सध्या लसुन लागवडीचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये बहुतांशी भागात वाढत आहे. लसन पिकाचे योग्य रीतीने व्यवस्थापन केले तर हातात चांगले उत्पादन येते व त्या माध्यमातून उत्पन्नही चांगले मिळते.या लेखात आपण लसून पिकाला करायच्या खत व्यवस्थापन याविषयी माहिती घेऊ.
लसुन पिकासाठी खत व्यवस्थापन
1-लसुन लावण्यासाठी वाफे तयार करताना त्या अगोदर प्रति एकर सहा टन कुजलेले शेणखत मिसळावे किंवा जर कोंबडी खत टाकायचे असेल तर तीन टन खत चांगली पसरून जमिनीत मिसळावे.
2- लसुन पिकासाठी रासायनिक खते देताना एका एकर साठी 30 किलो नत्र,स्फुरद 20 किलो व पालाश 20 किलो याप्रमाणे द्यावी.या एकूण मात्र पैकी दहा किलो नत्र आणि स्फुरद,पालाशच्या पूर्ण मात्रा द्याव्यात. उरलेली नत्राची मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून 30 आणि 45 दिवसांनी द्यावे.
3-बसून लागवडीनंतर 60 दिवसांनी नत्राची मात्रा देऊ नये.त्यामुळे उत्पादनावर व लसूण साठवण यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
लसूण हे पीक गंधकयुक्त खतांना चांगला प्रतिसाद देतात.त्यासाठी लसुन पिकाला भर खत देताना जर अमोनियम सल्फेट व सिंगल सुपर फास्फेट यासारख्या खतांचा वापर केला तर गंधकाचे पुरेशी मात्रा लसूण पिकाला उपलब्ध होते.
5- मिश्रखते वापरल्यानंतर देखील तर गंधकाचीपूर्तता होत नसेल तर लागवड करण्यापूर्वी प्रतीएकर 20 किलो गंधक जमिनीत मिसळावे.
6-सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा करण्यासाठी झिंक सल्फेट, मॅग्नीज सल्फेट, कॉपर सल्फेट, फेरस सल्फेट यांची फवारणी 0.5टक्के या प्रमाणात करावी.
वेलवर्गीय पिकावरील किड नियंत्रण
1-नागअळी-वेलवर्गीय पिकांमध्ये नाग अळी ही पानांच्या आतल्या भागात राहून आतील हरित द्रव्यांचा भाग खाऊन घेते.त्यामुळे पानांवर नागमोडी रेषा तयार होतात.
नियंत्रण
अझाडिरेक्टिन( दहा हजार पीपीएम)तीन मिली किंवा इथिओन+सायपरमेथ्रीन 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
2- फळमाशी-फळमाशी फळांच्या वरील भागातअंडी घालते. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फळात राहून गर खातात.त्यामुळे फळे सडतात व वेडीवाकडी होतातआणि अकाली पक्व होतात.
नियंत्रण
क्यूल्युरचेएकरी पाच सापळे लावावेत.मॅलेथिऑन (50ईसी) 2 मिली+ गुळ दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात नॅपसॅक पंपाने फवारणी करावी.
Published on: 23 December 2021, 01:27 IST