द्यावे.आठ ते 10 टन कुजलेले शेणखत मातीत घालावे.

उन्हाळी हंगामामध्ये लागवड 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत करावी.

गवार ची लागवड पद्धत

 गवारची उगवण चांगली होण्यासाठी बियाणे पेरणीपूर्वीदोन तास आधी भिजवून,नंतर सुकवून पेरावे. त्याचप्रमाणे लागवडीअगोदर जमिनीला पाणी देऊन वाफसा आणून नंतर पेरणी करावी.पेरणीनंतर हलके पाणी द्यावे. पेरणीसाठी एकरी आठ किलो बियाणे वापरावे.लागवड ही टोकण करायची झाल्यास 12 ते 15 किलो बियाणे पुरते. पेरणीपूर्वी प्रति 10 किलो बियाण्यास 125 ग्रॅम जिवाणूसंवर्धक चोळावे. त्यामुळे मुळांवरील रा त्यामुळे मुळांवरील रात्र ग्रंथीची वाढ होऊननत्र ग्रंथीची वाढ होऊनपिकास व जमिनीस उपयुक्त ठरतो.

गवाराच्या जाती

गवारीची स्थानिक म्हणजे गावरान ही जात ग्राहक जास्त पसंत करतात. पुसा सदाबहार,पुसा मोसमी आणि शरद बहार इतरही काही खाजगी कंपन्यांच्या जाती चांगल्या आहेत.

गवार साठी खत व्यवस्थापन

 कोरडवाहू पीक घेतल्यास खताची फारशी आवश्यकता भासत नाही. बागायती पिकाला पूर्वमशागतीच्या वेळी एकरी आठ ते 10 टन शेणखत जमिनीत मिसळावे.या पिकालाएकरी दहा किलो नत्र,20 किलो स्फुरद व 20 किलो पालाश द्यावे.

लागवडीच्या वेळी नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाश यांची संपूर्ण मात्रा  द्यावी.नत्राचा राहिलेला अर्धा हप्ता पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावा.

 गवार पिकाला पाणी कमी लागत असले तरीफुलधारणा झाल्यानंतर ओलावा कमी पडू देऊ नये.

काढणी

 भाजीसाठी हिरव्या कोवळ्या लुसलुशीत पण पूर्ण वाढ झालेल्या शेंगांची तोडणी करावी शेंगा जुन्या, निबर होऊ देऊ नयेत. एकूण तीन ते चार तोडण्या मिळतात.हिरव्या शेंगांचे जातीनिहाय एकरी 40 ते 50 क्विंटल उत्पादन मिळते.

English Summary: gawaar crop cultivation in summer condition and management
Published on: 21 November 2021, 07:20 IST